कौल-3

त्यांची सहनशीलता संपली होती,

सासूला ते बोलू लागले,

गेले कित्येक वर्षे तुझी कटकट आणि तोफांड ऐकून मी पार वैतागलोय,

तुला सांगायचो,

माझं वय वाढत चाललंय, मानसिक धक्के सहन होत नाही मला..

तरी तुझ्या कटकटी सुरूच असायच्या,

लग्नानंतर काय दिलं, माझ्यासाठी काय केलं म्हणत रोज माझ्याशी भांडत होतीस,

घरात कुणाला त्रास नको म्हणून चार भिंतीबाहेर मी जाऊ देत नव्हतो,

पण आता बास,

यापुढे तुझं एकही ऐकून घेणार नाही मी,

आज तुझ्यामुळे ही परिस्थिती ओढवली माझ्यावर..

मुलाने ऐकलं,

देवासारख्या बापाला आईने इतका त्रास दिलाय हे ऐकून त्याचा संताप झाला,

आईला काहीबाही बोलू लागला,

आईचाही संयम सुटला,

“अहो लाज वाटू द्या जरा..मुलाचे त्याच्या आईविरुद्ध कान भरताय तुम्ही… आजपर्यंत काही केलं नाही आणि आता उरल्यासुरल्या आयुष्यात हे दिवस दाखवणार का मला? काय पाप केलं अन असा नवरा मिळाला..”

हे ऐकून सासरे आता चवताळले,

कसलाही विचार न करता साठी ओलांडलेल्या आपल्या बायकोवर त्यांनी हात उगारला..

सून मूकपणे सगळं बघत होती,

तिला काहीतरी आठवत होतं..

मुलाला सुद्धा आईचा प्रचंड राग आलेला.

त्याने आईशी बोलणं सोडून दिलं..

सासू एकटी पडली,

मुलगा, नवरा बोलत नाही,

सुनेचा तर प्रश्नच नाही..

तिची घुसमट होऊ लागली,

सगळं सोडून निघून जावं असं वाटू लागलं..

तिच्या नवऱ्याला आता कुठे बायकोची किंमत कळू लागलेली,

मधल्या काळात त्याची नोकरी गेली तेव्हा तिने कसा संसार केलेला हे पाहिलेलं त्याने,

आता एका छोट्याशा कंपनीत काम करत होता,

तिथे मोठं राजकारण,

सगळे मिळून याच्याविरुद्ध कट कारस्थान करत होते,

*****

भाग 4
https://irablogging.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b2-4-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

Leave a Comment