तिसरा डोळा-3

 तोही एकटाच असायचा..

दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले,

एकमेकांवर खूप प्रेम करत,

तिला त्याच्यासोबत राहून सगळं मिळालं होतं,

आयुष्यभर ज्या प्रेमाची आसुसलेली होती ते भरभरून मिळत होतं,तिच्याएवढं आनंदी कुणी नव्हतं..

एके दिवशी तिने त्याला सांगितलं,

आपल्याला समाजात राहायचं आहे,

लग्न करूया,

तो म्हणाला ठीक आहे,

पण त्या आधी तुला रीतसर मागणी घालेन, चल माझ्यासोबत..

त्याच्यावर इतका विश्वास होता की कुठे जायचं हेही विचारलं नाही तिने,

त्याने तिला गाडीत बसवलं,

एका दूर सूनसान ठिकाणी नेलं,

त्याने तिला उतरायला सांगितलं,

ती उतरली,

तो खाली गुडघ्यावर बसला,

तिला आकाश ठेंगणं झालं,

त्याने खिशात हात घातला,

आणि सूरा बाहेर काढला,

त्याच्या डोळ्यातले हावभाव बदलले,

चेहऱ्यावर अमानुषता दिसू लागली,

तो म्हणाला,

“तुझं काम झालं, आता माझ्या आयुष्यात येऊ नकोस..माझी बायको अन मुलगा आहे , तुझ्याशी टाईमपास केला..आता माझं काम संपलं..”

ती सुन्न झाली, गयावया करू लागली,

“माझं प्रेम आहे तुझ्यावर, तू असा कसा वागू शकतोस? असं करू नकोस..”

“आता तुला जिवंत ठेवलं तर माझ्या मागे तगादा लावशील लग्नाचा, मला हैराण करशील..तुला वर पाठवलेलंच ठीक राहील.”

त्याने तिच्या गळ्याजवळ सूरा नेला..

पण तिच्या चेहऱ्यावर काही हावभाव नव्हते,

कसलीही भीती नव्हती,

तिने तिच्या जीन्सच्या मागच्या खिशातून सूरा काढला अन कसलाही विचार न करता त्याच्या पोटात खुपसला..

तो विव्हळत खाली बसला,

हे सगळं कल्पनेच्या पलीकडे होतं,

ती त्याच्या प्रेमात इतकी वश झालेली की असं काही करेल याची शंकाही आली नाही त्याला..

“तुला काय वाटलं..मला वापरून सोडून देशील? हो, तुझ्या प्रेमात झालेली मी आंधळी..पण तिसरा डोळा शाबूत होता माझा…तू कधीही दगा देऊ शकतोस हे कळलं होतं…तेव्हाच ठरवलं, मिळालं तर प्रेम…नाहीतर सरळ शिक्षा…अरे दुनिया बघितली आहे मी..प्रेमापेक्षा आयुष्य महत्वाचं…प्रेम दुसरं मिळेल, पण आयुष्य एकच..”

असं म्हणत त्याला ती तिथेच सोडून गेली,

गेल्यावर पोलिसांना स्वाधीन झाली,

पोलिसांनी त्याला उचललं,

तो जिवंत होता,

त्याला बरं केलं,

स्वराक्षणासाठी तिचा हल्ला सिद्ध झाला,

तो रीतसर जेलमध्ये गेला..

आणि तिने सुरवात केली नव्या आयुष्याला..

कारण तिला कळलं होतं,

प्रेम हा आयुष्याचा भाग आहे,

संपूर्ण आयुष्य नाही..

प्रेम मिळालं नाही तरी चालेल,

पण आयुष्य शाबूत राहायला हवं..

समाप्त

3 thoughts on “तिसरा डोळा-3”

Leave a Comment