क्वीन-3

 हे स्पर्धा विद्यार्थ्यांनी आपापसात ठरवलेली,

आणि जो किंग ऑफ द इअर असायचा त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळे,

कॉलेजमध्ये त्याची शान असायची,

होर्डिंग्ज लागायचे,

कॉलेजचा हिरो म्हणून तो गणला जाई.

आणि दुसरीकडे मुली,

यापैकी एकाला आपला बॉयफ्रेंड म्हणून मिरवण्यासाठी धडपड करत..

वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची गर्लफ्रेंड बनण्याचा प्रयत्न…

ती रूमवर आली,

हे सगळं बघून ती पुरती धास्तावली, पण घर सोडून लांब आलोय, परत फिरणं शक्य नव्हतं..

ती हळूहळू सगळं बघू लागली,

मुली कश्या राहतात, कश्या दिसतात, 

पार्लरमध्ये कोणत्या गोष्टी करतात,

कपडे कुठून घेतात..

तिलाही मोह झाला,

आपणही असं रहावं,

छान कपडे घालून मुलांना आपल्याकडे आकर्षित करावं..

तिनेही प्रयत्न केला…

हळूहळू तिच्याकडेही मुलं बघू लागली,

ती होती सुंदरच,

पण मॉडर्न राहू लागल्याने वातावरणाशी एकरूप झाली,

तिला हे आवडू लागलं,

मग सुरू झाल्या, 

पार्लरच्या वाऱ्या, नवनवीन खरेदी…

एके दिवशी घरून फोन आला,

तसा रोजच यायचा,

पण आज आई काळजीत वाटत होती,

ती म्हणाली,

“बाळा मोठ्या शहरात गेली असलीस तरी आपली मुळं विसरू नकोस, आपण साधी माणसं.. जगाच्या मोहमायेत अडकून आपलं उद्दिष्ट विसरू नको…गावत तू एकमेव मुलगी आहेस जिला मोठ्या शहरात शिकायला पाठवलं..लोकं बोलत होती, मुलगी बिघडेल म्हणून रोखत होती.. पण आम्ही सर्वांचा विरोध पत्करून तुला पाठवलं.. त्याचं तू चीज करशील मला खात्री आहे..”

आईच ती,

 

मुलीच्या आवाजावरून तिला समजत होतं..

तिने फोन ठेवला तशी ती भानावर आली,

आपण इथे कशासाठी आलोय? आपलं उद्दिष्ट काय? स्वतःला बहुलीसारखं सजवून मुलांसोबत नावं जोडली जावी म्हणून खटाटोप करणं? की सर्वात सुंदर दिसून किंग ऑफ द इअर ची गर्लफ्रेंड बनण्याची धडपड करणं?

तिने आपला बनाव उतरवला,

आधीसारखी साधी राहू लागली,

अभ्यासात लक्ष घालू लागली,

कुणाच्या अध्यात मध्यात नव्हती..

तिकडे मुलींची स्पर्धा..

मानव, आर्यन आणि विहानला आपल्या जाळ्यात ओढायची..

आर्यनचा मित्रांचा एक गृप होता,

टवाळ…तो ग्रुप बघत हिच्याकडे बघायचा..

काकूबाई पोरगी म्हणून,

****

भाग 4

https://www.irablogging.in/2022/12/4.html

भाग 5 अंतिम

https://www.irablogging.in/2022/12/5.html

Leave a Comment