छोटीशी प्रेमकथा-2

मग आई वडिलांनी त्यांना आपला निर्णय सांगितला..

दीड वर्ष दूर राहायचं, दीड वर्षांनी सुद्धा तुमचं प्रेम असंच राहिलं तर लग्नाला परवानगी देऊ आम्ही..

दोघेही जड मनाने तयार झाले..

दिवस सरत गेले, निकिता एका चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली..

एकमेकांची आठवण यायची, पण संपर्काची सगळी साधनं आई वडिलांनी तोडली होती..

दोघांना नंबर बदलायला लावला..

अजित काय करत असेल काही समजायला मार्ग नव्हता..

आई वडिलांनी विचार केला,

निकिता रुळली आहे नोकरीत, अजितला विसरेल..

एक वर्ष संपत आलेलं..

एके दिवशी गॅलरीत कपडे सुकवत असतांना निकीताच्या आईचं खाली लक्ष गेलं..

एक डिलिव्हरी बॉय समोरच्या बंगल्यात पार्सल देत होता..

आईने नीट पाहिलं, तिला धक्काच बसला..

अजित होता तो..

हा अजित? डिलिव्हरी बॉय चं काम करतो? आणि ही निकिता याच्याशी लग्न करू म्हणते…ते काही नाही, आता निकिता साठी चांगला मुलगा बघायचा..

आईने स्थळं शोधायला सुरवात केली,

निकीताने निक्षून सांगितलं..

“दीड वर्षांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्या..”

आई म्हणाली,

“अगं ज्याच्याशी लग्न करायचं म्हणतेय ना तो डिलिव्हरी बॉय चं काम करतोय.. तू इतक्या चांगल्या नोकरीवर आणि एका डिलिव्हरी बॉय सोबत लग्न करणार?”

हे ऐकून निकिताच्या मनात तसूभरही चलबिचल झाली नाही, ती एवढंच म्हणाली,

“दीड वर्षांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्या..”

आई वडिलांनी तिच्यासमोर हात टेकले,

“जाऊद्या, दीड वर्षांनी का होईना, अजित कुठे आहे हे समजलं की आपोआप त्याला नाकारेल..”

दीड वर्ष सरत आलं..

निकिताच्या आईने एक श्रीमंत स्थळ शोधलं..

निकिताला सांगायच्या आधी आई वडील दोघेही मुलाच्या घरी आमंत्रण द्यायला गेले..

आई वडील सोफ्यावर बसले होते, मुलाची आई आत नोकरांना चहा नाष्टाची सोय करायला सांगण्यासाठी आत गेली..

वडिलांनी सहज समोर ठेवलेलं वर्तमानपत्र उचललं..

आतल्या एका पानावर बातमी पाहिली आणि त्यांचा हात थरथरू लागला..

त्यांनी तसाच तो पेपर आईला दाखवला..

दोघेही अवाक होऊन बघत राहिले..

मुलाची आई चहा नाष्टा घेऊन बाहेर येते, बघते तर निकिताचे आई वडील दोन्ही गायब…

दोघेही घाईघाईत घरी पोचतात..

“निकिता…बाहेर ये”

निकिता बाहेर येते,

****

भाग 3

छोटीशी प्रेमकथा – 3 अंतिम

9 thoughts on “छोटीशी प्रेमकथा-2”

  1. Hi! Your website provided valuable information as I was exploring the ‘Harmony NIPT test.’ The details are quite comprehensive. If you have any additional insights or recommendations related to the ‘Harmony NIPT test,’ I would be eager to learn. Thanks a lot!

    Reply
  2. Hi there! I stumbled upon your website while looking into ‘4D ultrasound services near me.’ Your content is not only informative but also engaging. As I explore options for a ‘4D scan near me,’ I’m curious about your recommendations or any additional insights you might have. Thank you in advance!

    Reply

Leave a Comment