तुमच्याही बाबतीत असं झालं आहे का??

तुमच्याही बाबतीत असं झालंय का?

वैतागत नाही तो माणूस कसला, दैनंदिन जीवनात अश्या काही गोष्टी घडतात की माणूस हैराण होऊन जातो. आणि हा अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला येतोच..तुमच्याही बाबतीत असं झालंय का?

१. ड्रॉवर उघडल्यावर एखादी न लागणारी गोष्ट नजरेस पडने, आणि नेमकी लागत असताना ती गायब होणे. 🤔🤔🤔
२. फोडणी देताना तेल खूप जास्त गरम झालेलं असताना घाईघाईने मसाल्याचा डबा उघडणे आणि नेमकं जिरे, मोहरी, मसाला किंवा हळद संपलेली असणे. 🤐🤐🤐
३. ज्या महिन्यात बचत करू असे ठरवले त्याच महिन्यात जास्त खर्च होणे🤑🤑🤑
४. तब्येत कमी झाल्यावर “तब्येत चांगली झालीये” असं ऐकून घेणे 😞😞😞
५. दिवा लावताना काडेपेटी न सापडणे 😔😔😔
६. एखादी वस्तू वर्षानुवर्षे भंगार मध्ये सांभाळून अखेर देऊन टाकणे, आणि नेमकं त्याच वर्षी त्याची गरज पडणे.😳😳😳
७. जास्तीचा स्वयंपाक केला की मुलांनी कमी जेवणे आणि नेमका केला असल्यास भुकेने ओरडणे.🤒🤒🤒
८. मोबाईल चार्जिंग ला लावणे अन बटन चालू करायचं विसरणे.🤧🤧🤧
९. फॅन कमी केले असता मच्छर चावणे अन वाढवल्यास थंडी वाजणे 😓😓😓
१०. महत्वाच्या ठिकाणी सही करताना पेन सोबत नसणे 😟😟😟
११. ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं तीच गोष्ट सतत मनात येणे 😖😖😖
१२. नेमकं परिक्षेच्या वेळी झोप येणे, आणि सुट्टीत झोप न लागणे 😴😴😴
१३. आवडती सिरीयल लागणार असता रिमोट न सापडणे 😣😣😣
१४. लाईट गेली आहे माहीत असतानाही मिक्सर सुरू करण्याचा प्रयत्न करणे. 🤕🤕🤕
१५. आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असतानाच नवीन संकट समोर येऊन धडकणे 😆😆😆

Leave a Comment