टेक्निकल संसार (भाग 2)

सासूबाई म्हणाल्या,

“खूप साऱ्या errors येत आहेत. Warning मेसेज पण फार आलेत..”

“Error आणि warning message हे शब्द ऐकून श्वेता पळत बाहेर आली..”

“मला सांगा…कुठली लाईन चुकलीये?? माझ्या कोडींग मध्ये एकही लाईन ला error मेसेज येत नाही..”

सासूबाई हसल्या..

“चांगलंय, पण error कोडिंग मध्ये नाही…या घरातून येतेय…”

“म्हणजे??”

“म्हणजे बघ ना..वस्तू चुकीच्या जागेवर आहेत…घर मातकट झालंय. धूळ जमा झालीये…या सर्व घरातल्या errors आहेत…आणि घरात झुरळं झालीये..हा घर अस्वच्छ झाल्याचा warning सिग्नल आहे…”

“मग ह्या errors आणि warning signal काढावेच लागतील…चला…आपण सर्व सफाई करून घेऊ…”

दोघींजनी कामाला लागतात आणि घर अगदी चकाचक करून टाकतात…

श्वेता म्हणते…”no errors…now you can compile the code..”

“Still there is an error…”

सासूबाई म्हणतात..

“कुठली error बाकिये?”

“घर तर साफ केलंस, पण आपण दोघी किती मळलोय??”

श्वेता हसली, मी येते अंघोळ करून…

सासूबाईंनीही अंघोळ केली..आणि अश्या प्रकारे इंटर्नशिप चा पहिला आठवडा सुखरूप पार पडला..

सासूबाईंना संध्याकाळी फोन…गावाकडून काही मंडळी भेटायला येणार आहेत…नव्या सूनबाईला पाहायला..

सासूबाईंना घाम फुटला…श्वेता एक तर अशी..मनाने कितीही साफ असली तरी लोकं तिचं वागणच पाहणार…आपल्यासारखं समजून घेणार नाहीत ते..आणि उगाच परत जाऊन माझ्या सुनेची बदनामी करणार…

यावर तोडगा काढणं आवश्यक होतं, तेही टेक्निकल भाषेतच…

गावाकडची मंडळी 4 दिवसांनी येणार होते..सासूबाईंच्या मनात काहूर उठलेलं… श्वेता ला कसं तयार करावं? श्वेता आपली खोलीमध्ये कोडिंग करत बसलेली…कामात अगदी मग्न होती…तिने काही दिवस वर्क फ्रॉम होम घेतलं होतं…

सासूबाई पुस्तकं चाळत बसल्या…कॉलेज ला असताना त्या सॉफ्टवेअर चे विषय शिकवायच्या…त्या स्वतः इंजिनियर होत्या…एक पुस्तक चाळत असताना त्यांना सहज एक chapter हाती लागला…SDLC मॉडेल… Software development life cycle…

कुठलंही सॉफ्टवेअर बनवत असताना काही प्रक्रियेतून जावं लागतं…त्यांना एकदम हसू आलं…त्यांना मार्ग सापडला…

त्या श्वेता च्या खोलीत गेल्या…श्वेता काम करत होती…

“श्वेता…नवीन प्रोजेक्ट आलाय..”

श्वेता पटकन आपलं काम बाजूला ठेऊन सासुबाईंचं ऐकू लागली…

“कुठला?”

“अगं गावाकडची पाहुनी येणार आहेत…बिग बजेट प्रोजेक्ट असेल बरं का…”

“ओहह…मग आता काय काय करायचं सांगा..”

“विशेष काही नाही, SDLC मॉडेल नुसार workout करायचंय…”

श्वेता उत्सुकतेने ऐकू लागली…तिचं आयुष्य त्यातच तर गेलं होतं..

“SDLC..म्हणजेच software development life cycle…कुठलाही सॉफ्टवेअर प्रोजेक्ट यशस्वी व्हावा यासाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात…अंदाधुंदी कुठलाही प्रोजेक्ट करता येत नाही…”

“Okk… कुठलं सॉफ्टवेअर develop करायचंय?? आणि कुठल्या प्लॅटफॉर्म वर?”

सासूबाई हसल्या..

“Relationship software…रिलेशन्स स्ट्रॉंग होतील असं एक सॉफ्टवेअर… त्यातून आपलं स्किल दिसायला हवं…हे सॉफ्टवेअर एकदा यशस्वी झालं की मग आपला गुणांचा डेटाबेस सुरक्षित राहील…हाच डेटाबेस वापरून गावाकडची मंडळी आपलं मार्केटिंग करतील..mouth publicity…”

“Interesting…”

सासूबाईंनी सुरवात केली..

“पहिली फेज आहे planning… गावाकडच्या मंडळींना खुश ठेवता येईल असं काय करावं? त्यांच्या आवडीचं काय बनवावं? त्यांना फिरायला कुठे न्यावं? त्यांना भेट म्हणून काय काय द्यावं याची planning..”

“Okk… म्हणजे बघा..गावाकडे बायका साडी नेसून डोक्यावर पदर घेतात..त्यांना आवडतं ते…आणि गावरान रेसिपीज आवडतील त्यांना…रेसिपी बुक मधून मी नोट्स काढल्या आहेत त्याचा उपयोग होईल…आणि इथे जवळपास फिरण्यासारखं काय आहे हे गुगल मॅप वर बघेन मी…”

सासुबाई खुश..

“पुढचं आहे .. Requirement analysis. जी मंडळी येणार आहेत ती कोणत्या वयाची आहेत, त्यांची काही पथ्य आहेत का, सोबत लहान मुलं आहेत का, किती जण येणार आहेत ही सगळी माहिती जमा कर..नंतर आहे सॉफ्टवेअर design अँड development…आपण जे प्लॅन केलं आहे ते implement करायचं…नंतर टेस्टिंग…ती लोकं आपल्या प्रॉडक्ट ने खुश आहेत का…हे बघत राहायचं…त्यांना काही errors वाटल्या तर लगेच त्यात सुधारणा करायची…नंतर deployment अँड मेन्टेनन्स…फायनल प्रॉडक्ट् डिलिव्हर झालं तरी त्यांना आनंदाने निरोप देऊन त्यांच्याशी संपर्क ठेवायचा…म्हणजे एकदम स्ट्रॉंग रिलेशनशिप सॉफ्टवेअर डेव्हलप होईल…..”

श्वेता कान देऊन सगळं ऐकत होती…तिला काहीतरी वेगळं करायला मिळणार होतं… नवीन चॅलेंज तिला मिळालं आणि उत्साहाने ती त्या टास्क मागे लागली..

सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्लॅनिंग आणि requirement analysis तिने केलं..

भाग 3

2 thoughts on “टेक्निकल संसार (भाग 2)”

Leave a Comment