कौल-1

सासूबाईंनी मुलाचे कान भरले तसं त्याने बायकोच्या कानशिलात लगावली,

त्या एका घटनेने ती पार हादरली,

निमित्त क्षुल्लक होतं,

पण सासूबाईंनी सगळा आरोप तिच्यावर टाकला,

त्याक्षणी घर सोडून जावं असा विचार मनात आला,

नवरा डोक्यावर पट्टी बांधून आई म्हणेल ते मान्य करत होता,

मग ते खरं की खोटं,

सत्य की असत्य,

न्याय की अन्याय,

कशाचाही विचार करत नव्हता,

त्या दिवसापासून ती रोज रडायची,

मनाने खंबीर होती,

पण प्रतिकार करता आला नाही,

डोळ्यासमोर गरीब आई वडील फिरायचे,

सुखी संसाराचं चित्र तिने त्यांना दाखवलं होतं,

तेही लेक सुखात आहे म्हणून चारचौघात मिरवायचे,

त्यांचा हिरमोड करण्याची ताकद तिच्यात नव्हती,

तो काळही असाच होता,

संसार सोडून जाणं म्हणजे अक्षम्य गुन्हा,

तिने ठरवलं,

संसाराचा गाडा ओढत राहायचा,

****

भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b2-2/

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b2-3/

भाग 4
https://irablogging.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b2-4-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

1 thought on “कौल-1”

Leave a Comment