खंबीर-2

हे म्हणण्यामागे शिल्पाचा हेतू वेगळा होता, उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तिला आपल्या गावंढळ वहिनीची लाज वाटू नये म्हणून रेखाला येऊ देण्यास तिने नकार दिला..

पण आई कुठे शांत बसते,

“अगं रेखा ती म्हणत नसली तरी तिची धावपळ होत असेल, आज आणि उद्या जास्तीचा स्वयंपाक कर..तुझा नवरा देऊन येईल डबा रोज”

रेखाला हे पटत नव्हतं, आईचं प्रेम वगैरे ठीक होतं पण आता मात्र अतिरेक होत होता..

वाढदिवसाच्या दिवशी सर्वजण शिल्पाच्या घरी पोहोचले,

तिथून हॉल वर सगळे निघाले,

वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत होता..

सर्वांनी शिल्पाच्या मुलीला मोठमोठे गिफ्ट दिले,

रेखा आणि तिच्या नवऱ्याला गिफ्ट आणायला वेळच मिळाला नाही म्हणून त्यांनी एका पाकिटात पैसे टाकले आणि ते घेऊन गेले..

रेखाच्या सासूने मात्र त्यांचं वेगळं गिफ्ट आणलेलं,

सासूबाईंनी काय घेतलं असेल? रेखाला प्रश्न पडला, कारण घरी याबद्दल त्या काहीच बोलल्या नाहीत..

नंतर समजलं,

सासूबाईंनी त्यांच्याकडचे पैसे साठवून शिल्पाच्या मुलीसाठी सोन्याच्या बांगड्या बनवल्या होत्या..

एवढं महागडं गिफ्ट बघून रेखा आणि तिचा नवरा अवाक झाले..

नंतर काही दिवसांनी ओमचा निकाल लागला, बारावीला उत्तम गुणांनी तो पास झालेला,

पुढच्या शिक्षणासाठी त्याचा नंबर चांगल्या कॉलेजला लागला,

पण त्याची फी खूप होती,

आता हे पैसे भरायचे कसे हा मोठा प्रश्न उभा राहिला..

पैसे कसे जमवायचे याचीच सोय बघत असताना दोन माणसं घरी आली..

गावाकडची नातेवाईक होते ते,  गावाकडची जमीन यांना पिकवण्यासाठी दिलेली..

सासूबाईंच्या हातात त्यांनी मोठ्या रकमेचा चेक टेकवला..

“सरकारी योजनेनुसार नुकसानभरपाई म्हणून सरकार कडून रक्कम मिळते, तुमची ही मागच्या काही वर्षांची रक्कम”

रेखा आणि तिचा नवरा आशेने बघतात, रेखाचा नवरा लगेच आईकडे जाऊन म्हणतो,

“आई देव पण लगेच मदत करतो बघ..ओमच्या फी साठी पैसे लागणारच होते, पहिल्या वर्षाची सोय झाली तरी खूप आहे, बाकीचे मी करेल ऍडजस्ट, आणि हे पैसेही तुला लवकर परत करेन”

सासूबाईंनी चेक मागे घेतला,

“हे पैसे काही शिक्षणाला वैगेरे ला वापरायचे नाहीत, तुम्ही आत्तापर्यंत काय केलंत? काटकसर करून पैसा जमवला असता तर अशी वेळ आली नसती… कमवायची अक्कल नाही आणि आले पैसे मागायला..”

रेखा आणि तिचा नवरा दोन पावलं मागे झाले,

त्यांना आईकडून हे अपेक्षित नव्हतं..

शिल्पाच्या मुलीला सोन्याच्या बांगड्या करू शकते पण ओम साठी पैसे देऊ शकत नाही?

****

भाग 3

खंबीर-3 अंतिम

7 thoughts on “खंबीर-2”

Leave a Comment