छोटीशी आशा-2

 बरेच हॉल पाहिले,

हॉटेल पालथी घातली,

पण तिला काही आवडेना,

आयताकृती हॉल अन स्टेज,

यापलीकडे काही नव्हतं,

तिला जरा वेगळं, निसर्गरम्य जागा हवी होती,

जिथे तिला स्वतःच्या काही कल्पना राबवता येतील,

अखेर एक छानसा हॉल तिला पसंत पडला,

बाहेर छान गार्डन होते, 

स्वागतासाठीची जागा शोभिवंत होती,

तिला पाहताक्षणी पसंत पडलं,

ती म्हणाली,

अहो, हाच घेऊयात..

तो म्हणाला, घाई नको, उद्या वगैरे येऊ बुकिंग साठी..

घरी गेल्यावर ती त्याला सांगू लागली,

अहो, ऐका ना..तिथे छानसं गार्डन आहे ना, तिथे मी बनवलेले काही शो पीस ठेऊयात,

आणि झाडांवर मी बनवलेल्या फुलांच्या माळा..

खूप छान दिसेल,

तो शांत झाला, हळूच म्हणाला..

तो हॉल नाही घेत आहोत आपण,

का???

अगं बजेट जास्त आहे त्याचं,

आपल्या बजेटमध्ये तर आहे की,

पण तेवढाच खर्च नाहीये की, बाकीचा किरकोळ खर्च पण असेल,

तो तर असेलच ना, पण फार नाही होणार तो…

मी म्हणतोय ना नको, 

ती हिरमुसली, 

स्वतः काही आर्थिक योगदान देऊ शकणार नव्हती, त्यामुळे नवऱ्याचं ऐकणं भाग होतं..

बरं मला फक्त पार्लर साठी काही पैसे द्या, 

पार्लर कशासाठी? लग्न थोडीच आहे..माझी चुलतबहीण आहे, तिचा पार्लर चा कोर्स झालाय, तिला बोलवू..

डेकोरेशन चा काही खर्च येईल,

डेकोरेशन? आपणच करूया ना,फुलांच्या माळा लावल्या की झालं,

तेवढंच नसतं हो, चोपाळा सजवायचा असतो, अंगावर फुलांचे दागिने असतात..

वायफळ खर्च नुसता,तो मनातल्या मनात पुटपुटला..

तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं, 

काय काय विचार करून ठेवलेला तिने,

सगळं वाया..

****

भाग 3

https://www.irablogging.in/2022/12/3_73.html?m=1

Leave a Comment