गृहीत-2

दोघीजणी संसारात मुरलेल्या,

नणंदा, भावजया, जावा यांच्याबद्दल कथा रंगायच्या..

सासूबाईंना त्यांच्या मुलीने अमेरिकेहून वायरलेस हेडफोन पाठवले होते,

तेव्हापासून सासूबाई ते कानात घालून कीर्तनात मग्न राहू लागल्या,

तिला अजूनच एकटं वाटू लागलं.

एके दिवशी घरी तिच्या नवऱ्याच्या मित्राची जोडी घरी आली,

तो मित्र आणि त्याची बायको,

नवीनच लग्न झालेलं..

ती म्हणाली,

वहिनी यावेळी कंपनीत सर्वांना बोलावलं आहे,

तुम्ही येणार ना?

तिला याबद्दल मागमूसही नव्हता,

पण मला माहित नाही म्हटलं तर प्रश्न उभे राहणार,

हिचा नवरा हिला सांगत नाही का?

हिच्याशी बोलत नाही का?

ती म्हणाली,

हो येणार की नक्की..

पाहुणे गेले,

ती नवऱ्याजवळ आली,

काय हो? या अश्या गोष्टी बाहेरून कळतात मला..

तुम्हाला एक शब्द सांगावंसं वाटलं नाही?

मी कुठे मागे लागणार होते?

हा तुला सांगायचं राहिलं बघ..

जणू काही फार विशेष झालं नाही अश्या आविर्भावात तो बोलला..

तिला परत एकदा वाईट वाटलं..

नवरा दगड..

कितीही डोकं आपटा..

आपलाच कपाळमोक्ष होणार..

तिला वाटे,

अश्या नवऱ्याला आपण असू नसू काय फरक पडतो?

जाऊद्या, संसार आहे, चालणारच..!!

ती स्वतःची समजूत काढे..

एके दिवशी स्वयंपाक करता करता माहेराहून फोन आला,

आजीची तब्येत गंभीर आहे,

ताबडतोब येऊन जा..

तिने पटकन बॅग भरली,

जातांना सासूबाईंना सांगितलं,

भाग 3

गृहीत-3

1 thought on “गृहीत-2”

Leave a Comment