चौकट-2

अरेरे, किती तो पसारा..

भांडी एकाच ठिकाणी गर्दी करताय,

तिला प्रश्न पडला,

नेमकी भांडी ठेवावी तरी कुठे?

तिला दिवस राहिले,

गोंडस मुलगी झाली,

सासुबाई म्हणाल्या,

बाळसं धरत नाहीये बाळ, जरा काळजी घेत जा..

तिने खूप काळजी घेतली,

बाळाने छान बाळसं धरलं,

पण रंग काही उजळत नाहीये बाळाचा, जास्त लठ्ठ शरीर पण बरं नाही ..

तिला प्रश्न पडला,

बाळासाठी नक्की करावं तरी काय?

मुलगी मोठी होत होती,

नवऱ्याने हट्ट धरला,

नोकरी बघ, घराला हातभार लागेल,

तिने नोकरी केली,

घरातली दोन कामं कमी होत होती,

नवरा म्हणाला,

घरातलं नीट आवरत जा, नोकरीचा काय एवढा हट्ट?

तिला प्रश्न पडला,

नक्की घराकडे लक्ष द्यावं की नोकरी बघावी?

ती नॉर्मल बोलायची,

सासुबाई म्हणायच्या जिभेला हाड नाही,

ती गप राहू लागली,

नवरा म्हणायचा हिला कुणाशी जुळवूनच घेता येत नाही,

तिला प्रश्न पडला,

नक्की करावं तरी काय?

तिने स्वतःत सुधारणा केली,

आता घरकाम आणि नोकरी उत्तम जमू लागलं,

आता तक्रारीला जागाच नाही,

पण नवरा म्हणाला,

जास्त हवेत जाऊ नकोस,

पैसे कमावते म्हणजे उपकार करत नाहीस, आणि घरातलं बघावंच लागेल, ते कामच आहे तुझं..

तिला प्रश्न पडला,

नक्की वागावं तरी कसं?

मुलगी मोठी झाली, तिचं लग्न ठरलं..

सासुबाई म्हणाल्या,

तिला संसाराच्या चार गोष्टी सांगून पाठव,

मुलीने विचारलं,

आई सासरी वागू तरी कसं?

आईने एक दीर्घ श्वास घेतला,

****

चौकट-3

3 thoughts on “चौकट-2”

Leave a Comment