तुही है आशिकी (भाग 25)

 भाग 1

 

 

 

(भाग टाकण्यास खूप उशीर झालाय त्याबद्दल मनापासून माफी, कथेचे अखेरचे काही भाग उरले आहेत, पुढील काही दिवसात कथा पूर्ण होईल)

 

परेश अखेर सुरजला सांगतो, की त्याला समीक्षा, सुरजची चुलतबहिण आवडत असते, हे ऐकून सूरजला काय वाटेल या विचाराने परेश घाबरला होता. पण सूरज मात्र एकदम शांत झाला, काहीही बोलत नव्हता..

 

“सूरज अरे मी तुला कधीचं सांगू सांगू म्हणतोय पण..”

 

“तू तिला सांगितलंय हे?”

 

“नाही, तशी कधी वेळच आली नाही..”

 

“पऱ्या..समीक्षा सोबत तुझं लग्न लावून देणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेन, पण त्याआधी तुला तिचा भूतकाळ माहीत हवा..”

 

“भूतकाळ?”

 

“होय, वर्षभरापूर्वी तिचं लग्न ठरलं होतं, सगळी तयारी झालेली, पण नवरा मुलगा आणि वऱ्हाड लग्नठिकाणी येत असतानाच त्यांचा अपघात झाला..खूप भयानक परिस्थिती ओढवली गेली, समीक्षा वर आरोप ठेवले गेले, लग्ना आधीच नवऱ्याला गिळलं म्हणून..आणि तेव्हापासून तिचं लग्न होत नाहीये, परेश तुला हे सगळं माहीत नव्हतं नाहीतर तुही तिच्या प्रेमात पडला नसतास..”

 

“काय वेडेपणा आहे हा, मुलाकडच्या लोकांचा अपघात झाला यात समीक्षाचा काय दोष?”

 

“आपला समाजच असा आहे की एखाद्या मुलीवर ठपका लागला की तो खोडणं अवघड होऊन बसतं..”

 

दोघेही पेरणी करत असताना हे सगळं बोलत असतात, अण्णा पाटील मोटेने त्याच्या शेताला पाणी देत असतो आणि सूरज परेशच्या केविलवाण्या प्रयत्नांकडे बघून हसत असतो. इतक्यात काळे ढग जमा होतात, पावसाची चाहूल लागते आणि पेरणीच्या पथ्यावरच पडतं. सूरज परेशला आनंद होतो..

 

“पऱ्या बघ, हेतू चांगला असेल तर देवही साथ देतो..”

 

अण्णा पाटील कुढत बसतो, त्याला वाटलेलं की पाऊस पडणार नाही आणि ही पोरं सामान गुंडाळून परत जातील, आजवर कधीही गावात वेळेत पाऊस पडला नव्हता पण यावेळी मात्र वेळेत झाला.

 

तिकडे समीक्षाला बघायला एक स्थळ आलेलं असतं, बघण्याचा कार्यक्रम होतो, अचानक कार्यक्रम ठरल्याने मुलाची माहिती काढायलाही वेळ मिळाला नव्हता. मुलाने समीक्षाला प्रश्न विचारले.

 

“घर नीट सांभाळावे लागेल, जमेल ना?”

 

“हो..”

 

“अहो आमची समीक्षा खूप हुशार आहे घरकामात..”

 

“आणि हो, माझ्या दोन्ही मुलांचा अभ्यास, त्यांची शाळा नीट सांभाळावे लागेल..”

 

सर्वजण चकित होतात, म्हणजे या माणसाचं लग्न आधीच झालंय? हा विधुर आहे?

 

“माफ करा पण आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही समीक्षा चं लग्न तुमच्याशी नाही लावू शकत..” समीक्षा चे आई वडील सांगतात..

 

“अहो तुमची मुलगी आधीच अपशकुनी आहे, नवऱ्या मुलाला गिळलं तिने, हिच्याशी कोण करणार लग्न? मी उपकार करतोय तर वर मला शिकवताय?”

 

तो माणूस रागारागाने निघून जातो. समीक्षा रडत रडत खोलीत जाते..समीक्षाचे आई वडील खूप दुःखी होतात, आपल्याच मुलीच्या वाटेला का हे असं यावं? अखेर समिक्षा ची आई वडिलांना म्हणते,

 

“समीक्षा ची मानसिक स्थिती काही ठीक नाही, एरवी तिचा भाऊ सूरज असतो तेव्हा तिला समजावत असायचा, पण आता तोही इथे नाही..”

 

“आपण तिला घेऊन सुरजला भेटायला जाऊया, तिलाही बरं वाटेल, ती म्हणत होतीच की दादा कधीचा भेटला नाहीये..”

 

समीक्षाच्या वडिलांचे देसाई म्हणून एक मित्र असतात, पोलीस खात्यात ते कामाला होते, त्यांचं सतत येणं जाणं सुरू असायचं. त्यांना सूरज बद्दल सगळी माहिती होती आणि एक आयटीतला मुलगा शेतीचा प्रयोग करतोय हे ऐकून त्यांना कौतुक वाटायचं. जेव्हा त्यांना कळलं की समीक्षा आणि तिचे आई वडील सुरजला भेटायला जाणार तेव्हा त्यांनीही सोबत यायची ईच्छा दर्शवली.

 

पुढच्या दिवशी सर्वजण गाडीत बसले आणि सूरज कडे जायला निघाले, सुरजला आधी कळवलं नव्हतं, दादाला सरप्राइज देऊ म्हणून समिक्षाचाच हट्ट होता. रस्त्याने जात असताना गाडीत सर्वांच्या गप्पा चाललेल्या, देसाई काका त्यांच्या पोलीस खात्यातील किस्से मजेने सांगत होते. 

 

समीक्षा खिडकीतून बाहेर बघत होती, मधेच झालेल्या गोष्टींची आठवण आली की तिला रडू यायचं,पण स्वतःला कशीबशी सावरत होती. तिचं लक्ष शेजारून जात असलेल्या गाडीकडे गेलं, एक मुलगी मागच्या सीट वर झोपलेली दिसली..तिने निरखून पाहिलं आणि तिला धक्काच बसला..

 

“बाबा..बाबा..या गाडीचा पाठलाग करा…लवकर..”

 

“काय झालं?”

 

“बाबा प्रश्न नंतर विचारा आधी जे सांगतेय ते करा..”

 

“मित्रा ही सांगतेय तसं कर, काहीतरी गंभीर प्रकरण आहे वाटतं..”

 

“बाबा, अहो कोमल आहे त्या गाडीत, तोंडावर पट्टी बांधलीये तिच्या..कुणीतरी पळवून नेतंय तिला असं वाटतंय…”

 

देसाई काका लगेच अलर्ट झाले, त्यांनी कंट्रोल रूम ला फोन लावून इतर पोलिसांना या गाडीचा ट्रॅक ठेवायला लावला..पाठलाग करता करता गाडी एका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, हॉस्पिटल अगदी ओसाड जागी होतं. देसाई चमकले, या हॉस्पिटलवर human ट्रॅफिकिंग चे धंदे सुरू असण्याचे आरोप होते पण पुराव्या अभावी पोलिसांना काहीही करता येत नव्हतं..

 

देसाईंनी सर्वांना गाडीत थांबायला लावलं, आणि ते एकटे आत गेले. आत जाताच त्यांना दिसलं की कोमलला बेशुद्ध करण्यात आलेलं आणि operation करून तिच्या शरीराचे भाग विकण्याची तयारी सूरु होती. कोमल आपल्याशी लग्न करणार नाही मग तिचा असा उपयोग करून घेऊ असा राक्षसी विचार अभिनवने केला होता. देसाईंना तिथल्या एका शिपायाने पाहिलं आणि तो ओरडला..

 

“कोण आहे तिकडे?”

 

देसाईंनी आरडाओरडा सूरु केला..

 

“बंद करा हे धंदे, त्या मुलीला सोडा…तुम्हा सर्वांना आता अटक होणार आहे, चुपचाप पोलिसांच्या स्वाधीन व्हा..”

 

हे पोलीस आहे कळताच सर्वजण पळू लागले, पण तोवर पोलिसांनी हॉस्पिटलला घेराव घातला होता. कोमल शुद्धीवर नव्हती, तिला गाडीत बसवण्यात आलं आणि अभिनवला अखेर अटक झाली. समीक्षा च्या आई वडिलांसाठी हा धक्काच होता, देसाईंनी समीक्षाचे अभिनंदन केले, तिच्या तीक्ष्ण नजरेमुळे कोमल जीवानिशी वाचली होती. 

 

कोमल शुद्धीवर आली तेव्हा ती तिच्या घरी होती, आजूबाजूला तिचे आई बाबा, बहिणी, समीक्षा, तिचे आई वडील आणि देसाई होते. आपली सुटका झालीये लक्षात येताच तिच्या जीवात जीव आला आणि बाबांना पकडून ती रडू लागली. 

 

“बाळा..रडू नकोस, तुला आता काहीही होणार नाही, काळजी करू नकोस..”

 

“सूरज? त्याला माहितीये का सगळं?”

 

“त्याला काहीच कल्पना दिली नाही आम्ही”

 

“मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचं आहे..”

 

“बेटा अजून तुला अशक्तपणा आहे अंगात, देव जाणे कोणती औषधं दिली होती त्यांनी तुला..”

 

समीक्षा कोमलजवळ येउन तिला धीर देते, 

 

“कोमल, आम्ही सुरजला भेटायलाच चाललोय, जाताना तुला पाहिलं आणि सगळा उलगडा झाला..”

 

देसाईंनी सगळी हकीकत कथन केली, कोमलच्या आई बाबांनी समीक्षाचे आभार मानले. समीक्षा, तिचे आई वडील आणि देसाई गाडीत बसले आणि सुरजकडे जायला निघाले. 

 

सर्वजण सूरजकडे पोचतात तेव्हा तिथे काहीतरी गोंधळ सुरू असतो. परेशचे आई बाबा तिथे आलेले असतात आणि दोघांना बोलत असतात..

 

“परेशला इथे अभ्यासाला पाठवलं होतं आम्ही, अभ्यास तर तो करतच नाहीये वर मजा मस्ती चाललीये तुमची..आणि काय रे, मागे इतक्या परीक्षा दिल्यास एकात तरी निवड झाली का? आता मनावर घ्यायचं सोडून पुन्हा मजा मस्ती चाललीये?”

 

सर्वजण त्या दिशेने जातात, समीक्षासमोर आपला असा अपमान पाहून परेशला कसतरीच होतं. समीक्षाचे आई वडील पुढे येऊन विचारतात..

 

“सूरज काय चाललंय हे?”

 

“काकू काही नाही, तुम्हाला तर माहितीच आहे की मी माझ्या प्रोजेक्ट साठी इथे आलोय, परेशही मदत करतोय मला..”

 

सगळा गोंधळ सुरू असतो तोच परेशचा फोन वाजतो..

 

“परेश मित्रा अभिनंदन, मागच्या वेळी axis बँकेच्या परीक्षेत पास झालास तू, नाव बघितलं नाहीस का तू?”

 

परेशचा विश्वासच बसेना, तो पटकन साईटवर रिझल्ट्स बघतो आणि आनंदाने उड्या मारायला लागतो..

 

“आई बाबा, माझी निवड झालीये, बँकेच्या परीक्षेत पास झालोय मी..”

 

आई बाबांचा राग क्षणात मावळतो, आई परेशला जवळ घेऊन दृष्ट काढते.. समीक्षा चे आई बाबा आणि देसाई त्याचं अभिनंदन करतात. सूरज म्हणतो,

 

“चला, पऱ्याचं एक काम तर झालं, आता लग्नाचं बघा..”

 

“हो हो, आता तर घाई करावी लागेल..”

 

तेवढ्यात देसाईंच्या मनात काहीतरी येतं आणि ते म्हणतात..

 

“शोधायला कशाला हवी, इथेच तर आहे, आमची समीक्षा..”

 

हे ऐकून समीक्षा चे आईबाबा जरा गंभीर होतात, परेश चे आई वडील समीक्षाला बघतात आणि त्यांना ती पाहताक्षणी पसंत पडते..

 

“गोड मूलगी आहे खरंच..”

 

“माफ करा पण आमच्या मुलीचा भूतकाळ काहीसा बरा नाहीये..”

 

समीक्षा ची आई समीक्षाच्या बाबतीत झालेलं सगळं सत्य कथन करते. परेशचे बाबा विचारात पडतात. सूरज त्यांना विचारतो..

 

“काय वाटतं काका तुम्हाला..”

 

“हेच की किती कमनशिबी होता तो मुलगा ज्याला इतक्या गोड मुलीची साथ मिळाली नाही, आणि ही अपशकुनी नसून लक्ष्मी आहे लक्ष्मी, हिचा इथे पाय लागताच माझ्या मुलाला आनंदाची बातमी कळाली..कोण हिला अपशकुनी म्हणतं?”

 

हे ऐकून समीक्षा आणि कुटुंबियांना खूप बरं वाटतं, पहिल्यांदा समीक्षा बद्दल काहीतरी चांगला विचार केला होता, परेशला तर आज आकाश गवसल्यासारखं झालं..सगळी मंडळी बाहेर चटई टाकुन बसतात..समीक्षा च्या चेहऱ्यावर थकवा असतो, सूरज तिला विचारतो काय झालं..

 

आता वेळ आलेली असते, सुरजला कोमल बद्दल खरं खरं सांगण्याची… देसाई ते सगळं कथन करतात. एकेक गोष्ट ऐकून सुरजच्या अंगावर काटाच उभा राहतो, त्याला खूप धक्का बसतो..

 

“इतकं सगळं होऊन गेलेलं असताना मला काहीच माहीत नाही?”

 

“सूरज आता कोमल बरी आहे, आणि त्या अभिनवलाही अटक झालीये..काळजी करू नकोस, आता फक्त पटकन लग्न आटोपून घ्या..”

 

क्रमशः

 

 

4 thoughts on “तुही है आशिकी (भाग 25)”

Leave a Comment