किंमत-1

मीना जसजशी कामावर जाऊ लागलेली तसतशी तिची चिडचिड वाढत होती,

तिच्या नवऱ्याला कारण काही समजेना..

तिचं कुटुंब एक गरीब पण समाधानी कुटुंब होतं..

दोन मुलं, नवरा आणि ती..

जेमतेम कमावून सुखी होते,

नवरा एका शाळेत शिपाई म्हणून कामाला होता,

खर्च वाढला तशी मीनानेही कामं पाहायला सुरवात केली,

एका श्रीमंत घरात स्वयंपाकिण म्हणून तिला काम मिळालं होतं..

त्या घरात तिचे जवळपास सकाळ संध्याकाळ दीड दोन तास जायचे, पण बदल्यात भरपूर पगार मिळायचा..

या वेळात घरातले संवाद तिच्या कानी पडायचे..

तिची मालकीण, पस्तिशीत असलेली, शिकलेली, सुंदर बाई..

घरात सगळ्या कामांना नोकर,

मालकीण सकाळी जिमला जाई, आल्यावर तिच्यासाठी प्रोटीन शेक आणि नाष्टा तयार ठेवावा लागे,

आल्यावर चांगली तासभर अंघोळ करे, गाणे ऐकत..

मग tv बघत नाष्टा, नंतर थोडंफार आवरून झालं की जेवण..

दुपारी परत एखादा मुव्ही बघणार, आणि संध्याकाळ झाली की नवरा येण्याच्या तास दोन तास आधी स्वतःला छान तयार करत असे,

रोज नवीन ड्रेस असायचा..

*****

भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4-3/

Leave a Comment