गर्भ (भाग 5) ©संजना इंगळे

 

भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/09/3.html

भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html

#गर्भ_भाग 5

एपिसोड 5: “मिशन ऑपरेशन”

गिरीजा शास्त्रक्रियेसाठी ठरलेल्या तारखेला जाते..तोवर गिरीजा आणि इम्रान मध्ये सगळं ठीक असतं… ऑपरेशन नंतर गिरीजा ला काही दिवस आराम सांगितलेला असतो…त्या काळात इम्रानला नवीन सिनेमे मिळतात..गिरीजा खुश होते, काही दिवसांनी तीसुद्धा नवीन फिल्म्स मिळण्यासाठी प्रयत्न करते…

एका ऑडिशन ची जाहिरात पाहून ती जाते…तिला समजतं त्या सिनेमात इम्रान ची नायक म्हणून निवड झालेली असते…ऑडिशन नंतर ती प्रोड्युसर ला भेटते..

“सर…इम्रान ची निवड केल्याबद्दल तुमचे खूप आभार, मी त्याची बायको…गिरीजा..”

“बायको?? तो तर म्हणाला होता की तो अविवाहित आहे..”

“काय??”

गिरीजाला धक्काच बसतो…

घरी आल्यावर ती इम्रान ला जाब विचारते..

“अगं असं सांगावं लागतं, अविवाहित असणाऱ्याला जास्त संधी असतात..”

“तुला लाज वाटते का तुझं लग्न माझ्याशी झालं आहे असं सांगायला?? आणि कसल्या संधी रे? हिरोईन शी फ्लर्ट करायला??”

_____

“अभिनंदन सिस्टर अनु, फायनली तुम्ही आई होणार आहात…”

“डॉक्टर शलाका तुम्हाला माहीत नाही मी आज किती आनंदी आहे…हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं..तुमचे हे उपकार मी कसे फेडू हेच मला कळत नाही..”

“उपकार कसले…पण एक काळजी आपल्याला घ्यायची आहे… माहीत आहे ना??”

“हो मॅडम, ही सगळी माहिती गुप्त असेल.”

“आजवर मी असं काम कधी केलं नव्हतं..पण तुझ्या मातृत्वासाठी मी हिम्मत दाखवली…”

________

गीतेश शास्त्रीजींवर अजूनही चिडलेला असतो…

“बाबा, तुम्ही अपत्यासाठी दोघांना घराबाहेर जायला भाग पाडलं…”

“काय उपयोग होता त्यांचा असं राहून..”

“बाबा? तुम्हाला कुटुंबापेक्षा संगीत जास्त प्रिय आहे?”

“हो…आहे…माझ्या पिढ्यांनी खूप मेहनत घेतली, साधना केली…माणूस ओळखला जातो ते कर्तृत्वाने… आपल्या पिढीपर्यंत लोकं आपलं घराणं ओळखतील…पण पुढे काय?? मेल्यावर माणूस लक्षात रहात नाही..त्याचं कर्तृत्व लक्षात राहतं..”

बाबांच्या या गोष्टीवर गीतेश निरुत्तर झाला…

_______

सिस्टर अनु गरोदर असते…बाळंतपणाच्या सर्व गोष्टींची ती काळजी घेत असते…अश्यातच तिचा नवरा येतो… आजही तो नशेत असतो…

“अनु…4 कोटी 30 लाख आहेत आपल्याकडे…मला एखादा हजार तरी काढू दे..”

“कशाला?? दारूसाठी??”

“थोडीशी….एकदम थोडी…अजून..”

“अजिबात नाही…आपलं ठरलं आहे ना, मुलाच्या भविष्यासाठी आपल्याला ठेवायचे आहेत ते..”

“हो पण..”

“पण बिन काही नाही… घर बघा एखादं छान…ते काम केलंत का??”

“हजार देना..”

अनु आता वैतागते…मग हळूच नवऱ्याजवळ जाते…त्याचा हात आपल्या पोटावर ठेवते…. पोटातलं बाळ हालचाल करताना त्याला जाणवतं आणि त्याचा नशा एका सेकंदात उतरतो…प्रकृतीच्या या अद्भुत चमत्काराशी त्याची पहिल्यांदा भेट झाली होती…त्याच्या रोमारोमात बाप संचारला गेला..इतक्यात बाहेर असलेला त्याचा मित्र त्याला आवाज देतो..

“येतोय ना रे??”

“जा तू…मला आता जमणार नाही यायला.आज नाही अन कधीच नाही.”

अनुच्या आनंदाला पारावार उरत नाही…इतकी वर्षे तिला जी गोष्ट जमली नाही ती इवल्याश्या गर्भाने करून दाखवली होती…

_____

गिरीजा अँटी डिप्रेशन च्या गोळ्या घेऊन tv बघत आपल्या खोलीत बसलेली असते…tv वर एक बातमी झळकते…

“पुण्यात पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी..”

गिरीजा एकदम उठून बसते…पुन्हा एकदा जगण्याची आशा तिच्यात निर्माण होते…सगळं सोडून ती तडक डॉक्टर शलाका कडे जाते…

“डॉक्टर शलाका..”

“तुम्ही??? खूप दिवसांनी..”

“मॅडम मला माझं गर्भाशय परत मिळेल??”

डॉक्टर शलाका उठून उभी राहते..त्यांच्या कपाळावर घाम चढलेला असतो…अंग थरथर कापत असतं..

“काय बोलताय तुम्ही??”

“मॅडम इतकं घाबरायला काय झालं?? माहीत आहे की माझं गर्भाशय तुम्ही काढून टाकलंत…पण पुन्हा मला..”

“हे बघा, मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं की पुन्हा एकदा विचार करा..”

“मॅडम, आयुष्य कसं वळण घेईल सांगता येत नाही…”

“हे बघा…ते आता शक्य नाही, तुम्ही जा इथून..”

एवढं म्हणत डॉक्टर शलाका तिथून निघून जातात…गिरीजाला वाईट वाटण्यापेक्षा तिला आश्चर्य जास्त वाटलं होतं…असं आपण काय बोललो की मॅडम इतक्या सैरभैर झाल्या???

________

गीतेश आपल्या घरी रियाज करत असतो, त्याचा एक मित्र…ज्यांची नुकतीच एका ठिकाणी ओळख झाली होती आणि एका भेटीतच दोघे मित्र बनले होते… त्याला भेटायला घरी येतो…रियाज संपवून दोघेही गप्पा मारायला लागतात…

“कशी चाललीये तुझी लॅब??”

“चालू आहे ठीक…आता डॉक्टर शालाकाच्या हॉस्पिटल मधेच काम करतो..”

“बाकी…घरी कोण असतं तुझ्या??”

“आई, वडील…लग्न व्हायचं आहे अजून..तुझं झालं??”

“मी आजन्म ब्रह्मचारी आहे..”

“कसं जमतं बुवा तुम्हाला…”

दोघांच्या बऱ्याच गप्पा होतात, मित्राचं लक्ष हॉल मध्ये असलेल्या त्याच्या भाऊ आणि वहिनीच्या फोटोकडे जातं..

“यांना कुठेतरी पाहिलं होतं..”

“दादा आणि वहिनीला??”

“हो…पण नेमकं आठवत नाही..”

“आता नाही ते या जगात..”

“Sorry.. मी उगाच..”

“नाही मेघनाद… तुलाच काय माहीत..”

क्रमशः

Leave a Comment