भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/09/3.html
एपिसोड 4: “धोका”
गिरीजा खूप तयारी करून audition ला जाते, तिला वाटलेलं की ऑडिशन ला बरीच मंडळी असतील..पण ती त्या ऑफिस मध्ये जाते तेव्हा तिथे कुणीही नसतं… ऑफिस बाहेरचा watchman तिला आत जायला सांगतो आणि मिश्कीलपणे हसतो… गिरीजा ऑफिस मध्ये जाते…तिथे प्रोड्युसर बसलेला असतो…
“या गिरीजा मॅडम, तुमचीच वाट पाहत होतो, आता बॉलिवूड मधील सुपरस्टार व्हायला तयार व्हा..”
“सर…मी तुमचे आभार कसे मानू मला तेच कळत नाहीये…इतक्या सहजासहजी तुम्ही मला संधी दिलीत यावर माझा विश्वासच बसत नाहीये..”
“कुठलंही काम सहजासहजी होत नाही मॅडम,त्यासाठी काही त्याग करावा लागतो..”
“कसला त्याग??”
“मी तुम्हाला रातोरात सुपरस्टार बनवतो, पण त्यासाठी मला जे हवं ते तुम्हाला द्यावं लागेल..”
“सर माझ्यासारखी नवोदित मुलगी तुम्हाला काय देऊ शकते..”
“तुला अंदाज नाही पण तुझ्याकडे देण्यासारखं खूप काही आहे..”
प्रोड्युसर वाकड्या नजरेने तिच्याकडे बघून बोलतो आणि तिला त्याचा रोख समजतो..
“सर…नकोय मला तुमचा रोल…मी रस्त्यावर पडलेली वाटली काय तुम्हाला??”
“माईंड युवर लॅंग्वेज….नसेल जमत तर जा निघून..आणि माझं नाव कुठे घेतलंस तर…तुझ्या आई वडिलांच्या जीवाला धोका असेल लक्षात ठेव..”
गिरीजा संताप करत तिथून निघते आणि तडक घरी येते..आल्या आल्या इम्रान म्हणतो,
“काय गं?? चिडलेली का दिसतेय??”
“रोल च्या बदल्यात शरीरसुख मागत होता तो हारामखोर..”
इम्रान काहीही बोलत नाही..
“तुला काहीच वाटत नाहीये हे ऐकून??”
“खरं म्हणजे, बहुतांश नायिका हे करतातच चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी… खूप कॉमन गोष्ट आहे ही..”
“इम्रान काय बोलतोय तू, अरे तुझ्या बायकोसोबत असं झालं आणि तुला काहीच वाटत नाहीये?”
“हे बघ, प्रॅक्टिकल विचार कर…तेवढ्या एका गोष्टीमुळे तू अडून राहशील, पण तेच जर तू केलं असतं तर तुझा पुढचा मार्ग मोकळा झाला असता..”
“इम्रान…लाज वाटते मला तुला माझा नवरा म्हणायला, तू असा विचार करू शकतोस?”
“जास्त बडबड करू नकोस, असही तुला काहीही धोका नव्हता ते करण्यापासून.. तू मोकळी झाली आहेस आता..”
गिरीजा रागाने लालबुंद होऊन घर सोडून निघून जाते…ती आपल्या घरी जाते…जाताना तिला प्रश्न पडतो की घरचे आपल्याला परत स्वीकारतील की नाही…कारण पळून जाऊन तिने आपलं मॉडेलिंग करियर केलं होतं..मोठ्या बहिणीने लाख सांगूनही तिने ऐकलं नव्हतं…आणि त्यात न सांगता इम्रानसोबत लग्न…
पण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता, घर इम्रानच्या नावावर होतं, आणि असं काही घडेल याचा तिने कधी विचारही केला नव्हता…
________
(काही वर्षांपूर्वी)
“संसार, बायको, अपत्य सगळं गेलं चुलीत… दिवसभर आपला नशेत असतोस…काय पाप केलं अन तू पदरी पडलास…”
“ए अनु…नीट बोल…नवऱ्याशी बोलतेय तू…”
“लाज वाटते मला तुला माझा नवरा म्हणून घ्यायला..”
सिस्टर अनु ला काही कमी अडचणी नव्हत्या..घरच्यांनी स्थळ पाहून लग्न करून दिलं… पण नवरा व्यसनी निघाला…सिस्टर अनु ने एकतर्फी संसार चालवला.. तिलाही आपलं हक्काचं मूल हवं होतं, संसार पूर्ण करायचा होता…डॉक्टर शलाका ने जेव्हापासून IVF चा सल्ला दिला तेव्हापासून तिच्या मनात आशेचा एक किरण दिसला होता…नवऱ्याला त्यासाठी तयार करणेही जरुरी होते… त्यासाठी ती त्याला सोडतही नव्हती…
“सिस्टर अनु, तुमचं ivf पुन्हा एकदा अयशस्वी झाले..”
“डॉक्टर शलाका, पुन्हा एकदा बघा ना…यावेळी तरी झालं असेल..”
“सिस्टर अनु, मला इतर भरपूर कामं आहेत…पुन्हा पुन्हा तीच रट लावू नका..”
सिस्टर अनु रडत रडत निघून जाते, डॉक्टर शलाका ला पश्चात्ताप होतो, आपण उगाच इतकं बोललो सिस्टर अनु ला..त्या हळूच सिस्टर अनु कडे जातात आणि म्हणतात..
“हे बघ अनु, यात तुझी चूक नाही…तुझ्या नवऱ्याच्या व्यसनी स्वभावामुळे आणि ड्रग च्या सेवनामुळे त्याचे शुक्राणू कमी पडताय.”
अनुच्या अडचणीत अजून भर पडली, तिच्या मातृत्वाच्या आशा आता धूसर होऊ लागल्या…
एके दिवशी अनुचा नवरा अनुजवळ आला आणि प्रेमाने बोलू लागला…हा अचानक बदल कसा झाला याचा विचार अनु करत होती तेवढ्यात त्याने बोलायला सुरुवात केली..
“हे बघ अनु, मी तुला आजवर काहीही दिलं नाहीये…पण आता तू जे मागशील ते तुला देईन..”
“मला मूल हवंय..”
“मिळेल..आपण मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ..महागडी ट्रीटमेंट करू…मुलाला शहरातल्या सर्वात मोठ्या शाळेत पाठवू, त्याला खूप मोठं करू..”
“तुम्ही आज जास्त घेतलीये का? इतके पैसे आहेत आपल्याकडे?? अहो साधा किराणा आणायला पैसे नाहीत..”
“किरण्याचं दुकानच विकत घेऊन देतो तुला…गाडी बंगला नोकर सगळं देईन..”
“वेड बीड लागलंय का तुम्हाला??”
“मला 5 कोटी मिळणार आहेत..”
“काय??? बँक लुटायचा विचार आहे का? हे बघा मी असली गुन्हेगारी खपवून घेणार नाही..”
“अगं नाही…फक्त एक काम करायचं आहे…शहिद रोड ला पोलीस बंदोबस्त आहे, येणाऱ्या गाड्यांची चेकिंग चालुये…”
“मग?”
“हे पाच कोटी मिळवणं फक्त तुझ्या हातात आहे..”
“नीट सांगा..”
“तू काहीही करून तुझ्या हॉस्पिटलमधून रुग्णवाहिका मॅनेज कर, त्यातून एका बॅग मधून काही माल त्या रोड वरून तिकडे पोहोचव…पोलिसांना चुकवताच एक व्हॅन पुढे असेल…त्यातील माणसांकडून पैसे घ्यायचे आणि माल द्यायचा..”
“इतक्याश्या कामाचे एवढे पैसे??”
“हो..”
“आहे काय त्या बॅग मध्ये?? एक मिनिट…तुम्ही अमली पदार्थाची तस्करी करायला लावताय?? नाही, शक्य नाही..”
“तुला माझं ऐकावच लागेल..”
“अजिबात नाही..”
अनुचा नवरा आणि तिच्यात मोठं भांडण होतं… नशेत तो तिच्या अंगावर धावून जातो…ती कसाबसा जीव वाचवत हॉस्पिटलमध्ये पोचते..”
“सिस्टर अनु? तुम्ही यावेळी इथे??”
“डॉक्टर…मला प्लिज आज नाईट ड्युटी करू द्या…मला घरी जाणं शक्य नाही..”
डॉक्टर शलाका ला काय समजायचं ते समजतं..
“ठीक आहे, तुम्ही निर्धास्तपणे राहा इथे..एक काम करा, लॅब मध्ये जा आणि मेघनाद कडून कालच्या पेशंट चे रिपोर्ट्स घेऊन या..”
अनु लॅब मध्ये जाते…तिथे सिस्टर मीना मेघनाद ला बोलत असते..
“अरे ड्युटी च्या वेळी तरी कमी पीत जा…नशेत काम करत असतोस नेहमी…डॉक्टर शलाका ला समजलं तर..”
इतक्यात अनु तिथे येते..
“मेघनाद सर, रिपोर्ट्स हवे होते..”
“सिस्टर अनु तुम्ही यावेळी??”
“हो आज नाईट ड्युटी आहे..”
सिस्टर अनु ते रिपोर्ट्स घेते…सगळ्यात वरचे रिपोर्ट्स तिचेच असतात…ती परत मेघनाद कडे जाते आणि विचारते की आई व्हायला तिला काय अडचण आहे ते..
“सिस्टर अनु, डॉक्टर ने तुमचा सोनोग्राफी रिपोर्ट्स काढायला सांगितलेला…तुमचं गर्भाशय पूर्ण डॅमेज झालं आहे…आणि त्यात शुक्राणूही काम करत नाहीये त्यामुळे गर्भधारणा अशक्य आहे..”
अनुला अजून एक धक्का बसलेला…एकवेळ ivf यशस्वी झालं असतं पण गर्भाशयच खराब झालं असेल तर….सगळंच अशक्य आहे…