क्वीन-1

 आज तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता…

कॉलेजचा पहिला दिवस,

एका लहानश्या शहरातून आलेली ती..

दिल्लीत मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेली..

मोठी स्वप्न पाहणारी,

साधी, सरळ, नाकासमोर चालणारी..

हुशारीच्या जोरावर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला..

पहिला दिवस होता,

कुणीही ओळखीचं नाही,

इथे सगळे नवीन,

कॉलेजमध्ये कसे कपडे घालून येत असतील मुली? त्याही माझ्यासारख्या सध्या असतील की मॉडर्न? उगाच आपण गावंढळ वाटायला नको,

म्हणून तिने तिची जीन्स आणि एक ढगळा टॉप घातला,

आपले कुरळे केस घट्ट बांधले,

आणि चेहऱ्याला पावडर लावली,

नेहमीपेक्षा छान दिसत होती,

स्वतःवरच खुश झाली,

कॉलेजमध्ये मुलं नजरा वळवून बघतील तुझ्याकडे..

आरश्याशी बोलली अन स्वतःच लाजली..

कॉलेजमध्ये पोहोचली,

गेटच्या आत एकेकाला बघून डोळे विस्फारू लागले,

काय त्या मुली, काय त्यांचे कपडे..

बड्या बापाच्या श्रीमंत मुली…

****

भाग 2

https://www.irablogging.in/2022/12/2_11.html?m=1

भाग 3

https://www.irablogging.in/2022/12/3_11.html?m=1

भाग 4

https://www.irablogging.in/2022/12/4.html

भाग 5 अंतिम

https://www.irablogging.in/2022/12/5.html

Leave a Comment