श्रीधर बाहेर आला तसं त्याने मोनिका च्या हातात गजरा टेकवला. घे, तुला आवडतो ना?
नेहमी लाजणारी मोनिका आज अपराधीपणे तो हातात घेते, मंगेश ला ते पाहून प्रचंड संताप होतो, पण लगेच तो भानावर येतो..”कोण मी तिचा? माझा काय हक्क तिच्यावर? का वाईट वाटावं मला?”
मंगेश निरोप घेऊन निघून जातो.
त्याला जाताना पाहून मोनिका अचानक दहा वर्षांपूर्वीची मोनिका बनते..तिच्या मनावर तिचा ताबा राहत नाही..
“हा जातोय..परत..आता कधीच येणार नाही….नाही जाऊ देणार मी…”
“थांब…”
श्रीधर अवाक होऊन बघतो, का आवाज दिला हिने त्याला?
“काय गं काय झालं?” श्रीधर विचारतो..
मंगेश मागे वळून बघतो..
मोनिका श्रीधर च्या आवाजाने भानावर येते..
“अं?? काही नाही…ते…तुमचा रुमाल…इथेच राहिला…”
“अगं वेडे तो माझा रुमाल आहे..”
“अरे हो..सॉरी…”
मंगेश ला तिचं हे वागणं कळतं… पण निघून जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
इकडे मोनिका च्या मनात खूप उलथापालथ होते..
आता काय भविष्य होतं त्यांचा नात्याचं? अशी वेळ गेल्यावर तो परत आला…काय करू मी? आयुष्यात खूप पुढे निघून आलेय मी, पण काहीतरी राहिलं होतं मागे..त्याचाजवळ… ते परत मागू का? माझी स्वप्न, माझं पहिलं प्रेम…मागू का परत??
काय करावं तिला सुचेना..
एक दिवस श्रीधर तिच्या जवळ आला..तिच्या कपाळावर ओठ टेकवले, तिच्या हातात हात घेतला..पण मोनिका मात्र निर्जीवपणे त्याला प्रतिसाद देत होती..तिचा हात त्याच्या हातात होता, तिच्या हातावर 2 थेंब पडले तशी ती भानावर आली…
“श्रीधर??? काय झालंय?? तू रडतोय??”
“मी तुझ्या वाटेत येणार नाही, तुला आजही मंगेश बद्दल प्रेम असेल तर तू जा त्याचासोबत, मी तुला अडवणार नाही…”
मोनिका ने झटकन हात मागे घेतला..आणि मागच्या भिंतीवर जाऊन ती टेकली…
“श्रीधर ला कसं समजलं हे सगळं? कोणी सांगितलं? मंगेश ने? नाही…तो असं करणार नाही…मग? ती खूप घाबरली..
“तू माझ्यासोबत संसार केलास, पण तुझ्या सहवासात मला एक दुःखाची किनार सतत जाणवत होती, कुठलीतरी एक सल तुझ्या मनाला बोचतेय हे मला प्रकर्षाने जाणवलं…हे बघ, माझा विचार करू नकोस…वेळ घे पण मला सांग तुझा निर्णय..”
कोणी सांगितलं असेल श्रीधर ला? मोनिका आता काय निर्णय घेते? मंगेश ची भूमिका काय असेल? नक्की वाचा पुढील भागात..
भाग 4
भाग 5
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks.