टेक्निकल संसार (भाग 5)

 

श्वेता ने ती
लँग्वेज शिकायला सुरवात
केली..सोबतच घरातलं
स्वयंपाकाचं ट्रेनिंग चालू होतं

 

आई..मला गाजर
हलवा शिकवा…”

 

का गं असा
अचानक??”

 

उद्या बाबांचा वाढदिवस आहे
ना..”

 

अरेच्या..मी विसरले
होते बघ..तुला
बरं लक्षात राहीलं..”

 

हो मग..सर्वांच्या
वाढदिवसाचा डेटाबेस मेंटेन केलाय
मी..”

 

सासूबाई हसल्या..

 

बरं तुला प्रोसेस
सांगते, त्यानुसार कर..”

 

सासूबाई तिला सगळी
रेसिपी सांगतात..आणि
दुसऱ्या दिवशी श्वेता
छानसा गाजर हलवा
सर्वांना वाटते..घरात
सर्वजण खुश होतात

 

आई..मी हलवा
केलाय खरं.. पण
वस्तू मला सापडत
नव्हत्या लवकर..”

 

होना गं.. किचन
मधल्या वस्तू इतक्या
झाल्या आहेत ना की वेळेवर
सापडत नाही..”

 

मी अरेंजमेंट करू का मग??”

 

हो..का नाहीआता तुझंच
घर आहे..”

 

श्वेता पूर्ण दिवस
किचन आवरायला घेतेआणि वस्तूंची
मांडणी करते..

 

सासूबाई येऊन विचारतात..”काय गं
झालं का? मलाही
सांग कशी अरेंजमेंट
केलीये ते..”

 

हे बघामसाल्याचे
पदार्थएकाच data type चे असल्याने
त्यांना त्या डब्याच्या
array मध्ये fix केलंयआणि रोजच्या
ज्या वस्तू लागतात
जसं की शेंगदाणे,
डाळ, तांदूळ, रवात्या समोरच्या
काचेच्या बरण्यांमध्ये manage केलेतलेबल लावून
त्यांना pointer दिलायफ्रीज मध्ये
stack नुसार जो भाजीपाला
लवकर खराब होतो
तो सर्वात वर
ठेवलाय, म्हणजे आपल्या
लक्षात येईल आणि
LIFO (last in first out) नुसार सर्व भाजीपाला
वापरला जाईल

सर्व डब्यांवर कंमेंट लाईन
लिहिल्या आहेत..म्हणजे
मध्ये काय आहे ते लगेच
सापडेल..कडधान्य sorting alogorithm वापरून अरेंज
केलाय..कसं आहे,
काही कडधान्य वापरली
नाहीत तर त्यात
अळया होतात, बुरशी
लागतेम्हणून ती
सर्व वापरली पण
गेली पाहिजे आणि
खराबही होणार नाही
अशी व्यवस्था केलीये…”

 

एका संसारी बाईलाही
इतके बारकावे माहीत
नसतील इतके बारकावे
श्वेता ने हेरले
होतेसासूबाईंनी तडक
श्वेतात च्या आईला
फोन लावून श्वेता
चं तोंड भरून
कौतुक केलं..

 

पाहिलत
का..श्वेता सगळा
स्वयंपाक शिकलीयेकिचन आवरलं
तिने आज..घर अगदी उत्तम
ठेवतेसर्व सण वार अगदी
साडी नेसून साजरे
करते..तक्रारीला काही
जागाच नाही हो..”

 

आई घाबरलीइतका मोठा
टोमणा??

 

ताई मी तुम्हाला
आधीच सांगितलं होतं
नाश्वेता ला
काही येत नाही
म्हणूनआता मी
तरी काय करू..”

 

अहो तुमचा विश्वास
बसत नाहीये का??
मी खरं बोलतेय…”

 

आई आता चक्कर
येऊन पडायचीच बाकी
होती..हे मी नक्की श्वेता
बद्दलच ऐकतेय ना?
त्यांना प्रश्न पडला..

 

काही दिवसांनी श्वेता आनंदाने
सासूबाईंकडे आली..

 

आई.. मी kotlin शिकलेसुरवातीला
वाटलं किती अवघड
आहेपण जमलं मलाबघा
मी एक application सुद्धा
बनवलं यात..”

 

सासूबाई तिच्या जवळ
आल्या

 

मग..कसा होता
शिकण्याचा अनुभव??”

 

सुरवातीला
खूप अवघड गेलंपण हळूहळू
सवय झाली..आणि
आता अगदी एक्सपर्ट
झालीयेसगळा शीण
निघून गेलाय अगदीआणि नवीन
ऍप्लिकेशन बनवल्याचं खूप समाधान
मिळालं मला…”

 

होना..आता मी
काय सांगते ते
नीट ऐक.. तुला
राग येऊ देऊ नकोसहे
बघ, नवनिर्मिती चा
आनंदच काहीसा वेगळा
असतो..जेव्हा आपण
मूल जन्माला घालतो
तेव्हा तो वेगळा
जीव नसून आपलंच
प्रतिबिंब असतं. तुला
आवडणार नाही का?
तुझंच प्रतिबिंब तुझ्या
डोळ्यासमोर अगदी इवल्याश्या
जीवात? त्याच्या हसण्या
बोलण्यातून तू स्वतःला
पाहशीलहरवून जाशील
त्याच्यात..तुला जसं
एका हुशार आणि
कर्तबगार मुलीचं बिरुद
मिळालंय, त्याही पेक्षा
मोठं असं एका स्त्रीत्वाचं वरदान तुला
लाभलंयआपल्या गर्भातून
हे विश्व साकारण्याचं
नवनिर्माणाचं.…ते वरदान
वाया जाऊ देऊ नकोसविचार कर
एकदा…”

 

सासुबाईंचा शब्दन शब्द
श्वेताच्या काळजात घुसत
होताकितीही म्हटलं
तरी मातृत्वाची एक
आशा तिच्या मनात
खोलवर होतीपण
ती कधी बाहेर
आली नव्हतीती
आज आलीतिला
गर्भाच्या विलक्षण संवेदना जाणवू
लागल्या..

 

श्वेता ला आईपणाची
आशा जागृत झाली.
सासुबाईंचं म्हणणं तिला
पटलं होतंएक
नवीन जीव जन्माला
घालायचा, जे आपलंच
एक प्रतिबिंब असेल..ही भावनाच
तिला खूप सुखावत
होती.

 

संध्याकाळी सोहम घरी
आलाती म्हणाली..

 

नवीन प्रॉडक्ट् लाँच करू
म्हणतेय..”

 

करातुम्हाला दुसरं काही
सुचतं तरी का..”

 

सोहम चा राग
अजूनही गेलेला नसतो..

 

म्हणजे
रेप्लिकेट करायचंय प्रॉडक्ट्…”

 

कसलं रेप्लिकेट…”

 

आपल्या
दोघांचं..”

 

काय बोलतेयस..”

 

आपल्या
दोघांचा स्वभाव inherit करून
आपल्यापासून एक नवीन
प्रॉडक्ट्..”

 

सोहम ला हे
बोलणं कळत नव्हतं
..तो वैतागून खोलीच्या
बाहेर गेला अन तितक्याच वेगाने परत
आला..

 

एक मिनिटआपलं रेप्लिकेट
म्हणजे…”

 

श्वेता हसायला लागते

 

श्वेता??
तूआई..”

 

होय..मी आई
होण्याचा निर्णय घेतलाय…”

 

सोहम आनंदाने वेडा होतोश्वेता ला
उचलून तो गिरक्या
घेऊ लागतो

काही दिवसांनी श्वेता ला
आनंदाची बातमी समजतेआणि घरात
एकच आनंद पसरतो….सासूबाईंचे डोळे भरून
येतात..त्या श्वेता
च्या आईला फोन
लावतात..

 

अभिनंदन
तुम्ही आजी होणार
आहात..”

 

श्वेता च्या आईची
बोलतीच बंद होते..आनंदाच्या धक्क्याने तिचे
बोल फुटतच नाही

 

श्वेता सासूबाईंकडे जाते आणि
विचारते

 

आता मी dual प्रॉडक्ट् carry करतेयकाही विशेष
असं करावं लागेल
का??”

 

स्वतःची
काळजी घ्यायची फक्तवेळेवर जेवण,
फळं आणि दूध पीत जा
वेळेवर..”

 

सासूबाईमी इतकं
काम केलंतुम्ही
सांगितल्याप्रमाणे लोकेशन चेंज
केलंसॉफ्टवेअर डेव्हलप
केलंपण मला त्या बदल्यात
काहीच पगार मिळाला
नाही अजून..”

 

सासूबाई धास्तावतातश्वेता टेक्निकल
विचार करते मग सॅलरी सुद्धा
मागणार हे त्यांच्या
लक्षातच आलं नाही..

 

किती हवीय तुला?”

 

माझ्या
आधीच्या कंपनीत जेवढी
मिळायची त्याहून जास्त..”

 

सासूबाईंनी माहिती काढली,
श्वेता ला 40 हजार
महिना पगार होता..दीड वर्ष
होऊन गेलेलंसासूबाईंनी
आकडेमोड केली..बरीच
मोठी रक्कम होती

 

श्वेता ची जबाबदारी
मी घेते हे वचन तिच्या
आईला दिलं होतं
त्यामुळे आता हे
सुद्धा त्यांनाच निस्तरायचं
होतं..

 

त्यांनी बऱ्यापैकी पैसे जमा
केले..आपल्या बांगड्या
मोडल्यासोहम आणि
त्याचा वडिलांकडून पैसे
घेतले आणि बरीच
मोठी रक्कम जमा
केली..

 

रविवारच्या दिवशी संध्याकाळी
सर्वजण घरी असताना
सासूबाईंनी सर्व पैसे
एका पाकिटात घालून
श्वेता ला दिले..

 

श्वेता,
ही तुझी सॅलरी..”

 

श्वेता ने दोन
मिनिट पाकिटाकडे पाहिलं..ती म्हणाली,

मला ही सॅलरी
नकोय..”

 

काय? मग काय
हवंय तुला?”

 

सासुबाईमाझ्यासारख्या टेक्निकल मुलीला
तुम्ही माणसात आणलंमाझ्यात एका संसारी
मुलीचे गुण आणलेतेही टेक्निकल
पद्धतीनेहेच जर
मी दुसरीकडे असती
तर त्यांनी हाकलून
लावलं असतं मला..तुम्ही मला
आपलं समजलातमाझी
जबाबदारी घेतलीयाहून
मोठी सॅलरी काय
असू शकते?

 

माझ्यात आईपणाच्या संवेदना जागृत
केल्या..मला माणसात
आणलंया सगळ्याची
किंमत पैशात होऊच
शकणार नाही

 

आणि मला आता
समजलंय..सॉफ्टवेअर मध्ये
यांत्रिकपणे कोडिंग करून
आपल्याला हवं तसं
ऍप्लिकेशन करणं म्हणजे
घर नाही..घर
म्हणजे माणसं, माणसांच्या
भावनाजिव्हाळाप्रेमआदरकाळजी….या सगळ्या
गोष्टी कुठल्याच टेक्निकल
पुस्तकात शिकायला मिळणार नाहीज्या मला
तुम्ही शिकवल्यात

 

आता मला या
घरासाठी, तुमच्यासाठी खूप काही
करू द्याउपकाराची
परतफेड मला करायचीयबसएवढीच
सॅलरी मागते मी…”

 

सासूबाईंना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं..श्वेताच्या आईला जे वचन दिलं
होतं ते आज पूर्ण झालं
होतं..

 

इतक्यात श्वेता ची
आई घरात येते

 

ये आईबस..”

 

बसायचं
जाऊदेश्वेता तू
खरंच….”

 

होयडबल बस
आहे माझी आता…”

 

मग आवर, माहेरी
चल अश्या अवस्थेतआराम होईल..”

 

माहेरी चल म्हटल्यावर
सासू सासरे हळवे
झाले..श्वेता ची
त्यांना इतकी सवय
झालेली की तिचं नसणं त्यांना
आता सहन होणार
नव्हतं

 

माहेरी
कशाला? मी इथेच राहीनसासूबाईंशिवाय माझी
इतकी चांगली काळजी
अजून कुणीच घेऊ
शकणार नाही..”

 

सासूबाईंच्या
डोळयांत पाणी आलं

 

श्वेता ची आई
म्हणाली..

 

मुलीला
माहेर विसरायला लावलंत
हो तुम्हीतुमचे
हे उपकार मी
आयुष्यात विसरू शकणार
नाही…”

 

समाप्त

 

(कसा होता या
पूर्ण कथा वाचनाचा
प्रवास? कथा आवडली
ना? लाईक कमेंट
करा आणि महत्वाचं
म्हणजे आपल्या सॉफ्टवेअर
मैत्रिणीना शेयर करा..)

सदर कथेवर आधारित चित्रपट निर्मात्यांशी बोलणे सुरू आहे, कथे संदर्भात काही माहिती हवी असल्यास मला 8087201815 वर मेसेज करावा. लिंक सकट आणि नावासह पोस्ट शेयर करण्यात यावी.

8 thoughts on “टेक्निकल संसार (भाग 5)”

  1. Kamaaal ahe khuuupp ! Yavar natak ghadu shakat..stage var ani प्रेक्षकांच्या live pratisada mule ajun maja yeil
    Yat विनोद, Emmotions sagal ch ahe !

    Reply
  2. अतिशय छान विषय, खूप सुंदर रीतीने मांडलाय, नवीन मुलीला आपलं मानून सामावून घेण्याचे बाळकडू आम्हाला मिळे

    Reply
  3. Excellent…. I read your earlier story 'Gharana' … and now this one… completely different but you have pretty good knowledge about both the fields. I am your big fan now. Stay blessed. Happy writing.

    Reply
  4. आपले मानले की सर्व गोष्टी सोप्या होतात. अतिशय सुंदर पद्धतीने सासू वा सनेच्या नातेसंबंधांचा एक नवीन पेलू आपण दाखविला.. खूपच संदर…

    Reply

Leave a Comment