जेव्हा माहेरपण उमगतं

 तेव्हा बायकोचं माहेर समजतं..

“अगं जातांना जास्तीचा फराळ घेऊन जा तुझ्या माहेरी, तुझा भाऊही आलाय ना यावेळी गावी…आणि हो, अप्पांसाठी मी हे श्रवणयंत्र आणलं आहे, नेताना आठवणीने ने हो..”

भाऊसाहेबांचं हे रूप कल्पनाने गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा पाहिलं होतं. मानापानाच्या बाबतीत अगदी कडक, कौटुंबिक रीती भाती अगदी तंतोतंत पाळणारे भाऊसाहेब आज इतके नरम कसे झाले हाच प्रश्न कल्पनाला पडला होता. तिला जुने दिवस आठवले, काही वर्षांपूर्वी भावाच्या लग्नात भाऊसाहेबांना जेवायचा आग्रह करायचा राहून गेला म्हणून भाऊसाहेब तिच्या माहेरी कित्येक वर्षे गेले नाहीत. त्यांच्या मनात राग तसाच होता..कल्पनाच्या आई वडिलांनाकडून आपला यथोचित मान करवून घेताना भाऊसाहेबांना मोठा अभिमान वाटे. मनात कुठेतरी कल्पनाच्या आई वडिलांबद्दल अढी होतीच, लग्नात कुठेतरी काहीतरी कमी पडलं, माझ्या मावशीला हलकी साडी दिली, माझ्या मावसबहिणीला विचारलं नाही अश्या क्षुल्लक कारणांनी भाऊसाहेब कायम रोषात असत.

पण आज मात्र भाऊसाहेबांना कल्पनाच्या माहेराबद्दल मोठं प्रेम दाटून आलेलं. कल्पनाने न राहवून विचारलं..

“एक विचारू? राग तर नाही मानणार ना?”

“बोल की..”

“इतके दिवस माझ्या माहेराबद्दल इतकी अढी ठेऊन होतात, आज काय झालं?”

भाऊसाहेब वरमले, आपण जे केलं ते चूक होतं याची त्यांना आता जाणीव झाली होती..ते म्हणाले,

“आजवर बाईच्या माहेरची माणसं काय असतात हे अनुभवलंच नव्हतं, मला बहीण नाही..सासरी लेक देतांना काय अवस्था होते हे 2 महिन्यांपूर्वी आपली रेवा सासरी गेली तेव्हा समजलं..बापाच्या मनाची घालमेल, आईचा तुटणारा जीव आणि माहेरी तिची उमटलेली पावलं हे सगळं मला आपली रेवा सासरी गेल्यावर उमगलं..तिच्या सासरकडच्यांचा मानपान करताना मला मी डोळ्यासमोर येत होतो, कसा तुझ्या आई वडिलांसमोर अगदी तोऱ्यात बसत होतो मी…रेवा जेव्हा माहेरी येईल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आसुसलो आहे मी, कारण तीच एक पावती आहे ती सासरी सुखात आहे याची..आणि तीच पावती तुझ्या माहेरीही आज द्यावीशी वाटते…रेवाच्या नवऱ्याने जेव्हा माझ्यासाठी एक गिफ्ट आणलं तेव्हा काय वाटलं म्हणून सांगू, बाईचं माहेर आणि माहेरची माणसं काय असतात हे आज आपली लेक सासरी गेली तेव्हा मला समजलं..”

कल्पनासाठी हा एक सुखद धक्का होता..उशिरा का होईना,भाऊसाहेबांना जाणीव झाली.. आज आपली लेक सासरी गेली, पण जाता जाता आपल्याला माहेरपण देऊन गेली हे बघून नकळत कल्पनाच्या डोळ्यात पाणी साठलं.

_____

कहाणी एका दुर्दैवी बापाची…

वाचा ईरा दिवाळी अंकात, नाशिक सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध… अथवा आम्हाला फॉर्म भरून पाठवा.. आम्ही घरपोच अंक पाठवू.. फॉर्म खालीलप्रमाणे

https://forms.gle/ka3vMa5Mv17KryvW9

22 thoughts on “जेव्हा माहेरपण उमगतं”

  1. Explora los mejores casinos en línea clasificados de 2025. Compara bonificaciones, selecciones de juegos y la confiabilidad de las principales plataformas para una experiencia de juego segura y gratificanteoferta de bono

    Reply

Leave a Comment