क्वीन-4

 खाली मान घालुन लायब्ररीत जायची, अभ्यास करायची..

एकजण म्हणाला,

“आर्यन…अरे आयटम गर्ल ला कुणीही पटवतं… या पोरीला पटवून दाखवलंस तर मानू तुला..”

“कोण ही? बेहेनजी…सॉरी ब्रो…”

“अरे लाईफ मध्ये काहीतरी थ्रिल पाहिजे…ही पोरगी कुणाला पटण्यासारखी वाटत नाही..”

“आर्यनला पटणार नाही अशी एकही मुलगी इथे नाही..”

“मग घेतोस का चॅलेंज?”

“घेतलं..”

हातावर टाळ्या देत त्यांचं ठरलं..

आर्यन तिचा पाठलाग करे,

लायब्ररीत जाऊन तिच्यासमोर बसे,

तिला इशारे करे..

आर्यन कॉलेजमधला हॅन्डसम मुलगा,

जवळपास अर्ध्या मुली त्याच्या मागावर..

असा मुलगा आपल्या मागे का लागतोय तिला प्रश्न पडे, पण ती दुर्लक्ष करे..

दुर्लक्ष केलं तरी शेवटी मानवी मन..

त्याला आपल्यावर प्रेम तर जडलं नसेल ना? मी मॉडर्न नसले तरी माझ्या साधेपणावर, हुषारीवर एखादा प्रेम करू शकतो ना?

दुसऱ्या क्षणी मनाला आवर घाली..

एक मुलींचा घोळका तिच्याजवळ आला,

म्हणत होत्या,

आर्यनच्या एका कटाक्षासाठी आम्ही झुरतो,

अन तो तुझ्यासाठी..

लकी गर्ल…

हळूहळू कॉलेजमध्ये पसरलं,

आर्यन आणि ती..

नावं जोडली गेली,

तिचा काहीही संबंध नसतांना..

तिने अजून दुर्लक्ष केलं..

किंग ऑफ द इअर ची स्पर्धा जवळ येऊ लागली,

यानुसार वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात,

सिंगिंग, डान्स, स्पोर्ट्स, स्पीच…

या सर्वात जो विजेता असेल आणि जो अभ्यासातही जास्त गुण मिळवेन तो विजेता ठरणार होता..

आर्यन, विहान…की मानव…

मुली तर दूरच..हाय हिल्स मध्ये कसल्या स्पोर्ट्स खेळणार, आणि अभ्यास तर दूरच..

त्यांचं एकमेव उद्दिष्ट..

बॉयफ्रेंड…

गाडीच्या मागे बसून हिंडणं..

कारण किंग ऑफ द इअर विजेता झाला की त्याची गेटवर स्पेशल एन्ट्री व्हायची, महागड्या बाईकवरून तो गेटमधून आत येई, आपल्या गर्लफ्रेंडला मागे बसवून..

आणि पूर्ण कॉलेज त्यांना बघून टाळ्या वाजवी..

या स्पर्धेची सुरवात झाली,

कॉलेजमध्ये एकच जल्लोष,

या स्पर्धा गुप्ततेत व्हायच्या,

कुणासोबत चूक होऊ नये अथवा पब्लिकच्या दबावाखाली गोंधळ उडू नये म्हणून..

आणि निकाल फक्त विजेत्याला सांगितला जाई,

त्याने दिमाखात एन्ट्री करायची…

चर्चा, उत्साह, गॉसिप या सगळ्यात ती भाग घेत नव्हती..

तिचा आपला अभ्यास सुरू होता..

स्पर्धा आटोपली..

एकीकडे कॉलेजमध्ये वाद सुरू कोण जिंकणार याबद्दल,

दुसरीकडे या तिघांपैकी एकाला आपल्या जाळ्यात कसं ओढता येईल हा मुलींचा प्रयत्न..

तो दिवस उगवला…

निकाल हाती लागला…

*****

भाग 5 अंतिम

https://www.irablogging.in/2022/12/5.html

Leave a Comment