डिसेंबर 2020 मध्ये असा असेल कोरोना..(corona in future)

Corona in future
Future condition of corona

कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेतली नाही तर डिसेंबर 2020 काही अश्या प्रकारे असेल….

(डिसेंम्बर 2020)

(स्थळ: गल्ली)

“अरे मास्क नीट कर…आणि समोरच्या गल्लीत जाऊ नकोस..”

“हो मी पण ऐकलं आहे…ए पोरांनो तिकडे खेळायलाही जायचं नाही आता..”

“होना, तो एरिया असही सील केलाय….मित्रांनाही मेसेज करून देतो..”

तिसरा मित्र येतो..

“काय रे काय झालं?”

“तो समोरचा एरिया सील केला आहे…जाऊ नको तिकडे”

“हो माहितीये…तिथे एक कोरोना निगेटिव्ह आहे ना??? सांभाळा सर्वांनी..quarantine केलंय त्याला.”

______________

स्थळ: इंटरनेट

निबंध स्पर्धा: मला झालेला कोरोना

शीर्षक:
“माझा कोरोनाचा अनुभव”
“माझ्या घरातला कोरोना..”
“माझ्या कोरोनाची लक्षणे..”

_______________

स्थळ: हॉटेल

“तुला आधी सांगायला काय झालं? तुझ्यामुळे तू किती लोकांना धोक्यात टाकलंस..”

“साहेब मला खरंच माहीत नव्हतं..”

“टेस्ट करून घ्यायची ना, तरी बरं मी स्वतःहून तुम्हा सगळ्यांची टेस्ट करून घेतली, तू एकटा निगेटिव्ह आहेस…तुझ्यामुळे तू इतरांना धोक्यात टाकलं…तुला झाला असता कोरोना मग कोणाकोणावर आळ घेणार होतो मी? जा आता घरी…सगळे बरे होईपर्यंत यायचं नाही..सेल्फ आयसोलेशन मध्ये ठेव स्वतःला..”

__________

स्थळ: ऑफिस

पिउन: साहेब सर्व तयारी झाली आहे, पण सत्कार कोणाचा करायचा आहे नक्की?

साहेब: निलेश चा..

पिउन: कोरोना वर मात केली त्याने म्हणून?

साहेब: नाही रे, आपल्या ऑफिस मध्ये तो एकमेव असा आहे जो शेवटपर्यंत कोरोना निगेटिव्ह राहिला…

_____

स्थळ: मुलीचं घर

मुलगा: मामा, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे

वडील: आमच्या मुलीसाठी आम्ही श्रीमंत मुलगा बघतोय

मुलगा: मी डॉक्टर आहे

वडील: तरीही नाही देणार माझी मुलगी

मुलगा: माझी स्वतःची covid टेस्टिंग लॅब आणि covid वॉर्ड आहेत

वडील: मुहूर्त केव्हा ठरवायचा?

_________

स्थळ: घर

सुशील (फोनवर): काय रे, बरं नाही का तुला?

मिलिंद: होना रे, अंग दुखतंय, ताप आलाय

सुशील: का रे डेंग्यू झाला की काय? की मलेरिया??

मिलिंद: नाही रे…ते…

सुशील: मग कावीळ झाली की काय? सांभाळ रे बाबा, डॉक्टर कडे गेला होतास का..

मिलिंद: अरे कोरोना झालाय कोरोना

सुशील: हात्तीच्या…एवढंच ना? मला वाटलं फार मोठं काहीतरी झालंय… काळजी करू नको, मीही quarantine आहे…

_______

वरील प्रसंग नको असतील तर आत्ताच काळजी घ्या…

Leave a Comment