तिची काय चूक?-3

 

 तू सांगितल्यावरच आणेल का तो?

 

माझा मुलगा आहे, न सांगता करेन…

 

ज्याने कधी एखादं फळ घरात आणलं नव्हतं त्याच्याकडून आज शहाळे आणण्याची अपेक्षा..

 

दादा बायकोचं ऐकतो की बहिणीचं?

 

नणंदेला परीक्षा घेऊ वाटे,

 

ते दोघे कुठे निघाले की ती तिचं काम पुढे करी,

 

दादाला पेचात पाडी,

 

मग तीच म्हणायची,

 

 

मी जाईन बस ने, तुम्ही ताईंना सोडा…

 

नको नको, कशाला..मी जाईन माझी माझी..बायकोला सोडणं महत्वाचं..

 

वर हे असं..

 

यात तिची काय चूक?

 

तो म्हणाला,

 

काही रक्कम आहे माझ्याकडे, भविष्यासाठी गुंतवणूक करू..

 

अहो पण आधी ताईंच्या लग्नासाठी पैसे ठेवा..

 

ते कधीच काढलेत बाजूला,

 

मग ठीक आहे..

 

दोघेजण गुंतवणूक करू पाहतात,

 

लक्षात येतं,

 

त्याच्या एकट्याचा पगार पुरणारा नसतो,

 

तो तिला म्हणतो,

 

 

तू शिकलेली आहेस, नोकरी बघ..

 

तीही प्रयत्न करते,

 

तिला नोकरी लागते,

 

घरच्यांना आनंद होत नाही,

 

बर उलट प्रश्न,

 

आता घरातलं कोण बघणार?

 

मी सगळं करून जाईन,

 

ती हिरमुसून म्हणते,

 

तिची तारेवरची कसरत होऊ लागते,

 

नणंद मठ्ठ,ना शिक्षण ना नोकरी,

 

तिला हेवा वाटतो,

 

“महाराणी गेल्या, महाराणी आल्या..” अश्या भाषेत संबोधण्यात येऊ लागते,

 

वहिनीचं टापटीप राहणं,

 

सुंदर दिसणं,

 

 

माय लेकींना खटकू लागतं,

 

मग तिला घाई झाली, की मुद्दाम चार वाढवा कामं सांगणं..

 

तिला कचाट्यात टाकणं..

 

मजा येई त्यांना,

 

आणि कामं झाली नाही की त्याच्याकडे तक्रार करणं..

 

नोकरीला जायला लागली तशी घराची साफसफाई सुद्धा होत नाही…

 

तो विश्वास ठेवे,

 

बायकोला म्हणे,

 

नोकरी करायची याचा अर्थ घरातली कामं सोडायची असं नाही,

 

सगळं करून जाते हो मी,

 

पण कपडे वाळत टाकणं, जेवण झाल्यावर झाडाझुड, ताटं धुणं याला मी घरी तरी हवी ना? नोकरीच्या ठिकाणी असतांना कशी करू मी ही कामं?

 

 

दोघांमध्ये खटके सुरू झाले,

 

यात तिची काय चूक?

 

नोकरीत जम बसला,

 

दोघांनी लोन काढलं,

 

गुंतवणूक म्हणून एक प्लॉट घेतला,

 

घरच्यांना सहन झाले नाही,

 

हे फक्त यांच्या संसाराचं बघताय,

 

घरच्यांना विसरला हा…

 

मग आई त्याच्याकडे तगादा लावे,

 

मला राणी हार हवा आहे,

 

बहीण म्हणायची,

 

दादा मला नवीन मोबाईल हवा आहे,

 

 

आधीच पगारातून हफ्ता कट होत असल्याने तो नकार देई, नंतर बघू म्हणे,

 

 

माय लेकी कुजबुज करू लागल्या,

 

मोठमोठ्या जमिनी घ्यायला बरं पैसे आहेत,

 

आमच्यासाठी काही करायला नको,

 

कसं करेल? बायको आली ना आता,

 

ती म्हणत असेल,

 

कशाला आई बहिणीला पैसे देता? 

 

त्यांचा राग वागण्यातून दिसून येई..

 

तिने भरपूर प्रयत्न केला,

 

मनं जिंकण्याचा..

 

घरच्यांना आपलंसं करण्याचा…

 

पण हे फक्त एकतर्फी असेल,

 

आणि दुसऱ्या बाजूने केवळ फटकळपणा असेल..

 

तर कसं चालेल?

 

समोरचा आपला विनाकारण द्वेष करतोय,

 

यात तिची तरी काय चूक?

 

वयानुसार तिलाही दुखणी वाढू लागली,

 

कामं होत नसत,

 

भरपूर प्रयत्न केला,

 

पण शरीर थकून जाई,

 

तिने शेवटी प्रयत्न सोडला,

 

कितीही केलं तरी पालथ्या घड्यावर पाणी,

 

आता बस,

 

ऐकून घ्यायचं नाही,

 

अन्याय सहन करायचा नाही,

 

तीही टोमण्यांना उत्तर देऊ लागली,

 

कामं कमी केली,

 

सर्वांसाठी जीव काढणं बंद केलं,

 

घरच्यांना अजून चेव आला,

 

त्याचे कान भरण्यात आले,

 

 

नवरा बायकोमध्ये वाद टोकाला जाऊ लागले,

 

अखेर ती म्हणाली,

 

आपला घरच्यांना आणि घरच्यांना आपला त्रास नको,

 

आपण वेगळे राहूया…

 

तो म्हणाला,

 

शेवटी दाखवलास ना तुझा खरा चेहरा..मला म्हटली होतीस की आदर्श कुटुंब बनवेन..आता कुठे गेला तुझा तो तोरा?

 

ती त्याच्याकडे फक्त बघत राहिली..

 

दिलेला शब्द आणि आता असलेलं वास्तव,

 

 

यात ईर्षा, द्वेष, कट कारस्थानं, अन्याय यांचे निखारे होते,

 

शब्द दिलेला असला तरी प्रत्यक्षात असलेलं वास्तव जास्त भयानक होतं..

 

जे त्याला दिसत नव्हतं,

 

ती निरुत्तर झाली,

 

आणि आहे ते वास्तव स्वीकारण्यासाठी सज्ज झाली…

 

समाप्त

 

17 thoughts on “तिची काय चूक?-3”

 1. Mi yatun gelele aahe Ani maze tar sasre hi khup bolayche motha hunda hava hota tyanna shevti mi farkati gheti dusre lagna safal zale 17 varsh sansar Kela Ani kidney vikar Ani corona ni yajman maghchya February la gele🥰😭

  Reply
 2. खूप सुंदर कथा आहे जणू आमच्या मनातले विचार योग्य शब्दात मांडले आहेत

  Reply
 3. Khari katha ahe, yatun divorce paryant vishay jato Ani aai Ani bahinina tyabaddal kahich vatat nahi, very sad reality

  Reply
 4. खरंच प्रत्येक घरातली गोष्ट वाटते..नवरा हा फक्त हुकूम सोडणारा हुकूमशहा वाटतो..बायको कडून अपेक्षा करायच्या आणि स्वतः कधी बदलणार..मला ह्याच गोष्टी चे वाईट वाटते..नवरा त्याचे घरचे का नाही स्वतः मध्ये बदल करत फक्त सूने कडून का अपेक्षा..

  Reply
 5. नवर्याला हे सगळ दिसत नाही त्यांचा फक्त त्यांच्या आईवर् विश्वास असतो, पन कधी पत्नीचही ऐकून घ्याव, तिलाही मन आहे, ती स्वतःचे सर्व गनगोत् सोडून आलीय, तिला कुनी समजून घ्यायच, अशी उब ज़र घरातून मिलाली नाही तर सहजिकच बाहेर कुनी काळजी करणार मिळाल तर मन तिकडे आकर्षित होनरचकारन् कुणालाही मायेंचा ओलावा हवा असतो, आणि मग् सगळ ते होत ज्याचा कधी विचारही केला नव्हता

  Reply
 6. वाचताना अगदी माझ्या बाबतीत घडलेले प्रसंग आठवले मी पण खुप प्रयत्न केले पण शेवटी वेगळं निघावं लागलं नशिबाने यजमान खुप प्रेमळ आहेत पण आधी माझी आई वाईट वागूच शकत नाही असे वाटायचे त्यांना जेव्हा स्वतः पहिले तेव्हा खरं समोर आलं

  Reply
 7. या सगळ्यातून मी गेले… खूप त्रास सहन करावा लागला सासू सासरे आणि लहान नणंद… शेवटी नवऱ्याने वेगळं राहायचं ठरवलं…. तोही blame माझ्यावरच की माझ्या मुलाला आमच्या पासून वेगल केलं…

  Reply
 8. Asach ahe saglikade navra fkt aaplya aai babana japto tyanchyavar vishwas thevto, but saglya Nati baykonech sambhalavya Ashi apeksha aste tyachi

  Reply
 9. वास्तव आहे हे जे तुम्ही तुमच्या लेखनातून माडले…

  Reply
 10. स्वतःच्या चामडी ची पायतान करून जरी घातली तरी सासरच्या लोकांच्या अपेक्षा कमी होत नाहित… चांगुलपणाचा गैरफायदा घेत राहतात….😏😏

  Reply
 11. वास्तविकता… जास्त करुन खूपदा पहायला मिळते अस

  Reply

Leave a Comment