तुही है आशिकी (भाग 11)

 

“एक मिनिट, 2 वर्ष कसलं नातं? आपली फेसबुक वर ओळख झालेली आणि आपण एकमेकांच्या संपर्कात होतो इतकंच. याला तू नातं म्हणतोस?”

 

“मग फेसबुकवर मी हॅलो म्हटल्यावर मला उत्तर का द्यायचीस? माझ्याशी गप्पा का मारायची?”

 

“अभिनव अरे तू नक्की अमेरिकेला राहतोस ना? कुठल्या काळातले विचार घेऊन बसलाय तू? जुन्या काळी मुलगी नुसती बघून हसली म्हणजे फसली असं म्हणायचे..आजच्या जमान्यात सर्व मुली फ्री माइंडेड आहेत..मोकळेपणाने आपले विचार मांडतात, लोकांशी ओळखी करतात, याचा अर्थ असा नाही की ती लगेच आपल्याशी जवळीक करेल ..तुला मी फेसबुकवर मित्र म्हणून पाहिलं, आपलं बोलणं व्हायचं इतकंच..नंतर तुझंच स्थळ आलं आणि तुझ्याशी मी मोकळेपणाने बोलू शकले इतकंच..आणि आपलं बोलणं तरी काय व्हायचं रे? हाय, हॅलो व्यतिरिक्त? तू मला पाहायला आलेला तेव्हाही आपण याचा उल्लेख केला नाही.. कारण आपला संवादच नव्हता मुळी इतका..”

 

“चिडू नकोस…ते जाऊदे..आता मी काय म्हणतो, सुरजला नकार देऊन टाक.. पाच वर्षे थांब मग मी तुला घेऊन जातो..”

 

“अजिबात नाही, मला तुझ्या सगळ्याच गोष्टींवर संशय येऊ लागलाय आता. नाही करू शकत तुझ्याशी लग्न..”

 

“तुझ्या वडिलांवर कर्ज आहे ना?”

 

“त्याचं काय..”

 

“तू कितीही कष्ट केले तरी ते फेडू शकणार नाहीस, पण मी मात्र करू शकतो..बोल, काय वाटतं? तुझ्या वडिलांना मी आत्ता 10 लाख देईन…”

 

“कसं आहे ना अभिनव, तू मला विकत घेऊ पाहतोय..मी विकाऊ नाही, यापुढे मला काँटॅक्ट करू नकोस, अरे सूरज म्हणजे हिरा आहे हिरा..शोधूनही सापडणार नाही..त्याच्या नखाचीही सर तुला येणार नाही..”

 

कोमल त्याचा फोन कट करते..

 

______

 

सूरज कोमलच्या गिफ्ट साठी वणवण करत असतो. लग्न झालेल्या मित्रांना विचारून बघतो, ओळखीतल्या मैत्रिणींना विचारतो.. पण मनासारखं गिफ्ट काही मिळत नाही. त्याच्या ऑफिसमध्ये एक कीर्ती नावाची मुलगी असते, ती त्याला एक दुकान सुचवते. 

 

“सूरज अरे तिकडे व्हरायटी आहेत गिफ्ट्स ची..एक चक्कर मार त्या शॉप वर..”

 

“बरं.. नक्की कुठे आलं ते?”

 

“मी तुला लोकेशन पाठवते, थांब…नाहीतर संध्याकाळी चल माझ्यासोबत, मलाही घ्यायचं आहे गिफ्ट एकसाठी..”

 

“बरं जाऊया संध्याकाळी..”

 

सूरज संध्याकाळी गिफ्ट आणायची प्लांनिंग करून ऑफिसमध्ये आपल्या कामाला लागतो. तिकडे कोमलचा मूड आज पूर्ण खराब झालेला असतो. तीही ऑफिसमध्ये असते, अभिनव च्या अश्या वागण्याचा तिला संताप येतो. उगाच त्याच्यासोबत फेसबुकवर ओळख ठेवली असं तिला झालं. 

 

“अभिनव साधासुधा माणूस नाही, नक्कीच एखाद्या क्रिमिनल टाइप वाटतोय..” कोमल तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला सांगत असते.

 

“जाऊदे ना, सूरज सारखा गोड मुलगा मिळालाय तुला..कशाला अभिनव चा विचार करतेस आता..”

 

“हो तेही आहे..तुला माहितीये, मी ठरवलं होतं की प्रेम वगैरे भानगडीत पडणार नाही, पण सुरजने मात्र..”

 

“बोल बोल, मै तो तेरे प्यार मे दिवानी… आं… आं…”

 

“गप गं.. चला कामाला लागा..कामं पेंडिंग आहेत, सरांना रिपोर्ट द्यायचा आहे..” कोमल आपलं लाजनं लपवण्याकरिता विषय बदलते. 

 

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सूरज त्याच्या कार मधून शिखाला घेऊन जातो, गिफ्ट शॉप मध्ये. तिलाही काही वस्तू घ्यायच्या असतात, दोघेही शॉप मध्ये बरंच फिरतात, सुरजला मात्र तिथलंही काही पटत नसतं. शिखा आणि सूरज पुन्हा गाडीत येऊन बसतात..

 

“तुला मेन रोडला सोडू ना?”

 

“हो..”

 

____

 

कोमल आणि तिची मैत्रीण घरी जायला रिक्षा बघत असतात. रिक्षा मिळत नसते, तोच तिला समोरून सुरजची कार येताना दिसते. ती हात द्यायला पुढे जाणार तोच सूरज तिला एका मुलीसोबत दिसतो. कोमल आणि तिची मैत्रीण बघत असते..कोमलचा गैरसमज होतो. 

 

“सगळी मुलं एकसारखीच..” चरफडत ती पायी चालू लागते. तिची मैत्रीण तिला समजवण्याचा प्रयत्न करते.

 

“अगं गैरसमज का करून घेतेस? त्याचाशी बोल तर खरं..”

 

____

 

कोमल मेसेजचा रिप्लाय देत नाही बघून सूरज अस्वस्थ होतो. एका दिवसावर वलेन्टाईन्स डे येऊन ठेपलेला असतो पण अजूनही काही गिफ्ट सिलेक्ट झालेलं नसतं, आणि त्यात हे कोमलचं असं वागणं..ती त्याचा फोनही उचलत नाही..

 

“हॅलो पऱ्या…”

 

“कोमलला फोन कर आणि विचार काय झालंय ते.”

 

परेश फोन करतो पण कोमलचा फोन एंगेज येतो.

 

“सुऱ्या एंगेज येतोय नंतर करतो..”

 

“तिच्या मैत्रिणीचा नंबर पाठवतो तिला करून बघ, ऑफिसमध्येच असतील दोघी..”

 

परेश शिखाला फोन लावतो. 

 

“हॅलो कोण?”

 

“हॅलो मी परेश.. कोमलच्या होणाऱ्या नवऱ्याचा मित्र…”

 

“अच्छा…बोला..”

 

“कोमल कुठेय..फोन उचलत नाहीये ती..”

 

“ती actually… एक महत्वाच्या कॉल वर आहे..”

 

शेजारून कोमलचा आवाज येत असतो. परेश ती आवाज नीट ऐकण्याचा प्रयत्न करतो.

 

“धमकी देतोय मला? काय समजतोस तू स्वतःला? माझ्या वडिलांना बरबाद करशील? हिम्मत असेल तर समोर ये…तुला एकदा नकार दिलेला कळत नाही का..”

 

शिखा फोन ठेऊन देते. परेशच्या लक्षात येतं की कोमल कुठल्यातरी संकटात आहे ते..

 

अभिनव खरोखर एक गुन्हेगार प्रवृत्तीचा असतो. कोमल आणि तिच्या वडिलांनी दिलेला नकार त्याच्या जिव्हारी बसतो. त्याचा सूड घेण्याच्या प्रयत्नात तो असतो. 

 

“सुऱ्या…कोमल कुठल्यातरी संकटात आहे..”

 

“काय?”

एकतर कोमल बोलत नाहीये, त्यात तिला कुठलं संकट आहे हे समजायला मार्ग नाही.

 

“पऱ्या…आपले सोर्सेस लाव कामाला..”

 

____

 

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने कोमल आदल्या दिवशी रात्रीच गावी जाते. सुट्टीच्या दिवशी ती घरीच जात असते. त्या दिवशी रात्री कोमलच्या वडिलांच्या शेतात काहीतरी गडबड चालू असते.दोन माणसं तोंड लपवून काहीतरी हालचाल करत असतात. ही माणसं दुसरी तिसरी कुणी नसुन अभिनव आणि त्याचा एक सहकारी असतो.

 

“दादू, ह्या कॅन घे आणि सगळ्या शेतात ओतून दे…चार कॅन आहेत…ओतून झालं की मी इकडून पेटवून देतो, आपण बाजूला होऊ..”

 

दादू सर्व शेतात पेट्रोल ओतून देतो. काम झाल्यावर दोघेही बाजूला येतात. अभिनव काडीची पेटी काढतो आणि काडी खाली पाडतो. काडी तिथेच विझून जाते. अभिनव सारखा पेटवायचा प्रयत्न करतो पण कधी विझून जाई..अभिनव वैतागतो. तोच मागून 2 माणसं हिरोसारखी एन्ट्री करतात..

 

“शेताला पाणी देऊन झालंय..ए यांना 2-2 रुपये देऊन टाक..”

 

क्रमशः

 

 

3 thoughts on “तुही है आशिकी (भाग 11)”

Leave a Comment