तिचं रुटीन मीनाने पाहिलं होतं, ती म्हणायची काय आयुष्य आहे, अगदी राणी सारखं..
कामं नाही तर नाही वर एवढी हौसमौज..
आमचं मेलं अख्खं आयुष्य राब राब राबण्यात जाणार..
मीना संध्याकाळी स्वयंपाकाला जाई तेव्हा मालकिणीचा नवरा आलेला असे, आल्या आल्या मालकिणीला तो मिठीत घेई..
मग दोघेही हातात हात घालून घरात यायचे,
दर चार दिवसांनी तो तिला काही ना काही भेटवस्तू आणे,
कधी महागडा ड्रेस, कधी नेकलेस तर कधी काय..
घरी गेल्यावर मीना तिच्या नवऱ्याला हे सगळं कौतुक सांगत असायची..
तिचा नवरा तिला चिडवायचा,
बघ, नाहीतर तू..माझ्या सारख्या गरिबाशी लग्न केलं उगाच.
.
ती अजून चिडायची,
“तुमच्याशी लग्न करण्यात काही पश्चाताप नाही मला, आपली पायरी मी ओळखून आहे…पण प्रेम व्यक्त करायला बायकोसाठी महागड्या वस्तूच आणाव्या असं थोडीच आहे? कधीतरी माझ्यासाठी गजरा आणलाय? घरी आल्यावर प्रेमाने माझ्याशी बोललात? कधीतरी बाहेर भेळ खायला घेऊन गेलात?”
“अगं एवढंच ना, उद्या आणतो तुझ्यासाठी गजरा..”
दुसऱ्या दिवशी ती वाट बघत होती,
मालकिणी सारखी अजून धजून तयार झाली,
आता आपला नवरा येईल आणि आपल्याला गजरा माळेल या कल्पनेने सुखावली होती,
दोन्ही मुलांना खेळायला बाहेर काढून दिलं..
तिचा नवरा आला,
तिच्याकडे पाहिलं पण नाही, आत गेला अन म्हणाला,
“चहा टाक बरं पटकन..”
तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं..चहा जवळजवळ त्याच्या समोर आपटलाच..
“काय गं काय झालं?”
विसरलात? काल म्हणाले होते, गजरा आणतो तुझ्यासाठी..
******
भाग 3
khupach chhan Katha