तिसरा डोळा-2

जबाबदारी अंगावर घेतली होती,

मोठा भाऊ सांगायचा,

एका ठिकाणी पैसे भरायचेत,

ते भरले की काम मिळेल,

लहान बहीण क्लाससाठी पैसे न्यायची,

वडिलांचं सगळं करून त्यांना किंमत नव्हती,

नोकरीसाठी बाहेर राहते तर शंका घ्यायचे तिच्यावर..

तिचा जीव घुसमटत होता,

पण जबाबदारी सोडू शकत नव्हती,

तिची ओळख एका मुलाशी झाली,

दुसऱ्या धर्माचा तो,

पण खूप प्रेमळ,

त्याला हिची दया यायची,

तिच्याबद्दल तो चांगलं बोलायचा,

तिला आधार द्यायचा,

प्रेम द्यायचा,

काळजी करायचा,

लहानपणापासून प्रेमाची भुकेली ती,

पटकन प्रेम स्वीकारलं,

लग्नाचा विचार तिच्या मनात होता,

पण लग्नासाठी घरचे तयार होतील?

दुसऱ्या धर्माचा म्हणून नाहीच, पण मी लग्न करावं असा विचार तरी त्यांच्या मनात येतो?

रीतसर स्थळ बघणं, लग्न काढणं..

घरचे कधीच करणार नाही, हे माहीत होतं..

कारण तिच्यावरच सगळं चालत होतं..

एके दिवशी तिला बाहेरून कळलं,

भाऊ कामासाठी नाही, जुगारासाठी पैसे न्यायचा,

आणि बहीण तिच्या मित्र मैत्रिणींसोबत पार्ट्या करण्यासाठी पैसे न्यायची, क्लास साठी नाही..

त्या दिवशी घरी जाब विचारायला ती पोचली,

वडिलांनी उशीर झाला म्हणून शिव्यांची लाखोली वाहिली..

तिला समजलं,

सख्खे सुद्धा स्वार्थी झालेत,

कसले भाऊ बहीण अन कसला बाप..

माझा फक्त वापर केला जातोय,

तिने बॅग भरली,

घर सोडलं,

त्याच्याकडे गेली,

****

भाग 3

तिसरा डोळा-3

2 thoughts on “तिसरा डोळा-2”

Leave a Comment