प्रमिला अजूनही तिच्या खोलीत असते, तिला काहीही माहीत नसतं. खुशी प्रमिलाच्या खोलीत जाते..
“ताई, तुमचीच वाट बघत होतो, आज चहा घ्यायलाही आला नाहीत खाली म्हणून तुमच्या खोलीतच पाठवला..”
“काही नाही गं, जुने फोटो बघत होते. गावाची आठवण येत होती. आरोही, मामा, मामी…सगळं कसं विखुरलं गेलंय..असं वाटतं भूतकाळात जावं आणि पुन्हा एकदा सर्वांना भेटून यावं..”
“देवाने ऐकलं बघा तुमचं, आज नकुल आणि आरोहीला जेवायला बोलावलं आहे आपण घरी..”
“काय सांगतेस? खरं?”
“हो..”
“अगं मग लवकर सांगायचं ना, आरोहिसाठी मी माझ्या हातचे खास पदार्थ बनवेन..अगं ती गरोदर होती ना तेव्हा माझ्याकडेच असायची. तिला काय आवडतं सगळं महितीये मला. चल मी जाते लगेच कामाला..”
“ताई नकुल आणि आरोही आलेत आत्ताच..”
“काय? ती घरात आहे? कधी भेटते तिला असं झालंय… ”
प्रमिलाला खूप आनंद होतो. आरोही तिला ओळखू शकणार नसली तरी मैत्रीण म्हणून प्रमिलाच्या मनात तिच्यासाठी खास जागा होती.
“ताई, अजून काही माणसं असतील जेवायला..”
“कोण?”
“ते आरोहीच्या नवऱ्याचे बॉस आहेत एक, त्यांचं कुटुंब पावसात अडकलं आहे, गाडी बंद पडली त्यांची..तिथुन आपलं घर जवळ म्हणून त्यांना इथेच बोलावलं, नकुल आला आणि लगेच त्यांचा फोन आला, नकुलला जावं लागलं, आरोही बसलीये खाली..चला..”
” बरं केलं बाई, संकटात मदत केलेली काय वाईट, चला या निमित्ताने नवीन लोकांशी ओळखी होतील..”
या क्षणापर्यंत सर्व काही आलबेल होतं. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. आरोहीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ एकाच ठिकाणी केंद्रित होणार होता. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. मधेच एखादी वीज चमकायची, गडगडाटाने सगळा आसमंत दुमदुमून जात होता. जणू आज होणाऱ्या वादळाची निसर्गाला चाहूल लागलेली. हा निसर्गही तर होता साक्षीदार, नैसर्गिक जिवोत्पत्तीचा, भूतकाळाचा, अपघाताचा, स्मृती विस्मृतींचा…
नकुल मानव आणि त्याच्या कुटुंबाला गाडीत बसवून सागरच्या घरी आणतो. सर्वजण बऱ्यापैकी भिजलेले असतात. गाडी थांबते, मानव, आर्वी, मानवची बायको, शुभम आणि सरिता गाडीतून उतरतात. खुशी त्यांना घ्यायला बाहेर जाते, जाताना टॉवेल घेऊन जाते. सर्वजण आपापलं अंग कोरडं करतात..
“तुम्ही या आत, मी सर्वांसाठी नवीन कपड्यांची व्यवस्था करते..”
“अहो नको, आम्ही इथेच थांबतो..पाऊस उघडला की जातो परत..”
“असं कसं? तुमच्या जेवणाचीही व्यवस्था झाली आहे..निश्चिन्त रहा..”
“अहो कशाला इतकं केलंत तुम्ही, उगाच त्रास तुम्हाला..”
“त्रास कसला त्यात, संकोच बाळगू नका…या आत..”
सागर सरिता मामीला निरखुन बघत होता. इतक्या वर्षात मामीचा चेहरा बदलला होताच, तरीही सागरला काहीतरी वेगळं वाटू लागलं.
सर्वांचे पाय पुढे पडत होते, दाराजवळ पाऊल पडणार तोच एक मोठी वीज कडाडली..त्याची कंपनं प्रत्येकाला जाणवली. निसर्ग जणू ही भेट थांबवण्याचा प्रयत्न करत होता. खुशीने सर्वांना आत नेलं, आर्वीला तिचा एक ड्रेस, मानवच्या बायकोला आणि सारिताला नवी साडी आणि मानवला सागरचे काही कपडे दिले. पावसात भिजून आल्यानंतर या उबदार कपड्यांनी सर्वांना बरं वाटलं. खुशी सर्वांना हॉल मध्ये घेऊन आली. सागर आणि नकुल तिथे आधीच बसलेले. सरिता मामी सागरला बघते अन नजर लपवण्याचा प्रयत्न करते. सागर शेवटी न राहवून म्हणाला…
“तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय..”
“मला? छे.. आपण पहिल्यांदाच भेटतोय..”
प्रमिला आत आरोही साठी खीर बनवत होती. तिचं काम आटोपून ती बाहेर आली. सर्व माणसं समोर बसलेली पण तिने आधी आरोहीला पाहिलं, तिच्याकडे मनभरून कटाक्ष टाकला आणि तिच्यासमोर जाऊन उभी राहिली. आरोहीची नजरही काहीशी वेगळीच होती, तिने काही न बघता प्रमिलाला मिठी मारली. प्रमिलाला धक्काच बसला..आरोही मिठीतुन बाहेर आली आणि म्हणाली,
“आपली भेट लग्नात झालेली ना, सागरच्या…”
“हो…बरोबर..”
ही गळाभेट जुन्या ओळखीची नसून नवीन पटलेल्या ओळखीची आहे हे प्रमिलाला समजलं.
“सागर, कोण कोण पाहुणे आहेत जरा ओळख करून दे..”
“नकुल आणि खुशीला तर तू ओळखतेच..हे त्याचे बॉस.. मानव..”
प्रमिला थबकते, “मानव? आरोहीचा मानव? छे.. एका नावाचे कितीतरी माणसं असतात. ”
“ही त्याची बायको, ही त्याची मुलगी आर्वी, हा त्याचा लहान मुलगा शुभम आणि…ह्या…”
सागरला सरिताची ओळख सांगता येईना. मानवची बायको म्हणाली,
“या सरिता काकू, आमच्याकडे असतात..आर्वी लहान असताना आमच्याकडे आलेल्या आणि आमच्याच झाल्या..”
प्रमिलाची नजर सरितावर खिळते..तिचं अंग थंडगार पडतं, कुणीतरी मेंदूवर जोरात प्रहार केल्यासारखं तिला झालं, तिची नजर तिलाच विचारू लागली..”समोर जे बघतेय ते स्वप्न नाही ना?”
नाव ऐकून सागरही अवाक होतो. सरिता मामी? आरोहीच्या मामी? त्या तर… मग…जिवंत कश्या??
सागर आणि प्रमिलाच्या मनात काहूर उठतं. बाकीचे मंडळी गोंधळून जातात, हे एकेमकांना पाहिल्यावर असं का वागताय?
खुशीला समजतं की काहीतरी नक्कीच आहे हे सर्वांना सलतंय..खुशी बोलते..
“चला ओळखी तर झाल्या, आता आम्ही जेवणाची ताट लावून घेतो..ताई, चला माझ्यासोबत..”
खुशी प्रमिलाला जवळजवळ हात ओढुनच आत नेते..आत गेल्यावर खुशी विचारते..
“ताई काय झालं? का इतक्या घाबरल्या आहात?”
“अगं ती…ती.. स..स..”
“काय? बोला ना..”
“सरिता…सरिता मामी..”
“मामी? कुणाची मामी?”
“आरोहीची मामी..”
“काय???”
खुशी एकदम बाजूला सरकते…
“कसं शक्य आहे? मामी तर अपघातात…”
खुशीला सगळ्या गोष्टी समजू लागतात. मामीने काय गेम केलाय हे तिच्या लक्षात येतं.
थांबा ताई, आत्ता त्यांचं पितळ उघडं पाडते..”
प्रमिला तिचा हात धरते,
“काहिही करू नकोस, सरिता मामीकडे नंतर बघू आपण, आता आरोही समोर काहीही नको..”
“ताई पण..”
“काय सांगशील सर्वांना? की ही आरोहीची मामी आहे?…मग हजारो प्रश्न…तुम्ही ओळख का दाखवली नाही? मामी शांत का होत्या? नकुल विचारेल…मामी त्या बाळाचं काय झालं..मग आरोही विचारेल…कुठलं बाळ…कुणाकुणाला उत्तरं देशील? आता हे वादळ इथेच रोखणं फक्त आपल्या हातात आहे..”
दोघीही शांत बसायचं ठरवून बाहेर येतात. सर्वजण जेवण आटोपतात. सरिता मामीच्या घशाखाली तर भीतीने अन्न उतरत नसतं. प्रमिला, सागर आणि खुशी काहीश्या चिंतेनेच जेवतात. जेवण झाल्यावर सर्वजण हॉल मध्ये एकत्र बसतात. तोच दारावर प्रमिलाच्या नवऱ्याचा आवाज..
“येऊ का आत?”
प्रमिला चकितच होते.
“अहो तुम्ही? कळवायचं तरी…या..”
प्रमिला त्याच्या हातातली बॅग घ्यायला जाते अन तो तिचा हात झटकतो..प्रमिला त्याच्या या वागण्याने हैराण होते. यांना असं काय झालं मधेच..
“या दाजी, बसा…कळवलं असतं तर..”
“काही पाहुणचार नकोय मला… आधीच एवढा पाहुणचार झालाय की आता कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही..”
“अहो काय बोलताय तुम्ही?”
त्याच्या तोंडाचा नशेचा वास येत होता,
“काय सागरभाऊ…तुमची बहीण लग्ना आधीच गरोदर होती म्हणे..”
“दाजी तोंड सांभाळून बोला..”
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
खूपच छान, इंटरेस्टिंग
Next page 👍
Pramila chya nawryacha naav adhi kalpesh hota mg Rakesh kasa zala kahi kalala nahi
Manav ne tyachya baykola tyachya past baddal kahi sangitla naste asa adhi mhatla ahe mg anathashramat tyachya baykola achank tyacha paat mahiti mhatlyache lihile ahe.. Pramila lagna adhi manav ani tyachya baykola bhetleli aste tari te sagle sagar kade alyawr ti fakt mami lach kashi olakhate, manav ani tyachya baykola ka olakhat nahi.. Sagar sheti karat hota asa pn mhatla ahe mg to achanak itka shrimamt kasa hoto.. Nakul meeting sathi manav kade gekyawr manav tyala olakhato ki ha aarohi cha nawra ani mg hill war aarohi chakkar yeun padate tevha manav la parat kasa kalate ki ha aarohi cha nawra ahe.. Kahi kalat nahi ahe.. Story kashi lihili geliye..
can i get generic clomiphene for sale how to get clomid price where can i buy clomiphene without dr prescription can i get generic clomiphene online how to buy generic clomid no prescription can you get generic clomid online can i get clomiphene online
More content pieces like this would urge the web better.
Proof blog you be undergoing here.. It’s hard to assign great status writing like yours these days. I truly recognize individuals like you! Rent guardianship!!
azithromycin over the counter – ciplox ca purchase flagyl pills
semaglutide 14mg over the counter – cheap periactin buy periactin online cheap
purchase domperidone pills – domperidone cheap flexeril uk
buy inderal generic – buy generic inderal order methotrexate 5mg generic
cheap amoxicillin generic – purchase amoxil online buy ipratropium online
generic zithromax 250mg – buy nebivolol 5mg for sale buy bystolic generic
augmentin 625mg brand – atbioinfo buy acillin sale
nexium canada – anexa mate buy nexium 20mg generic
coumadin price – blood thinner losartan 50mg ca
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
order mobic 15mg sale – https://moboxsin.com/ order mobic 7.5mg online cheap
brand deltasone 40mg – aprep lson prednisone 5mg uk
ed pills that work – cheapest ed pills best pills for ed
cheap amoxicillin without prescription – https://combamoxi.com/ buy amoxicillin online