खाली सासुबाई आणि सासूबाईंच्या बहिणी दुपारची जेवणं आटोपून खोलीत मस्तपैकी पाय पसरून बसल्या होत्या,
गप्पा रंगल्या होत्या,
ती जिन्यातून खाली येत असतांना बेडरूममधून आवाज कानी पडला,
“पोटभर पोहे झाले आता भूकच नाही..”
“अगं मस्त पाटोड्यांची भाजी केलीये, बरोबर जेवण जाईल बघ..”
“यावेळी ते शेजारच्या सटवीने बोलावलं होतं का?”
“हा बाई, बोलवलं होतं तोंड वाकडं करत..”
“काय वाण दिलं मग?”
“दोन रुपयाचा रुमाल दिला..दुनियेची कंजूस बाई ती..”
“दोन रूपयाचा? ह्ये…इतका स्वस्त कधी मिळतो का..”
“रुमाल पण तसा आहे ना, कागदच जसा..”
“बघू?”
“ये इकडे दाखवते..”
सासूबाईंनी रुमाल एका ट्रॉलीत ठेवलेला..
तो दाखवायला बहिणींना किचनमध्ये घेऊन आल्या,
सासूबाईंनी नजर सिंककडे गेली,
“बघ…अशी कामं असतात आमच्या बयेची..एक काम धड करत नाही..”
ती जिन्यातून ऐकत होती..
उरला सुरला सगळा उत्साह मावळला..
केलेली सगळी मेहनत वाया गेली,
अन शेवटी जे व्हायचं तेच झालं,
मग कशाला इतका आटापिटा करून जीव दमवला असं वाटू लागलं..
ती किचनमध्ये गेली,
ओट्यावर पसारा होता,
सिंकमध्ये भांडी होती,
तिने एकवार सगळीकडे नजर फिरवली,
सुस्कारा टाकला,
अन म्हणाली,
“मरूदे तिच्यायला…”
समाप्त