तिची काय चूक?-1

99% घरातील सत्य परिस्थिती,

दोघांचं लग्न ठरतं,

तो- तुला माझ्या घरच्यांना सांभाळून घ्यावं लागेल, त्यांची मनं जपावी लागतील..

ती: हे काय सांगणं झालं?

तो: आणि हो, वेगळं राहायचा विचारही करायचा नाही.

ती: काळजी करू नकोस, मी स्वार्थी मुलींमधली नाही, आपलं कुटुंब असं बनवेन की लोकं आपल्या कुटुंबाचा आदर्श घेतील.

बस, त्याला हेच ऐकायचं होतं, तो त्याच्या निवडीबद्दल निश्चिन्त झाला..

दोघांचं लग्न झालं,

ती घरी आली,

घरी सासू, सासरे, दीर, नणंद..

सर्वांशी नम्रतेने वागत होती,

कामाची सवय नसतांना प्रयत्न करत होती,

करियरचा विचार थोडावेळ बाजूला ठेवला,

चुकत चुकत शिकत होती,

सासू आणि नणंदेच्या मनात वेगळाच धाक,

सगळं करू पाहतेय,

उद्या आपली गरजच राहणार नाही असं नको व्हायला..

तिकडून सासरे आवाज देतात,

“सुनबाई, शिरा उत्तम जमलाय हो, आजवर इतका चविष्ट कधी खाल्ला नाही”

सासूबाईंना कौतुक करावं वाटे पण असुरक्षितता वाटे,

***

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a5%82%e0%a4%95-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a5%82%e0%a4%95-3/

Leave a Comment