जाणीव-1

धाकल्या सुनेने नोकरी करण्याचा हट्ट धरला तसं घराकडे कोण बघणार हा मोठा यक्षप्रश्न उभा राहिला,

मानकर जोडप्याला दोन्ही तरुण मुलं,

दोघांची लग्न झालेली,

दोन्ही सुना प्रेमाने रहात.

सासू, सासरे, मुलं आणि सुना..

सहा जणांचं कुटुंब,

गोतावळा मोठा,

नातेवाईकांचं येणं जाणं,

दर दिवसाआड कुणी ना कुणी जेवायला,

सासूबाई दुखणं घेऊन जागेवरच बसलेल्या,

दोन्ही सुना सगळं बघून घेत,

आनंदी आनंद होता,

सर्वजण कुटुंबाचं कौतुक करत,

मोठी सून जास्त शिकलेली नव्हती,

पण शिवणकाम छान जमायचं तिला,

आधी खूप कामं यायची, भरपूर पैसेही मिळत,

पण घरामुळे तिने ते काम बाजूला ठेवलं,

धाकली सून,

ग्रॅज्युएट झालेली,

आता तिला वाटू लागलं,

शिक्षण असंच वाया जाणार,

बाहेर पडायला हवं,

Leave a Comment