चिरकाल-1

कुणालाही न जुमानता ते विभक्त झाले..

बराच समझोता करण्याचा प्रयत्न झाला..

दोन्ही बाजूंनी..

मित्रांनी समजावलं,

तिला मैत्रिणींनी समजावलं,

पण ते ठाम होते,

इगो आणि द्वेष पूर्ण मुरला होता,

कौंसलिंग झाले,

एकत्र राहून पाहिलं,

पण परिणाम उलटाच,

रोज डोकेदुखी,

रोजची भांडणं,

नको नको झालेलं,

तिने तिचा त्रास तिच्या घरी सांगितला..

माहेरच्यांनीही ठरवलं,

आता बास, आम्हाला लेक जड झालेली नाही,

मुलाने त्याच्या घरी तिच्या तक्रारी केल्या,

तेही म्हणाले, नको अशी मुलगी..

दोघे वेगळे झाले..

छान राहू लागले,

तिच्या माहेरच्यांनी तिला खूप आनंदी ठेवले,

हवं नको ते सगळं तिच्या मनासारखं केलं,

कारण तिच्याबद्दल एक सहानुभूती होती,

ती खूप खुश होती,

काय दिलं मला त्याने? हे असं प्रेम तो देऊ शकला असता का? ती सतत मनाला समजावू लागली,

****

भाग 2

Leave a Comment