क्वीन-5

 गेटवर आज त्याची एन्ट्री होणार होती..

सर्वजण श्वास रोखून पाहत होते..

कोण जिंकणार म्हणून,

एकीला लक्षात आलं..

ती इथे दिसत नाही,

म्हणजे…ती नक्की आर्यनच्या मागे बसणार…

म्हणजे…आर्यन विजेता??

कुजबुज सुरू झाली,

गर्दी ओरडू लागली,

“आर्यन…आर्यन..आर्यन..”

काही वेळाने आर्यन गर्दीतून पुढे आला..

“अरे मी नाहीये विनर, नाहीतर मला कळलं असतं आधीच..”

“तू इथे आहेस, विहान..मानव इथे आहे..मग विजेता कोण??”

“शंतनू? प्रतीक? रुद्र? की जय??”

तेही स्पर्धेत होते.. पण सगळे इथेच होते..

“अरे मग जिंकलंय तरी कोण?”

गर्दी आता वैतागु लागली..

तेवढ्यात गेटवरून बाईकचा आवाज आला…

बाईक रेस करण्याचा…

आणि दिमाखात बाईक आत शिरली,

डोक्यावर हेल्मेट होतं..

हेल्मेट खाली कोण मुलगा आहे बघायला सगळे आतुर होते..

हेल्मेट काढण्यात आलं आणि सगळेजण चार पावलं मागे सरकले,

एवढ्या गर्दीतही स्मशान शांतता पसरली…

एकाने हळूच आवाज काढला, तसे सर्वजण जयघोष करू लागले..

“नंदिनी…नंदिनी…नंदिनी..”

यावेंळी कॉलेजला किंग नाही,

तर क्वीन ऑफ द इअर मिळाली होती..

आजवर कुणा झाशीच्या राणीने या स्पर्धेत भागच घेतला नव्हता..

पण तिला काय अवघड होतं?

गावात कीर्तनाच्या सुरात मुरलेला तिचा आवाज

प्रत्येक लग्नात धरलेला ठेका,

शाळेत वक्तृत्वाचे घेतलेले पाठ,

आणि क्रीडास्पर्धेत चपळाई दाखवणारी ती,

कॉलेजमध्ये टॉपरही तीच…

आदल्या दिवशी विजेतेपद तिला मिळालं हे तिला समजलं,

तेव्हा आईला तिने सांगितलं..

आई म्हणाली,

शेवटी तुझं उद्दिष्ट पूर्ण केलंस,

आता उद्याचा दिवस तुला सूट..

तुझ्या ध्येयासाठी जे काही सोडलं होतंस ते सगळं एक दिवसासाठी जगून घे..

दिल्लीत एका नातेवाईकडून बाईक मागवली,

गावाकडे तिच्या भावाने शिकवली होतीच की तिला..चांगली चालवता येत होती..

आईने पैसे पाठवले बरेच..

पार्लर मध्ये गेली

पूर्ण मेक ओव्हर करायला सांगितला..

ती अशी बदलली की आता कॉलेजमध्ये तिच्या इतकं सुंदर कुणीही नव्हतं..

“नंदिनी, नंदिनी..”

दिमाखात हेल्मेट उतरवत तिने आजूबाजूला पाहिलं..

तिला पहिल्या दिवशीची ती दिसली,

मान खाली घालून, घाबरत, बिचकत प्रवेश करणारी..

आणि आजची ती…

ती आली,

तिने पाहिलं…

ती लढली..

तिने जिंकून घेतलं सारं..

*****

कुणा राजाची राणी होण्यासाठी धडपडू नका..

स्वतः राजा बना…

समाप्त

8 thoughts on “क्वीन-5”

Leave a Comment