जाणीव-2

तिने संध्याकाळी सर्वांना सांगायचं ठरवलं,

संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले,

तिच्या आधीच मोठ्या सुनेने बोलायला सुरुवात केली,

घरखर्च वाढतोय, मी शिवणकाम सुरू करावं म्हणतेय,

तेवढाच घराला हातभार,

आणि धाकली जाऊ आहे मदतीला,

दोघी मिळून सांभाळून घेऊ सगळं,

धाकली जाऊ नाराज झाली,

थोरलीने विचारलं,

काय गं तुला आवडणार नाही का?

“काय वेळ आहे बघा ना, मी आजच तुम्हाला म्हणणार होते की मी नोकरी करू इच्छिते, पण आता तुम्हीच दुसरं काम घेणार म्हटल्यावर..”

थोरलीने विचार केला,

माझं शिक्षण नाही, नोकरी मिळणार नाही,

धाकलीचं शिक्षण तरी कामात यायला हवं,

जे मी मिळवू शकले नाही ते तिला तरी मिळायला हवं,

पण समोर प्रश्न होता,

दोघी कामात व्यस्त झाल्या तर घराकडे कोण बघणार?

सासू सासरे, त्यांची तब्येत, सर्वांचं खाणंपिणं, घराची साफसफाई, कपडे, भांडे…

कुणीतरी एकीने माघार घेणं गरजेचं होतं,

मोठीने विचार केला,

माझं इतकं महत्वाचं नाही,

शिवणकाम काय, वेळ मिळेल तसं करता येईल…

ती म्हणाली,

“तू कर नोकरी, बाकी मी बघून घेईन..”

धाकली जाऊ खुश झाली,

मोठ्या जावेबद्दल आदर अजूनच वाढला..

रुटीन सुरू झालं,

थोरली सकाळी सर्वांचं आवरून बाहेर पाठवे, नवरा, दीर, धाकली जाऊ.. सर्वजण कामासाठी बाहेर जात..

ही घरातलं आवरून शिवणकामाला बसे,

ताकद उरायची नाही,

पण घरासाठी करायची,

धाकली जाऊ नोकरीत रुळली,

नवनवीन कपडे, मेकप, बोलण्यात वागण्यात बदल जाणवू लागला,

बाहेरच्या जगानुसार राहू लागली,

थोरली कौतुकाने बघे,

“ही नवीन फॅशन का गं? पार्लर मध्ये हे असं करतात का गं?”

मोकळ्या मनाने आणि हक्काने ती धाकलीला विचारू लागली,

धाकलीकडे पैसा होता, ती सर्वांचे लाड करायची,

घरकाम होत नसे तिच्याकडून,

पण थोरलीने कधी तक्रार केली नाही आणि दुसऱ्यांनाही करू दिली नाही,

धाकलीनेही जाणीव ठेवलेली,

पहिल्या पगारात आधी थोरल्या जावेला साडी घेतली,

थोरलीला भरून आलं,

दिवस सरत गेले,

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b5-3/

2 thoughts on “जाणीव-2”

Leave a Comment