चांगुलपणा-2

 “आधी वचन दे”

सुयश जरा शांत झाला, वडील नसतांना आईने काय काय सोसलं याची त्याला जाणीव होती, त्याने वचन देऊन टाकलं आणि तो निघाला..

एका फूड कंपनी मध्ये डिलिव्हरी बॉय साठी तो मुलाखत देणार होता, तिथे अनेक पदांसाठी मुलाखती होणार होत्या, काही मॅनेजर साठी, काही क्लार्क साठी…

तो कंपनीत गेला, 

गेटपासून बरंच लांब एक सिक्युरिटी बसला होता,

गेट उघडायचं आणि बंद करायचं काम तो करायचा,

सुयश बराच वेळ गेटपाशी ताटकळत उभा होता,

सिक्युरिटीकडे नीट पाहिलं, तो एका पायाने अधू होता, लंगडत चालत होता,

इतका वेळ झाला म्हणून सुयशही वैतागला,

वाटलं या सिक्युरिटीला ऐकवावं,

पण आईचं वचन आठवलं

चांगुलपणा सोडायचा नाही,

तो शांतपणे आत गेला,

काही वेळाने त्याचा चुलतभाऊ गेटपाशी आला,

सिक्युरिटीने पुन्हा गेट उघडायला वेळ लावला,

तोवर चुलतभाऊ चिडलेला, त्याने सिक्युरिटीला नको नको ते ऐकवलं, 

आत सुयशला बघताच तो हसायला लागला,

कारण तो मॅनेजर पोस्टसाठी मुलाखत द्यायला आलेला आणि सुयश डिलिव्हरी बॉय साठी,

सुयशने मनावर ताबा ठेवत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं,

काही वेळाने एक माणूस बाहेर आला आणि त्याने सगळ्या मुलाखतदारांना दुसऱ्या खोलीत बसायला लावलं,

दुसऱ्या खोलीत जात असतांना वाटेत एक कुंडी फुटून आडवी पडलेली,

2 जण त्याला पाय लागून अडखळले, शिव्या देत पुढे गेले,

सुयशने त्याकडे पाहिलं,

आईचं वचन आठवलं,

चांगुलपणा सोडायचा नाही,

स्वतःहून ती कुंडी उचलून बाजूला ठेवली,

काही वेळाने तो माणूस पुन्हा बाहेर आला आणि त्याने सर्व मुलाखतदारांना सांगितलं,

“सर्वांना आत बोलावलं आहे, सिक्युरिटीला सुद्धा”

असं म्हणत तो सिक्युरिटीला दाराजवळून आवाज देत आत निघून गेला,

सर्वजण भराभर आत जाऊन बसले,

सुयशला आठवलं,

सिक्युरिटी पायाने अधू आहे, त्याला यायला वेळ लागेल,

आईचं वचन आठवलं,

तो आत न जाता गेटपाशी गेला,

सिक्युरिटीला आधार देत आत आणलं,

सर्वजण केबिनमध्ये बसले होते, सिक्युरिटी आणि सुयश दोघेही आत शिरले,

समोरच्या केबिनवर कुणीही नव्हतं,

साहेब यायची सर्वजण वाट बघत होते तोच त्या सिक्युरिटीने हातातील काठी बाजूला फेकली,

सिक्युरिटीचे कपडे उतरवले,

आणि दिमाखात जाऊन टेबलसमोरच्या खुर्चीत जाऊन बसला,

सगळेजण बघतच राहिले,

हा सिक्युरिटी नव्हता, अधू नव्हता, हा बॉस होता,

सर्वांना आठवलं,

आपण गेट उशिराने उघडला म्हणून नको नको ते याला ऐकवलं, आता आपलं काही खरं नाही,

सिक्युरिटी, म्हणजेच बॉस म्हणाला,

*****

भाग 3

https://www.irablogging.in/2023/02/3_11.html?m=1

1 thought on “चांगुलपणा-2”

Leave a Comment