प्रणवने त्यांचे छानपैकी फोटो काढले, दोघीजणी खुश झाल्या, त्याला फराळासाठी घरी बोलावलं आणि तोही लगेच गेला,
दोघी मैत्रिणींनी त्याला रक्षाबंधनला राखी बांधली होती, छान बहीण भावासारखं त्यांचं नातं तयार झालेलं,
त्यांनी बोलता बोलता त्याला विचारलं,
“काय मग प्रणव? कुठवर आला तुझा बिझनेस?”
तो उत्साहाने सगळं सांगू लागला,
“मी एक छान इमेज वेबसाईट बनवली आहे, लोकांना त्यावरून फ्री इमेज मिळतील आणि चांगल्या क्वालिटीच्या इमेज घेण्यासाठी पैसे भरावे लागतील, त्यातून माझा इन्कम होत जाईल”
तो हे सांगत असतानाच त्याचे वडील तिथे आले, दोघी मैत्रिणींनी त्यांनाही फराळ वाढला,
तो सांगत होता, “आता ना ताई चांगल्यातला कॅमेरा घेऊन जास्तीत जास्त फोटो काढून वेबसाईटवर अपलोड करायचेत”
त्याच्या वडिलांनी ऐकलं आणि म्हणाले,
“हौस करतोय खरं तू, पण महागडा कॅमेरा घेऊन फोटो विकले गेले नाही तर? कुठून फेडणार कॅमेऱ्याचे पैसे? आणि तू जे करतोय ते किती दिवस चालेल? पैसे कायम थोडीच देणार लोकं..”
हे ऐकताच त्याचा उत्साह मावळला, फराळाचा आनंदही घेतला नाही त्याने. मुलाला आशा दाखवण्याऐवजी काम सुरू होण्याआधीच नकारात्मक टिप्पणी करून काम करण्याची त्याची अर्धी उर्जाच नाहीशी करून टाकली”
तीन माणसं, तीन प्रसंग,
पण आपल्याला अंतर्मुख करणारे,
उत्साही, आनंदी वातावरणात खडा टाकणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात,
आपल्या आनंदावर विरजण पाडण्यात काहींना विलक्षण समाधान मिळत असते,
त्यामुळे माणसाचा उत्साह आणि काम करण्याची अर्धी ऊर्जा अश्या या माणसांमुळे अर्धी तिथेच खलास होते,
तात्पर्य,
आपण ती माणसं बनू नये,
आणि दुसरं म्हणजे…
अश्या नकारात्मक माणसांना जेवढं दूर ठेवता येईल तेवढं ठेऊन आपल्या सकारात्मकतेवर परिणाम होऊ देऊ नये..
बरोबर आहे। परन्तु शेजरच्यांना दूर ठेवले जाऊ शकते, नवर्याला कसे दूर ठेवणार।