खंबीर-1

नणंदबाई आणि तिच्या मिस्टरांची बदली रेखाच्या गावी झाल्यापासून रेखाला अजिबात फुरसत मिळत नसे..

सासूबाईंचा सगळा जीव मुलगी आणि तिच्या संसारात..

ती इथे आल्यापासून त्या रेखाच्या मागे सतत भुणभुण लावायच्या,

“अगं शिल्पाला छानपैकी चिवडा बनवून दे..शंकरपाळे बनवून दे..आज पावभाजी बनवलीस का? ओमला सांग आत्याला देऊन ये म्हणून..”

रेखाचा नवरा एका छोट्याशा कंपनीत कामगार म्हणून काम करत होता,

आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती,

जेमतेम खर्च सुटत असे,

त्यात रेखाच्या मुलाचा, ओमच्या शिक्षणाचा खर्च वाढत चाललेला..

 

आपणही कुणाची तरी मुलगी आहोत, आईची माया काय असते हे रेखा जाणून होती,

त्यामुळे सासूबाईंचा ओढा मुलीकडे असण्याबद्दल तिला काही वाटत नसे, तीही आनंदाने सगळं करत असे..

याउलट शिल्पाच्या घरी आर्थिक सुबत्ता होती,

तिला कसलीही कमी नसायची,

पण आईने आणि वाहिनीने काही पाठवलं की त्याला नाही म्हणायची नाही,

त्यांची मी लाडकी आहे म्हणून माझ्यासाठी करताय, हेच तिला वाटे..

आई बद्दल तिला कौतुक वाटे पण सगळी मेहनत मात्र रेखाची असे, त्याबद्दल मात्र तिला कदर नव्हती..

तिच्या मते रेखा कमी शिकलेली,गावाकडची कमी हुशार मुलगी, स्वयंपाकघर ते देवघर इतकीच तिची पोहोच..

शिल्पा उच्चशिक्षित, चांगल्या नोकरीला…

असंच एकदा शिल्पाच्या मुलीचा वाढदिवस होता, त्यांनी मोठा कार्यक्रम ठेवला होता..

आईला तर काय करू अन काय नको असं झालेलं..

“शिल्पा अगं झाली का सगळी तयारी? काही करायचं असेल तर सांग, रेखाला पाठवून देते आठ दिवस आधी”

“अगं आई सगळं बाहेरून मागवलं आहे, नको पाठवू वहिनीला..”

***

 

भाग 2

खंबीर-2

भाग 3

खंबीर-3 अंतिम

 

2 thoughts on “खंबीर-1”

Leave a Comment