का ऐकायचं मोदींचं?

PM modi, Modi's speech, modi on corona
Modi on corona

का ऐकायचं मोदींचं?

कोरोना संदर्भात आपल्या माननीय पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलं, काही गोष्टी अमलात आणायला सांगितल्या, किती लोकांनी ते मनापासून ऐकलं आणि पाहिलं? देशाचे पंतप्रधान, म्हणजे एक सर्वोच्च जबाबदारी.. आपल्या विचारांचा परीघ केवळ आपल्या घरापूरता, पण यांना संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी असते..

संध्याकाळी 5 वाजता टाळ्या व तत्सम आवाज करण्याच्या त्यांच्या निर्णयावर काही लोकांनी खिल्ली उडवली, काहींनो स्वागत केले, मुळात अडचण ही आहे की आपली लोकं फार दिडशहानी आहेत…पंतप्रधानांना काही येत नाही, त्यांना हे जमत नाही, ते जमत नाही..असं करायला हवं, तसं करायला हवं अश्या बाता तो टपरीवर बिडी ओढत सहजपणे करत असतो. मुद्दा हा आहे की इथे प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजतो…प्रत्येकाला वाटतं की माझ्याहून हुशार इथे कुणीही नाही..

भारतात कुठलीही घटना घडू देत, सामाजिक मतप्रवाह कधीही एक नसतो. एखाद्या घटनेबद्दल अनेक मतप्रवाह दिसून येतील.. अगदी नुकतंच मिसरूड फुटलेला मुलगा सुद्धा शहाणपण शिकवू लागतो. कुणी म्हणतं दहशतावदयांना शिक्षा करा, कुणी म्हणतं ते निर्दोष होते…नोटबंदी वर तर काहीजण असे react करतात की 10 हजार पगार असलेला माणूस 10 करोड चं नुकसान झाल्यागत डोक्याला हात लावून बसण्याचं सोंग घेतोय…

सांगितलेलं ऐकायचंच नाही, आम्ही आमच्या मनाला वाटेल ते करणार, आम्हाला शिकवू नका, आम्ही ऐकणार नाही…हीच बुद्धी आज प्रत्येकाची दिसून येईल…..कुणी ऐकायलाच तयार नसतो…उलट आपलं मत मांडून मोकळा होतो..सोशल मीडिया मुळे तर आपला शहाणपणा कुठे दाखवू अन कुठे नको असं विचार प्रत्येकजण करतंय…

यशस्वी सरकार तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा त्याला जनतेची साथ मिळते…जेव्हा जनता साथ देत नाही तेव्हा ये सरकार यशस्वी होणार कसं? आणि मग सरकारच्या अयशस्वी पणाला उलट त्यांनाच जबाबदार धरणं हा कुठला न्याय??

मोदीजिं चं का ऐकावं? तुम्ही मोदी विरोधक असाल अथवा समर्थक असाल…पण ही वेळ समर्थन की असमर्थन याची नाही…मोदीजींचं ऐकणं हे आपल्याच हिताचं असेल हे लक्षात घ्या…असमर्थन भलेही अंधभक्त म्हणून दुस्वास करतील..पण त्यांनाही आवाहन आहे, की या विषयावर तरी अंधभक्ती वगैरे बाजूला ठेवा.

पण यावेळी सर्व भारतीयांना एक आवाहन आहे..आपल्या माननीय पंतप्रधानांनी देशाच्या हितासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं तंतोतंत पालन झालं पाहिजे..कोरोना सारख्या संवेदनशील विषयासाठी थोडा वेळ आपला दीडशहाणापणा बाजूला ठेऊ…यातच आपलं आणि आपल्या राष्ट्राचं भलं आहे…

©संजना सरोजकुमार इंगळे

1 thought on “का ऐकायचं मोदींचं?”

Leave a Comment