घराणं (भाग 1)

रत्नपारखी घराण्यात मुलगी देण्यासाठी मुलीच्या पालकांची चढाओढ चालत असायची, याला कारणही तसंच होतं. रत्नपारखी घराण्यात काही पिढ्यांपासून कुणी अज्ञात व्यक्तीने घालून दिलेले नियम हे पुढील पिढ्यांनी तंतोतंत पाळले होते. घरातल्या स्त्रीला उच्च सन्मान दिला जावा, घरातली कामं स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून करावी, घरातील सर्व सदस्यांनी महिन्याला एक ठराविक रक्कम घरातील ज्येष्ठ स्त्री कडे सुपूर्द करून त्याची गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली जावी, घरात धार्मिक वातावरण असावं आणि सोबतच आधुनिक गोष्टीही आत्मसात केल्या गेल्या पाहीजेत, कुटुंबात कितीही संख्या असली तरी प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य जपलं गेलं पाहिजे, कुणावरही कुणीही सक्ती करणार नाहीच पण सोबतच आपल्या मर्यादा प्रत्येकाने ओळखाव्या आणि तशी वागणूक ठेवावी असे काही कडक नियम घराण्यात घालून दिले गेलेले.

“ऋग्वेद… तुझ्या घरी कधी सांगणार तू आपल्या लग्नाचं??”

“आमच्या घरात कुणी प्रेमविवाह केलेला नाही गं..”

“मला नाही वाटत पण की तू सांगितल्यावर ते नाही म्हणतील, रत्नपारखी घराणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य अभेद्य ठेवणारं म्हणून परिचित आहे..”

“चांगली ओळखतेस माझ्या घराण्याला..तुझं म्हणणं खरं आहे, पण व्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर केला जाणार नाही याची काळजी घेणंही आमची तितकीच जबाबदारी आहे…”

“यावेळी तुझं मन जबाबदारी आणि भावना यात अडकून गेलं आहे, हरकत नाही..आपल्या कुटुंबाची आणि त्याच्या तत्वांची अभेद्यता कायम राखणं हे तुझं परम कर्तव्य आहे, तू त्यालाच प्राथमिकता दे..मी वाट बघेन..”

असं म्हणत शुभदा तिथून निघून गेली..ऋग्वेदला क्षणभर वाटलं की आपल्या घराण्याला शोभेल अशीच आहे ही, इतका समजूतदारपणा असलेली ही शोधून सापडणार नाही, पण घरात कुणीही प्रेमविवाह केलेला नसताना मी असं सांगणं म्हणजे .

ऋग्वेद या गोष्टीला तात्पुरता पूर्णविराम देतो..

सध्या या कुटुंबात रत्नपारखी पिढीचे वारस..
सर्वात मोठे विनायक, नंतर सुभाष आणि लहान परशुराम असे तीन भाऊ. तिघांना 2-2 अपत्य होती. विनायक ला 2 मुलं, सुभाषला 2 मुली, परशुराम ला एक मुलगा अन एक मुलगी होती. सर्व मुलं मोठी झालेली, विनायकच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं होतं. त्यांच्या बायकाही सुसंस्कृत होत्या, घराण्याला साजेश्या अश्या मुली दिगंबर आजोबांनी शोधून काढलेल्या…दिगंबर म्हणजे या तिनही मुलांचे वडील, घरातील ज्येष्ठ…त्यांच्या अर्धांगिनी काही वर्षांपूर्वीच गेल्या..पण दिगंबरने घराण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंनी सांभाळली. एकीकडे मुलांची लग्न जमवण्यातही ते धावपळ करत आणि दुसरीकडे खरेदीसाठी सुनांची हौस पूर्ण करण्यातही लक्ष देत. कावेरीची कमी ते अजिबात जाणवू देत नव्हते.

लहान भाऊ परशुराम यांचा मुलगा, ऋग्वेद..त्याची बहीण शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेली होती. ऋग्वेद एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. डॉक्टरकी शिकून प्रख्यात सर्जन व्हायचं त्याचं स्वप्न होतं.

रत्नपारखी घराण्याची ओळख दूरवर पसरलेली होती, पण हे सगळं एकाएकी झालं नव्हतं. या घराण्याला एक दैवी आशीर्वाद होता. त्यांच्या देव्हाऱ्यात लाल कपड्यात गुंडालेलेली एक आयताकृती आणि बऱ्यापैकी जाडजूड वस्तू असायची. घरात एखादी नवीन सून आली की तिला नेहमी प्रश्न पडे, पण सुभाषची बायको त्यांना बजावून सांगे,

“हे आपल्यामागच्या तिसऱ्या पिढीतील एका स्त्रीने हे आपल्याला दिलं आहे, रोज त्याची पूजा करायची पण ते कधीही उघडायचं नाही..”

सुनाही गपचूप ते ऐकत अजून प्रश्न विचारत नसत. जसं सांगितलं गेलं तसं त्या करत. एकदोन वेळा ती वस्तू चोरी व्हायचेही प्रयत्न झाले होते, पण वेळीच लक्षात आल्याने ती वस्तू आजही शाबूत होती. मध्यंतरी अशी अफवाही पसरलेली की त्यात अब्जाबधीचा खजिना लपलेला आहे. त्यामुळे नातेवाईकांपैकी बऱ्याच लोकांचा डोळा त्यावर होता. एवढंच नाही तर या वस्तूमुळे घरात इतका पैसे आहे अशी सर्वांची समजूत होती.

रत्नपारखी घराण्याचा टेक्सटाईल चा मोठा उद्योग होता. हा व्यवसाय अगदी रुळला होता, घरबसल्या लाखो रुपये अगदी आयते जमा व्हायचे. पण दिगंबर आजोबांनी कुणालाही ऐतखाऊ व्हायची संधी दिली नाही. ती रक्कम विनायकाची बायको जानकीकडे ते देत असत आणि तिच्याकडे त्यांची गुंतवणूक करण्याची जबाबदारी असायची. प्रत्येकजण काहींना काही व्यवसाय करत होता. जानकी प्रत्येकाला व्यवसायासाठी ठराविक रक्कम देत असे, आणि त्याच्या पुढे पैशाला पैसा जोडत व्यवसाय उभा करायचा असा नियम असल्याने सर्वजण कष्ट करत असत. रत्नपारखी घराण्यात सून आणण्यासाठी एकच नियम असे, मुलीला घरकाम आलं नाही तरी चालेल पण मुलगी कर्तृत्ववान असावी, शून्यातून विश्व उभं करण्याची धमक तिच्यात असावी अन लाथ मारिन तिथे पाणी काढीन अशी तेजस्वी असावी. अश्या मुली फार कमी होत्या पण दिगंबर आजोबांनी मेहनत घेऊन असे हिरे घरी आणले होते. त्यामुळेच जानकीचं स्वतःचं ऑफिस होतं जिथे अकाउंट अन इतर व्यवहार बघितले जायचे. सुभाषची पत्नी रेखाच्या नावावर 3-4 कपड्यांची दुकानं होती जे ती चालवत असे, परशुराम ची बायको मेघना हिचं स्वतःचं गॅरेज होतं. ती स्वतः पदर खोचून गाड्या दुरुस्त करत असे. दिगंबर आजोबांची अशीच एकदा हायवे वर गाडी बंद पडलेली असताना मेघना तिथे आली होती अन काही क्षणात गाडी दुरुस्त केली होती..बाजूला माझं गॅरेज आहे, थोडावेळ येऊन आराम करा असे ती म्हणाली अन दिगंबर आजोबांनी तिथेच पक्क केलं की ही माझ्या घरची सून हवी. मेघनाची जात पात अन घराणं बघण्याची गरजच नव्हती, कारण
रत्नपारखी कुटुंबात जात, धर्म पाहून लग्न न करण्याची अन केवळ कर्तृत्व बघून मुलगी स्वीकारायची रीत होती.

तीन पिढी मागील ती स्त्री कोण होती? कसला खजिना तिने मागे सोडला होता? काय होतं त्यात? शुभदा या घरात येईल का? आणि येऊन तिला ते रहस्य उलगडेल का? वाचा पुढील भागात..

भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2/

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-3/

भाग 4
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 5
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-5-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 6
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-6-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 8
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 9
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

4 thoughts on “घराणं (भाग 1)”

  1. खूप सुंदर, ही कथा वाचताना अंगावर शहारे येतात.. वाचत वाचत आपण ही कथेचा एक भाग होऊन गेलोय असं वाटलं..

    Reply

Leave a Comment