जरुरी था (भाग 4)

 “श्रीधर काय बोलतोय तू? आपल्या इतक्या वर्षाचा संसार सोडून मी त्याचाकडे जाईल असं वाटलंच कसं तुला?”

 

“मोनिका, तू भावनेच्या भरात हे बोलतेय, पण मला तुझ्या डोळ्यात आजही त्याच्याबद्दल प्रेम दिसलं, जे माझ्यासाठी कधीच दिसलं नाही. तुझ्या आयुष्यातली एक सल सतत आपल्यात डोकावत राहिली..ती आता पुसून टाक.. जा तुझ्या पहिल्या प्रेमाकडे…”

 

मोनिका काहीही न बोलता खोलीत निघून जाते आणि दार लावून घेते..

 

श्रीधर इकडे डोळ्यावर हात ठेवून लहान मुलासारखा रडू लागतो..

 

“काय कमी होती माझ्या प्रेमात जे मोनिका ला आज पून्हा मंगेश बद्दल भावना जागृत व्हाव्या? नाही…काहीही झालं तरी मला तिचं सुख महत्वाचं..माझं पुढे काय होईल यापेक्षा मोनिका चं सुख महत्वाचं…”

 

मोनिका स्वतःला सावरून बाहेर येते, 

 

“तुला समजलंच कसं हे सगळं? आमचं नातं आहे हे तुला कोणी सांगितलं?”

 

“तुला आठवतं का की आपण एकदा तुझ्या माहेरी गेलेलो, आपला त्याच भाजी मार्केट मध्ये जायचा प्रसंग आला होता..तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळंच सांगून जात होते. तू आणि मंगेश शिवाय अजून एक व्यक्ती होती जिला तुमच्याबद्दल माहीत होतं. तोच भाजीवाला ज्याचासमोर तुमची नजरानजर झालेली. त्याने तुला ओळखलं, त्याने काही चौकशी करायचा प्रयत्न केला तेव्हा तू घाबरून त्याला खुणेने गप राहायला सांगितलं होतं. तेव्हाच मला कळलं की काहीतरी गूढ आहे. त्यांनतर मी त्याला एकट्यात गाठलं आणि विचारलं..तो काहीच सांगायला तयार होईना, शेवटी खोदून खोदून विचारलं आणि तुला काही न बोलण्याच्या अटीवर त्याने सगळं सांगितलं. तो मंगेश ला चांगलं ओळखत होता. त्याचं पूर्ण नाव मी विचारलं, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पत्ता मिळणं कठीण होतं. आणि योगायोग बघ, आमच्या कंपनीत तो रुजू झाला. त्याची मी वरवर चौकशी केली तेव्हा मला खात्री पटली की हा तोच. मग त्या दिवशी मुद्दाम त्याला घरी घेऊन आलो, मला पाहायचं होतं की तुला आजही त्याच्याबद्दल काही वाटतंय का. आणि ती जशी रिऍक्ट झालीस त्यावरून मला समजलं की तुला आजही त्याच्याबद्दल भावना आहेत. तेव्हा मी मनाची तयारी केली, आता निर्णय तुझा आहे. तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य…”

 

मोनिका परत एकदा खोलीकडे निघून गेली. 

 

श्रीधर ला वाटलं की मोनिका लगेच निर्णय घेईल, तिच्या अश्या तडकाफडकी जाण्याने त्याचा संशय दाट झाला, हिला खरंच आजही मंगेश कडेच जायचं असणार. नाहीतर लगेच त्याला झिडकरल्याचं मला कबूल केलं असतं. 

 

श्रीधर त्यानंतर वेदनेत तळमळत होता, इतक्या सहवासानंतर तिला सोडणं म्हणजे अशक्य होतं. पण प्रेमही इतकं उत्कट होतं की तिच्या सुखासाठी ही वेदनाही सहन करायला तो तयार होता. 

 

“मोनिका ने मंगेश कडे जाण्याचा निर्णय घेतला तर? मोनिका ला माझ्यातकच प्रेम करेल का तो? मंगेश ला फक्त मोनिका ओळखत होती, पण खरंच चांगला आहे का तो…नाही…मला खात्री करायला हवी, मोनिका ने त्याचकडे जाण्याचा निर्णय घेतला तर…आणि उद्या मोनिका ला काही त्रास दिला तर?? नाही…मला खात्री करायला हवी त्याची…त्याशिवाय माझं प्रेम मी दुसऱ्याचा हातात देणार नाही…”

 

श्रीधर ने मंगेश ची माहिती काढायला घेतली. पण तो या शहरात नवीन होता, कशी माहिती काढणार? त्याने मंगेश चं फेसबुक अकाऊंट बघितलं, त्यात हर्षदा नावाची मंगेश आणि मोनिका ची कॉमन फ्रेंड त्याला दिसली. तीच ही हर्षदा, मोनिका सोबत भाजीला जायची…त्यांचा प्रेमाची साक्षीदार.

 

श्रीधर ने माहिती काढून शेवटी हर्षदा ला गाठलं आणि सगळं सांगितलं. 

 

“काय?? वेड लागलंय का मोनिका ला? मंगेश कडे जाणार ती? काही अक्कल आहे का तिला…”

 

“हे बघ, आमचं लग्न जरी झालेलं असलं तरी तिच्या सुखासाठी, तिच्या प्रेमासाठी मला हे करावंच लागेल. तू फक्त मला मंगेश बद्दल सांग, सांभाळेल ना तो मोनिका ला?”

 

“मंगेश…नावही घेऊ नकोस त्याचं… हर्षदा ला तो फक्त त्या दिवसापर्यंतच माहीत होता…त्यानंतर काय घडलेलं हे तिच्या खिजगणतीतही नाही….”

 

इकडे मंगेश मोनिका च्या घरी आला, त्याला असं अचानक आलेलं पाहून मोनिका धास्तावली..

 

काय घडलेलं नेमकं? का अचानक मंगेश निघून गेला होता? हर्षदा ला मंगेश बद्दल इतकी चीड का असेल? श्रीधर ला कुठलं सत्य समजतं? मोनिका काय निर्णय घेते? नक्की वाचा पुढील भागात.

भाग 5

https://irablogging.in/%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-5-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

 

 

10 thoughts on “जरुरी था (भाग 4)”

Leave a Comment