आरोही एकदम घाबरते, इथे चांगल्यातलं चांगलं प्रेझेंटेशन व्हावं म्हणून मी प्रयत्न करतेय आणि स्वतःलाच असं जुन्या कपड्यात कसं प्रेझेंट करणार मी? इथे जवळपास मार्केटही नाही, मला दुपारीच बॅग उघडून बघायला हवं होतं, पण असं झालंच कसं? मी तर आठवणीने चांगले कपडे बॅगेत ठेवले होते. मग ते जाऊन हे जुने कपडे आले कुठून?
आरोहीने आईला फोन केला..
“आई, अगं माझ्या बॅगेतले कपडे..”
“अरे देवा, तुला सांगायचं राहूनच गेलं बघ..अगं तुझी आत्या एका लहानश्या गावात राहते, तिकडे असे कपडे घातले तर लोकं नाव ठेवतील, म्हणूनच मी ते काढून तुझे साधे ड्रेस दिले..पण तुला सांगायचं राहूनच गेलं बघ..”
आरोहीचा संताप होतो, असं वाटलं की आईला खूप बोलावं पण एक तर खोटं सांगून ती आलेली, वादही घालता येणार नव्हता. तिने मुकाट्याने फोन ठेऊन दिला. फोन ठेवला तसा मानवचा फोन आला..
“मिस आरोही, तयार असशीलच..15 मिनिटात खाली ये..कलाइन्ट् अर्ध्या तासाने येतोय, तोवर आपण चर्चा करू..”
“येस सर..”
आरोही आता पुरती गोंधळली, तिला स्वतःवरच राग येऊ लागला. अखेर बॅगेतला एक लाल रंगाचा बऱ्यापैकी असणारा पंजाबी ड्रेस तिने काढला, तो घालून केस नीट विंचरले, थोडी क्रिम लावून चेहऱ्याला पावडर लावली. अगदी साधा पेहराव तिने केला आणि ती खाली गेली.
मानव तिला बघताच चकित झाला, आरोही ऑफिसमध्ये सुद्धा असे साधे कपडे घालत नाही, इथे तर इतक्या महत्वाच्या प्रेझेंटेशन ला तिने असं यावं? त्याला राग आला..
“मिस आरोही, हे काय? असं प्रेझेंटेशन देणार तुम्ही??”
“सर मी सगळं सांगते,ते काय झालं की..”
“नमस्कार मिस्टर मानव…” रोहित सर समोर येऊन उभे राहतात.
“हॅलो सर..”
“वेळेच्या आधी यायची सवय आहे माझी..वक्तशीरपणा आवडतो मला..”
“ग्रेट सर..बसा..आरोही, आपल्याला 3 कॉफी ऑर्डर देऊन ये..”
“येस सर..”
आरोही ऑर्डर देऊन टेबलवर येते. दोघांच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर घाबरतच बसते.
“या मिस आरोही, आपल्या डील बद्दल तुम्हाला माहिती देतील..”
रोहित तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो. तिचा अवतार तो न्याहाळतो. आरोही आणि मानवच्याही ते लक्षात येतं. पण आरोही दुर्लक्ष करून बोलायला सुरुवात करते.
“सर आपल्या कंपनीचे साधारण 47 लाख कस्टमर आहेत, त्यांची ही माहिती..”
आरोही प्रेझेंटेशन देते पण तिचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. बोलायला ती थोडी अडखळते. रोहित सरांच्या हावभावावरून त्यांना हे प्रेझेंटेशन आवडलेलं नाही आणि त्यात इंटरेस्टया वाटत नाही असं दिसून येत होतं.
“Ok मिस आरोही, मानव सर..माझा निर्णय तुम्हाला कळवतो..मी येतो आता..”
रोहित सरांच्या बोलण्यावरून हा प्रोजेक्ट आपल्या हातून गेला असं दोघांना कळून चुकलं. आरोहीला एकदम भरून येतं, ती तिच्या रूम मध्ये जाते, मानवही चिडलेलाच असतो तोही तिच्या पाठोपाठ जातो..रूम मध्ये जाताच आरोही बेडवर दोन्ही पायात डोकं घालून रडू लागते..
“आरोही, तुला माहितीये का ही डील किती महत्वाची होती ते? एका साध्या चुकीमुळे ती हातून गेली. उगीच तुला टूर वर आणलं असं वाटायला लागलं मला..मीच प्रेझेंटेशन दिलं असतं तर बरं झालं असतं… useless…”
मानव दरवाजा आपटत निघून जातो. आरोहीचं रडणं थांबतं. ती सुन्न होऊन बेडवर पडते. डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते. संध्याकाळी जेवणासाठी मानव आरोहीला फोन करत होता. आपण आरोहीला जास्तच बोललो याची त्याला जाणीव झाली. आरोही फोन उचलत नाही म्हणून तो तिच्या खोलीत गेला. आरोही खिडकीबाहेर एकटक बघत असते..
“आरोही, सॉरी मी खूप बोललो तुला..जेवायला चल खाली..”
“सर मला भूक नाहीये..”
“तू जेवली नाही तर मीही नाही जेवणार .”
आरोही एकदा मानवकडे बघते,
“असे डायलॉग मेसेजेस मध्ये फ्लर्ट करणारी मुलं मारतात..”
“मग असं समज की मीही फ्लर्ट करतोय..”
दोघेही हळूच हसू लागतात, दोघांमधील असलेलं मळभ दूर होतं. दोघेही जेवण करून घेतात..
“आरोही, आपल्याला बहुतेक उद्या निघावं लागेल.. डील होणार नाही असं दिसतंय..ते झालं असतं तर अजून 3 दिवस थांबावं लागलं असतं..”
“ठीक आहे सर..”
जेवण करून दोघेही आपापल्या खोलीत जातात. थोड्या वेळाने मानवला रोहितचा फोन येतो..
“हॅलो, मानव सर..मी रोहित बोलतोय..”
“येस सर..बोला..”
“सर, खरं तर मी आरोही यांना पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं की deal तुमच्याशी करायचं. त्याचं कारण म्हणजे अत्यंत साधेपणाने , साध्या पोशाखात आणि साधं सरळ प्रेझेंटेशन त्यांनी दिलं.. मी गावाकडे वाढलेला माणूस, कितीही श्रीमंत झालो तरी साधेपणा मला प्रिय आहे. खूप कंपन्या येतात, त्यांचा मोठेपणा, श्रीमंती, थोडक्यात त्यांचं हाय फाय राहणीमान याचंच प्रदर्शन करतात..पण तुम्ही वेगळे होते.. हे deal फायनल समजा..”
“Thank you sir, thank you so much..”
मानवला प्रचंड आनंद होतो, तो तडक आरोहीच्या खोलीकडे जातो. ती दार उघडते, त्याला राहवत नाही आणि तो चक्क तिला मिठी मारतो..आरोही एकदम गोंधळून जाते, हे काय चाललंय तिला कळेना..काही वेळाने मानव भानावर येतो,
“सो सॉरी..actually जोशात येऊन मी..”
“हो सर पण झालंय तरी काय?”
“आपलं deal यशस्वी झालं..”
“काय सांगताय सर..पण कसं? कधी? केव्हा??”
मानव तिला सगळं सांगतो, तिला वाटू लागतं, आईने कपडे बदलून ठेवले ते एक बरंच केलं.
दुसऱ्या दिवशी रोहितच्या फॅक्टरीत जायचं होतं. सकाळी लवकर जाऊन दोघांनी ते काम उरकलं, आता दिवसभर मोकळा वेळ होता. आरोही आणि मानव मध्ये आता छान ट्युनिंग जमली होती. मानव आरोहीवर मनोमन प्रेम करू लागला, तिचा सहवास त्याला आवडू लागला. आरोही सुद्धा मोकळ्या मनाने मानव सोबत गोष्टी शेयर करत होती. दोघेजण आता एकदम कॉलेजमधील मित्राप्रमाणे वागू लागले होते. होटेलच्या स्विमिंग पूल वर एकमेकांवर पाणी उडवणं, एकमेकांची चेष्टा करणं सुरू होतं. या सर्वात दोघे एकमेकात विरघळून जात होते.
तिसऱ्या दिवशी जुजबी कामं आटोपल्यानंतर आरोहीला मानव सोबत असताना एक फोन आला आणि ती बोलू लागली..
“नाही बच्चू, काहीही झालं तरी तुला नाही सोडणार मी एकटं.. मी आहे ना तुझ्या सोबत? का काळजी करतो माझा बच्चू??”
मानव एकदम दचकला. कोण असेल हा? आरोहीचं कुणावर प्रेम तर नसेल?? मानव थोडा गडबडला. दिवसभरात बच्चू चे अनेक फोन येऊन गेले, आणि आरोही तासनतास बोलू लागली..मानवला आता राग येऊ लागला. आरोही सोबत तो तुटक वागू लागला, आरोहीच्या ते लक्षात आलं.
“सर..माझ्यावर नाराज आहात का??”
“मी? मी कशाला नाराज होऊ? आणि तुला काय, तुझा बच्चू आहे तुझी समजूत काढायला..मला नाही ना असले बच्चू..”
आरोही जोरजोरात हसू लागली, आसपासची लोकं बघू लागली पण तिला काही हसण्यावर नियंत्रण ठेवता येईना..शेवटी मानव तिला बाजूला घेऊन गेला.
“आरोही हळू ना जरा..”
“सर…तुम्हाला काय वाटलं, बच्चू कोण असेल?”
“असेल तुझा मित्र..बॉयफ्रेंड वगैरे..”
“सर..बच्चू म्हणजे माझी लहान बहीण, होस्टेलवर असते..कमी मार्क्स मिळाले म्हणून टेन्शन मध्ये होती..”
मानव एकदम खजील झाला..त्याला स्वतःवर हसू की रडू असं वाटायला लागलं..
._____
आरोहीची आई तिच्या वडिलांना विचारते,
“आरोहीशी बोलणं झालं का? कशी आहे ती तिथे?”
“बरी आहे..आत्याची सेवा करतेय..”
इतक्यात दारावरची बेल वाजली.
“अहो जरा बघता का..”
“बघ गं तूच…माझे पाय दुखताय..”
आरोहीची आई दरवाजा उघडते आणि समोर….
आरोहीची आत्या…
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Ohhh shitttt….. aatyach ghari aali, aata pudhe kay??… Pls next part lavkar pathava
Akdach complete story liha. . Waiting for what happens till end…