तिचं विश्व -1

ती रस्त्यावर अचानक चक्कर येऊन पडली आणि आजूबाजूचे सगळे लोकं जमा झाले..

चार माणसांनी तिला उचलून जवळच्या दवाखान्यात नेलं..

डॉक्टरांनी तिला तपासलं,

उपाशीपोटी उन्हात फिरत असल्याने तिला भोवळ आलेली,

तिला सलाईन लावली आणि ज्यूस प्यायला दिलं..

सोबत आलेली माणसं तिथेच होती,

“मावशी तुमच्या घरी फोन लावतो”

“नको रे बाळा, मी बरी आहे आता..जाईन बरोबर, फार मदत झाली तुम्हा पोरांची”

“मदत कसली काकू, आमचं कर्तव्यच आहे”

“माझ्या घरी कळवलं तर घाबरतील ते, धावपळ करत येतील”

“मग काकू तुम्हाला घरी तरी सोडतो, असं एकटं टाकून जायला आम्हाला बरं नाही वाटत”

“बरं, मला घरी सोडा फक्त”

तिची सलाईन संपली आणि ती बाहेर आली,

ती मुलं डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकल मध्ये जात होती तोच तिने अडवलं..

“अरे राहुद्या मुलांनो, माझी मुलं आणतील बरोबर औषधं”

मुलांनी तिला घरी सोडलं आणि ती घरात आली..

ती आली तेव्हा नवरा पेपर वाचत होता, मोठा मुलगा मंदार मोबाईल बघत होता आणि लहाना केदार कसलीतरी डॉक्युमेंट चाळत होता..

तिच्या मनात आलं,

“यांना कल्पनाही नाही माझ्यासोबत काय झालं ते, ऐकलं तर घाबरतील आणि मला डोक्यावर घेतील”

पण सांगणं भाग होतं,

तिने हळूच सांगितलं..

“अहो..आज मी रस्त्यावर चक्कर येऊन पडले”

सर्वांनी तिच्याकडे वर पाहिलं..

***

भाग 2

2 thoughts on “तिचं विश्व -1”

Leave a Comment