चौकट-1

लग्न करून ती सासरी आली,

नवीन स्वप्न घेऊन,

मोठ्या आनंदाने किचनमध्ये प्रवेश केला,

आज ती सर्वांना नाष्टा बनवणार होती,

छानपैकी पोहे बनवले,

कौतुकाची थाप ऐकायला कान आसुसले,

“मीठ कमी वाटतंय..मिरच्या जास्त झाल्या..”

एकेक तक्रारी ऐकल्या तसा तिचा हिरमोड झाला,

पुढच्या वेळी मीठ नेमकेच टाकले, मिरच्या नेमक्याच टाकल्या,

यावेळी नक्की आवडणार सर्वांना..

“खूपच मिळमिळीत लागतेय..कांदे पूर्ण शिजले नाहीत वाटतं.”.

नवीन तक्रार,

प्रत्येक खेपेला हेच,

काही ना काही राहून जायचं,

तिला समजेना,

पोहे नक्की करू तरी कसे?

घरात सण होता,

ती छानपैकी तयार झाली,

तिची आवडती साडी नेसली,

सासुबाई म्हणाल्या,

अगं हा रंग नको, आणि काठापदराची नेस,

तिने साडी बदलली,

सासूबाईंनी खालून वर पाहिलं,

ब्लाउजच्या बाह्या थोड्या मोठ्या हव्यात, लक्षात असुदे पुढच्या वेळी..

पुढचा सण आला,

काठापदराची साडी आणि मोठ्या बाह्यांचे ब्लाउज दोन्ही घातले,

सासूबाईंचं लक्ष साडीखाली झाकल्या गेलेल्या पायांकडे,

जोडवे फारच हलके दिसताय..

तिला प्रश्न पडला,

नेमकं राहावं तरी कसं?

ती किचनमध्ये वावरत होती,

सासुबाई सतत मध्ये येत,

अगं या भांड्याची जागा का बदललीस? इथे ठेऊ नकोस..

तिने आधीच्या जागेवर ठेवलं,

***

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%9f-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%9f-3/

Leave a Comment