डॉक्टर cool (भाग 4)

त्या मोलकरणीची शुगर टेस्ट केली, तिला काही शुगर वगैरे नव्हती. शिल्पा ला खात्री पटली की हे सगळं ती अवयव चोरणारी गॅंग करत आहे. तिने आकाश ला याबद्दल कळवलं, आकाश ने प्लॅन करून त्या गॅंग ला पकडायचं ठरवलं.

त्या मोलकरणीला पुन्हा बोलावण्यात आलं, तिला सांगितलं की पुन्हा ते डॉक्टर घरी आले की सरळ आम्हाला फोन करायचा. मोलकरणीने संमती दिली.
काही दिवसांनी मोलकरणीकडे ते डॉक्टर पुन्हा आले, तेव्हा ती शिल्पा ला फोन लावू लागली, त्या गॅंग मधल्या काहींना शंका आली, त्यांनी तिच्याकडून फोन हिसकवला आणि धमकावून तिला सत्य विचारलं. तिने घाबरून सर्व सांगून टाकलं आणि ती पुन्हा त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेणार नाही हेही त्यांना सांगितलं.

गॅंग मधल्या लोकांनी तिला आमिष दाखवलं, हेही सांगितलं की एक किडनी देऊन काहीही नुकसान होत नाही, त्याबद्दल तिला 50 लाख रुपये देण्याचं त्यांनी कबुल केलं. मोलकरणीला इतकी मोठी रक्कम ऐकून भुरळ पडली. तिने शिल्पा मॅडम ला न कळवण्याचं ठरवलं.

शिल्पा आणि आकाश तिच्या फोनची वाट बघत होते, पण तिचा फोन आला नाही. त्यांनी तिच्या मालकिणीला फोन लावला आणि असं कळलं की मोलकरीण कधीही कामाला येत नाहीये. शिल्पा ला संशय आला, तिला समजलं की मोलकरीण ला नक्की पैशांचं आमिष दाखवलं गेलं असणार, अशात आता तिला गाठणं अवघड होतं, कारण तिचा पत्ताही माहीत नव्हता.

आकाश ला निदान एवढं तरी समजलं की ही टोळी डॉक्टर बनून गरीब लोकांच्या घरात जाऊन हे सगळं करताय.

अक्षरा चा वाढदिवस होता, तिला काही खरेदी करायची असल्याने तिने शिल्पा ला सोबत घेतलं आणि मॉल मध्ये ते खरेदीला गेले. परत येताना रस्त्यात एक अपघात झालेला असतो, एक गरीब मुलगी रक्तबंबाळ झालेली असते…लोकं फक्त बघत असतात, शिल्पा ने प्रसंगावधान राखून तिला चेक केलं आणि तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. वेळेवर पोचल्याने तिचा जीव वाचला…

संध्याकाळी ती मोलकरीण शिल्पा च्या घरी हजर झाली,

“मॅडम मला माफ करा, पैशांनी मला भुरळ पाडली आणि मी तुम्हाला दगा दिला..पण तुम्ही माझ्या मुलीचे प्राण वाचवले…”

“ती तुझी मुलगी होती तर..”

“हो…बाईसाहेब…मला त्या लोकांनी एक किडनी द्यायला सांगितली, बदल्यात 50 लाख रुपये देणार होते..”

“तुला काय वाटतं? एक किडनी घेऊन भागेल त्यांचं? अगं तुझे सगळे अवयव काढले असते त्यांनी आणि तुझ्या घरी खोटं सांगितलं असतं की ऑपरेशन च्या वेळी तुझा जीव गेला असं.”

मोलकरीण घाबरते…

“ताईसाहेब तुम्ही सांगा आता मी काय करू.”

“यावेळी माझं ऐक… ती लोकं आली की तडक मला कळव..”

“मॅडम ती लोकं नजर ठेवून असतात, फोन हातात घेतला की संशय येतो त्यांना.”

“ठिके, मग मी आकाश ला सांगून काही पोलीस तुझ्या घराच्या पाळतीवर ठेवते..”

आकाश काही पोलिसांना मोलकरीण च्या घराची पाळत ठेवायला सांगतो…जशी ती टोळी डॉक्टर च्या वेशात येते तसे पोलीस घराला वेढा घालतात आणि आकाश ला खबर करतात…

आकाश निघाला तोच शिल्पा म्हणाली,

“मीही येते सोबत…”

“वेडी आहेस का… तिथे झटापट होऊ शकते..”

“मला यायचं आहे..”

“अजिबात नाही..”

आकाश तातडीने तिकडे जातो…शिल्पा ला राहवत नाही, ती सुद्धा मागोमाग गाडी काढते आणि निघते…

तिकडे गेल्यावर 5 पोलिसांनी घराला वेढलेलं असतं, आकाश बंदूक रोखून आत जातो…

हात वर करा, आम्ही तुम्हाला अटक करतोय..”

आत साधारण 3 माणसं असतात, त्यातला एकजण मुलीला ओलीस धरतो… आणि तिच्या गळ्याभोवती चाकू धरतो…

“बाजूला व्हा, आम्हाला जाऊद्या…नाहीतर ह्या मुलीचे प्राण जातील..”

पोलीस बंदूक खाली ठेवतात, गुन्हेगार मुलीला पकडत गाडी जवळ जातात, गाडीजवळ जाताच तो मुलीला लांब ढकलतो आणि गाडीत बसतो…

गाडीतल्या ड्राइव्हर ला तो गाडी सुरू करायला लावतो…पण ड्राइवर तटस्थ असतो…हे तिन्ही गुन्हेगार घाबरतात…मागच्या सीट वरून एक आवाज येतो..

“इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध केलंय… तुम्हालाही देऊ काय??”

शिल्पा आधीच गाडीत जाऊन बसलेली असते आणि ड्राइवर ला तिने इंजेक्शन मारून बेशुद्ध केलेलं असतं…

गाडी सुरू होत नाही पाहून पोलीस पटकन तिथे धावतात, पाहिलं तर शिल्पा तिथेच बसलेली असते…आकाश घाबरतो..

“शिल्पा??? तू ठीक आहेस ना?? तुला काही झालं तर नाही ना?? या लोकांनी तुला कधी kidnap केलं??”

“मला नाही, मी यांना kidnap केलंय..”

बाकीचे पोलीस हसायला लागतात…

“साहेब…मॅडमना सांगा, डॉक्टरकी सोडून पोलिसात सामील व्हा म्हणून..”

क्रमशः

डॉक्टर cool (भाग 5)

10 thoughts on “डॉक्टर cool (भाग 4)”

  1. how to buy clomid no prescription where can i buy generic clomid tablets where to buy generic clomiphene pill how to buy cheap clomid cost of cheap clomiphene without a prescription clomid one fallopian tube where buy generic clomid no prescription

    Reply

Leave a Comment