चिरकाल-3 अंतिम

 समोरचा खुश असेल आयुष्यात, आपल्याला एकटं टाकून,

दोघांनाही वाटे,

नोकरीनिमित्त त्याने घर सोडलं,

एकटेपण अजूनच वाढलं,

त्याने ठरवलं,

जोडीदार हवा,

जसा असेल तसा,

मानसिक गरज जास्त होती त्याला,

त्याच्या ऑफिसमधल्या एका मित्राला त्याचं दुःखं कळत होतं..

त्याने एक स्थळ आणलं त्याच्यासाठी..

“हे बघ, मुलगी चांगली आहे, तिचाही घटस्फोट झालेला आहे..चालणार का तुला?”

“मग तर एकमेकांची दुःखं अजूनच समजून घेता येतील..”

“उद्या फोटो आणतो तिचा..”

“नको..रंग, रूप काहीही बघणार नाही मी…एक जिवंत बोलणारी चालणारी व्यक्ती हवीय मला फक्त..”

मित्राला गहिवरून आलं..

त्याच्या घरच्यांनी आता पाय काढून घेतलेला..मुलाची काळजी सोडून दिलेली त्यांनी…

तिच्याही घरचे आता तिला बोलून दाखवत,

“मुली शेवटपर्यंत संसार टिकवतात.. सर्वांना नाही जमत..”

तिला वेदना व्हायच्या..

एके दिवशी मित्राने त्या मुलीला भेटायला बोलावलं,

तो आशेने तिथे गेला..

मित्राने एका टेबलवर दोघांना बसवलं,

दोघांची नजरानजर झाली,

अश्रू थांबत नव्हते,

मन भरून आलेलं,

काय बोलावं कळेना,

खूप दिवसांनी सगळं दुःखं आज डोळ्यातून ओसंडून वाहत होतं..

मित्राला कळेना काय झालंय..

तो म्हणाला,

“मित्रा, हीच रे माझी बायको..जिला सोडून मी फार मोठा गुन्हा केला..”

“गुन्हा तू नाही,मी केलाय..तुझ्यासारख्या भल्या माणसावर नको ते आरोप करून..”

दोघेही आज मोकळे झाले,

मित्र बघतच राहिला..दोघांना वेळ द्यावा म्हणून तिथुन आनंदाने निघाला..

तो आणि ती..

त्यालाही कळून चुकलं, 

की तीही याच दुःखातून जात होती,

एकटेपण तिलाही त्रास देत होतं..

एकाच दुःखाचे वाटेकरी पुन्हा एकत्र आले..

दोघांना कळून चुकलं..

चार वर्षे उगाच वाया घालवली,

आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र…आयुष्यभर सोबत नसतात..

त्यांच्या प्रेमावर शंका नाही,

पण संसार हा दोघांचाच असतो,

साथ फक्त नवऱ्याची बायकोला आणि बायकोची नवऱ्याला..

हीच शेवटपर्यंत पुरते..

बाकीच्यांची सहानुभूती क्षणिक असते,

पण नवरा बायकोचं प्रेम, हेच आयुष्यात शेवटपर्यंत आधार देतं..

समाप्त

17 thoughts on “चिरकाल-3 अंतिम”

  1. थोड तुझं आणि थोड माझं, आणि मग सगळं फक्त दोघांच

    Reply
  2. हि कथा खूप काही सांगून जाते. .. वास्तविकता आहे.

    Reply
  3. अत्यंत सुंदर , खरी आणि थोड्या शब्दात मोठी आशय सांगणारी कथा. हक्काचे घर आणि माणूस एकमेव असतात , त्यांना पर्याय नाही .

    Reply

Leave a Comment