गर्भ (भाग 7) ©संजना इंगळे

 

भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/09/3.html

भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html

 भाग 5

https://www.irablogging.in/2020/09/5.html

 गर्भ 6

https://www.irablogging.in/2020/09/6.html

#गर्भ_भाग 7

एपिसोड 7 : “सत्य”

“बाबा…बाबा…दादा वहिनी जिवंत आहेत..”

गीतेश धावतच घरी येऊन बाबांना सांगतो… धाप टाकत तो बाबांच्या समोर उभा राहतो…

“कसं शक्य आहे??” बाबा शांतपणे विचारतात..

“बाबा…ते जाऊद्या.. पण दादा वहिनी दुसऱ्या विमानात होते आणि ते जिवंत आहेत..”

“जिवंत आहेत मग आले का नाही परत?”

गीतेशलाही प्रश्न पडतो..दादा वहिनी जर जिवंत आहेत तर तर गेले कुठे?? गीतेश दादा वहीनीला शोधायचं ठरवतो..

“बाबा…कुठे जाऊ शकतात दादा वहिनी?”

“माहीत नाही…पण जिथे असतील तिथून शोधून आन त्यांना..नातवाच्या मोहात मुलगा गमवायला नको..”

बाबा आता जरा नारमाईची भूमिका घेतात. तेही आसुसलेले असतात आपल्या मुलाला भेटण्यासाठी…

गीतेश चा शोध सुरू होतो…

__________

मेघनाद नेहमीप्रमाणे ड्रिंक्स घेऊन कामावर येतो, यावेळी मात्र डॉक्टर शलाका त्याला रंगेहाथ पकडतात…

“मिस्टर मेघनाद, हे काय बघतेय मी??”

“सॉरी मॅडम..”

“हे काय, अहो तुम्हाला धड उभं राहता येत नाहीये…कसं काम करताय तुम्ही??”

“मॅडम कामात काही अडचण नाही येत..”

“गप बसा..तुमचं काम किती नाजूक आहे माहितीये ना तुम्हाला??? एक जरी चूक झाली तरी किती नुकसान होऊ शकतं माहितीये??”

“सॉरी मॅडम, पुन्हा नाही करणार..”

“मी रिस्क घेणार नाही, आत्ताच्या आत्ता मी तुला नोकरीवरून काढून टाकतेय…”

“मॅडम असं करू नका प्लिज..”

“चालता हो आत्ताच्या आत्ता..”

मेघनाद दुःखी मनाने घरी जातो..घरी त्याचा भाऊ, आजी त्याला कारण विचारतात पण तो काही उत्तर देऊ शकला नाही…सकाळी उठल्यावर तो जरा शांत होतो…पण एवढ्याश्या कारणासाठी डॉक्टर शालाकाने मला नोकरीवरून काढलं याचा त्याला खूप संताप होतो…
______

डॉक्टर शलाकाची इतकी चिडचिड होण्याचं कारण म्हणजे गिरीजा त्यांना येऊन सतत गर्भाशय प्रत्यारोपण बद्दल विचारत होती…त्यात पोलीस अचानक हॉस्पिटलमध्ये आले…शलाका मॅडम एकदम घाबरल्या…

“पोलीस?? पोलिसांना समजलं तर?? गिरीजाला सत्य समजलं तर नसेल ना? तिने माझी तक्रार तर केली नसेल ना?? माझं हॉस्पिटल, माझे पेशन्ट…सगळं संपून जाईल… आणि मी? मी तुरुंगात गेले तर??” एक ना अनेक विचार शलाका मॅडमच्या मनात येऊन गेले…

“डॉक्टर शलाका तुम्हीच का??”

“हो मीच…काय झालं साहेब??”

“तुमच्या हॉस्पिटल च्या अम्ब्युलन्स मधून अमली पदार्थांची तस्करी झाली होती…तुम्हाला काही कल्पना आहे??”

विषय वेगळा आहे लक्षात येताच डॉक्टर शालाकाला जरा बरं वाटलं..

“याबद्दल मला काही कल्पना नाही..अम्ब्युलन्स आणि ट्रान्सपोर्ट चं सगळं काम वेगळं सेक्शन बघतं..”

“तुमच्याकडे कामाला असलेली सिस्टर अनुराधा… त्यांच्यावर संशयाची सुरी आहे..”

डॉक्टर शालाकाला आठवतं…

(फ्लॅशबॅक)

“हे बघ अनुराधा…हे ऑपरेशन खूप रिस्की आहे.”

“मी तयार आहे रिस्क घ्यायला..”

“जगात फक्त 16 शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत…त्यातल्या 12 यशस्वी झाल्या आणि केवळ 8 महिलांना गर्भधारणा करता आली..”

“मी नववी असेन..”

“तेही जाऊदे…पण दुसरं गर्भाशय तुझ्यात रोपण करायचं असेल तर ते आई किंवा बहिणीचं असावं लागतं…”

“गिरीजा माझी बहिण आहे..”

“काय??”

“हो…मॉडेलिंग साठी ती पळून गेली होती तेव्हापासून आम्ही तिच्याशी संबंध तोडला होता..”

“म्हणून तू तिच्यासमोर येत नव्हतीस??”

“हो…”

“तेही जाऊदे…तुझ्या या ऑपरेशन साठी 70 लाख खर्च येईल…कुठून आणशील??”

सिस्टर अनुला तिच्या नवऱ्याचे शब्द आठवतात..

“5 कोटी….5 कोटी मिळतील, जर तू मदत केली तर..”

“मॅडम मी आणेन..”

“70 लाख…जोक नाही..”

“मॅडम मी म्हटलं ना मी देईन..”

“म्हणजे काहीही करून तुला आई व्हायचंच आहे तर..”

“हो…हो…हो…मला आई व्हायचं आहे.”

“डॉक्टर शलाका?? कुठे हरवलात??”

“काही नाही…पण मी सिस्टर अनुला चांगलं ओळखते..त्यांनी असं केलेलं नसावं…माझी खात्री आहे…हवं तर पुरावे जमा करायला हॉस्पिटल तुम्हाला मदत करेल..”

“तुम्ही म्हणत असाल तर आम्ही त्यांना सोडतो…असही या केसमध्ये जास्त वेळ द्यायला आम्हाला वेळ नाही..”

डॉक्टर शालाकाला समजतं की हे 70 लाख अनुनेच अमली पदार्थ तस्कर करून आणले असतील..पण आई होण्यासाठी तिने ही किंमत मोजली होती..म्हणून एक आई म्हणून तिची काही चूक नव्हती…हाच विचार करून डॉक्टर शलाका अनुची सुटका करतात.
_______

तिकडे अनु आणि तिच्या नवऱ्याची चौकशी सुरू असते..

“कधीपासून तुम्ही अमली पदार्थाची तस्करी करताय??”

“नाही साहेब…आम्ही नाही..”

“शिंदे साहेब, त्यांना सोडून द्या…हॉस्पिटल मेम्बर्स ने यांच्याबतीत गॅरंटी घेतली आहे..”

अनुराधा आणि कल्पेश ला सोडून देण्यात येतं.. अनुराधा मनोमन डॉक्टर शालाकाचे आभार मानते..

_______

“मिस्टर गीतेश…तुमच्या भावाचा शेवटचा मोबाईल बंगलोर ला ट्रेस झाला आहे..”

“धन्यवाद साहेब..”

गीतेश विचार करतो..बंगलोर ला दादा काय करत असेल..तो बाबांना सांगतो..

“बाबा..बंगलोर ला आपलं एखादं घर किंवा कुणी नातलग??”

“बंगलोर ला लता ची आजी राहते…”

“पत्ता मिळू शकेल??”

गीतेश पत्ता घेऊन बंगलोर ला रवाना होतो…

क्रमशः

145 thoughts on “गर्भ (भाग 7) ©संजना इंगळे”

  1. ¡Bienvenidos, exploradores de oportunidades !
    Casino online fuera de EspaГ±a para nuevos usuarios – п»їhttps://casinofueraespanol.xyz/ casinofueraespanol
    ¡Que vivas increíbles logros extraordinarios !

    Reply
  2. ?Hola, visitantes de plataformas de apuestas !
    Casino por fuera con promociones semanales – п»їhttps://casinosonlinefueradeespanol.xyz/ п»їcasino fuera de espaГ±a
    ?Que disfrutes de asombrosas premios excepcionales !

    Reply
  3. Hello champions of vitality !
    Best Purifier for Smoke – Easy Filter Replacement – п»їhttps://bestairpurifierforcigarettesmoke.guru/ best purifier for smoke
    May you experience remarkable exceptional air purity !

    Reply

Leave a Comment