कल्पकता-3

 ऑफिसरने दोन्ही कंपन्यांना एक छोटासा प्रोजेक्ट दिला,

तो प्रोजेक्ट जो चांगला सादर करेल त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार होतं,

कंपनी A आणि B कामाला लागल्या,

कंपनी A मध्ये मॅनेजरने काटेकोरपणे काही नियम बनवले, त्यात एकही चूक न करता कामं वाटली,

कंपनी B च्या मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी सांगितलं आणि तेही कामाला लागले..

अखेर कंपनी B जिंकली आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं..

—-

आता वरील तिनही प्रसंगात असं काय घडलं की ते ते व्यक्ती यशस्वी ठरले?

अक्षयाने पार्लरवालीला काय सांगितलं? कावेरीबाईंनी सुनेला काय सांगितलं? आणि कंपनी B ने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?

तर ऐका,

अक्षयाने त्या पार्लरवाल्या ताईला सांगितलं की, 

“मी काय केल्याने सुंदर दिसेल हे माझ्याहून जास्त तुम्हाला माहितीये, तुम्हाला जास्त अनुभव आहे तेव्हा तुम्हाला जसा योग्य वाटेल तसा मेकप करा” 

या वाक्याने ती पार्लरवाली ताई निर्धास्त झाली, आपल्यावर विश्वास दाखवला म्हणून तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिने आपली कल्पकता वापरून सुंदर मेकप केला..

कावेरीबाईंनी सुनबाईला सांगितलं,

“आता हे घर, किचन तू तुझ्या पद्धतीने चालव..तुला हवी तशी मांडणी कर, मी हस्तक्षेप करणार नाही..उगाच मला असंच लागतं, तसंच लागतं, हे इथे ठेऊ नको वगैरे मी काही बोलणार नाही तुला”

तिसऱ्या प्रसंगात कंपनी B ने कर्मचाऱ्यांना सांगितलं, की काम कसं उत्तम असावं याचा अनुभव तुम्हाला जास्त आहे, तेव्हा तुमचं best तुम्ही द्या आणि आत्तापर्यंतची आपली उत्कृष्ट कला दाखवून द्या..

तात्पर्य,

जेव्हा एखाद्यावर कसलंही प्रेशर न टाकता त्याला त्याच्या बुद्धीने, कल्पकतेने आणि विचाराने काम करायला सहकार्य केलं तर ते काम अधिक उत्तमरीत्या होतं…

4 thoughts on “कल्पकता-3”

Leave a Comment