ऑफिसर (भाग 7)

भाग 1

https://www.irablogging.in/2020/08/1_20.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/08/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/08/3.html

भाग 4
भाग 5

https://www.irablogging.in/2021/04/5_24.html

भाग 6

https://www.irablogging.in/2021/04/6_25.html

 ताईसाहेब नक्की कसला अभ्यास करणार आहेत हे कमळीला माहीत नव्हतं, तिला फक्त एवढं समजत होतं की ताई घराची चौकट सोडून काहीतरी वेगळं करू पाहताय. प्रेरणाच्या आयुष्याची कमळी बऱ्यापैकी साक्षीदार होती. आदित्य घरी नसताना कमळी घरातल्या कामासाठी बराच वेळ प्रेरणाच्या आसपास असायची. प्रेरणाची हुशारी, जिद्द तिने पाहिली होती. कमळी घरकाम करत असली तरी स्वतःच्या आयुष्याची ती हिरो होती, आयुष्य स्वतःच्या नियमांनी जगत होती, स्वतः अर्थार्जन करत होती. 

कमळी असं बोलली तेव्हा आदित्यला जरा लाज वाटली.

“कशाला? मी आणून देईन पुस्तकं..”

आदित्यने वैतागतच सगळी पुस्तकं आणून दिली. त्याने ज्या पद्धतीने ती टेबलवर आपटली ते पाहून त्याने फार मोठे उपकार केलेत अशीच भावना त्याच्यात दिसत होती. प्रेरणाला हे सगळं असह्य होत होतं. एकीकडे अभ्यासही करायचा होता पण वेळेची अडचण..दुसरीकडे परीक्षेसाठी काही खर्च येत असेल तर त्यासाठीही लाचार बनावं लागत होतं. 

हे सगळं विसरून प्रेरणा आता अभ्यासात लक्ष देणार होती. पण एकेक संकटं येतच होती. आदित्य फक्त बोलायला होता, करण्याची वेळ आली तेव्हा त्याने माघार घेतली होती. 

घरातली कामं चुकणार नव्हती. वीर ला कडेवर घेऊन तयारी करून ती भाजीपाला आणायला गेली. सगळी कामं अगदी एका हातानेच करायची सवय झालेली तिला. एक भाजीवली मोठ्या त्वेषाने भाव ओरडून ओरडून सांगत होती. तिचा उत्साह प्रेरणा बघतच राहिली.पावसाचं भरून आलेलं, एका ठिकाणी भाजी घ्यायला थांबलेली असतांना अचानक पाऊस सुरू झाला, वीर ला घट्ट पकडून ती आडोशाला उभी राहिली. आदित्यला फोन करूनही उपयोग नव्हता कारण तोही ऑफिसमध्ये होता.त्या भाजीवालीने तिची तारांबळ बघितली आणि जवळच असलेल्या झोपडपट्टीत तिला बोलावलं. प्रेरणा तिच्या मागोमाग गेली. त्या बाईने पटकन बसायला जागा दिली आणि लागलीच गरम चहा टाकला. 

“अहो ताई कशाला…”

“असुदे गं, लेकुरवाळी बाय तू.. घे..”

प्रेरणाने वीर ला मांडीवर घेतलं आणि बाजूने हळूच चहा चा घोट घेऊ लागली..

“काय गोड लेकरू हाये..माझं बी असंच व्हतं बघा..”

“म्हणजे?”

“वर्षाचं असंल, त्याला खूप ताप भरला..उतरता उतरेना..खूप दवाखाना केला, माझे सगळे दागिने विकले पण पोर जगलं नाय बघा..”

प्रेरणाला ऐकून वाईट वाटलं.

“आणि तुमचे मिस्टर?”

“ते कवाच घर सोडून गेले, लहान लेकरू पोटात व्हतं तवा दारू ढोसायचा, नंतर एका बाईचा नाद लागला अन गेला तिला घेऊन पळून..”

प्रेरणाला ऐकून अंगावर काटाच उभा राहिला..पदरी मोठी मुलगी फक्त..नवरा सोडून गेला, मुलगा सोडून गेला. तरीही हे सगळं सांगतांना तिच्या बोलण्यात दुःखातून उभं राहिल्याची चमक होती. हे सगळं झालं पण मी मात्र इथेच आहे आणि राहणार हेच तिची नजर सांगत होती.

“झालं ते झालं..दैव कुणाला चुकलं हाय..आता पोरीकडं बघून जगायचं..भाजीपाला ईकतो, चार पैसे मिळतात. पोरीला शाळेत घातलंय, खूप शिकीन ती..तुमच्यासारखी बनल..”

“अहो पण मी घरीच असते.. “

“ताई..लेकराला कडेवर घेऊन पावसाचं संकट माहीत असताना तुम्ही या गर्दीत पाय ठेवला..ही खुमारी फक्त शिकल्याने येती..”

प्रेरणाला तिची खऱ्या अर्थाने आज ओळख त्या भाजीवालीने करून दिलेली. आजवर प्रेरणा स्वतःला केवळ घरात बसणारी, लाचार मुलगी मानत होती.. पण आज या बाईने तिला तिच्यातल्या जिद्दीशी ओळख घडवून आणली..

प्रेरणा घरी आली. वीर ला खाली ठेवलं, हातपाय धुतले आणि खूर्चीवर बसली. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं.

“पदरी असलेलं मूल सोडून गेलं, नवऱ्याचा आधार नाही.. पैशाची चणचण.. अश्या अवस्थेत ती भाजीवाली किती जोशात तिचं काम करत होती, तिच्या आवाजात खुमारी होती, ती दयेची भीक मागत नव्हती, तिच्या हक्काचा आणि कष्टाचा भाव करत होती. काम करत असताना आयुष्यात आलेल्या दुःखाचा लवलेशही चेहऱ्यावर दिसू देत नव्हती…मला माझं आयुष्य किती खडतर वाटत होतं, पण बाहेरच्या जगात पाहिलं तर मी त्यांच्या मानाने कितीतरी सुखी आहे..”

प्रेरणाच्या मनातलं मळभ दूर झालं, एका नव्या जिद्दीने ती तिच्या ध्येयासाठी तयार झाली. तिच्या लक्षात आलं, की आपण कितीही आरडाओरडा केला तरी कितीही त्रागा केला तरी आपल्याला सगळं जागीच आणि आयतं मिळणार नाही. घरातली कामं चुकणार नाहीत, ती करूनच अभ्यास करावा लागेल..वीरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याला संभाळूनच सगळं qकरावं लागेल..आदित्यकडून अपेक्षा ठेऊन चालणार नाही, त्याच्याकडून मदतीची अपेक्षा न करताच पुढे सरकावं लागेल..

तिने पिशवीतून भाजीपाला काढला आणि फ्रीज उघडलं.फ्रीज मध्ये त्या एकेका कप्यावर वर्तमान पेपर च्या घड्या ठेवल्या होत्या..साफसफाई चं बरंच काम त्याच्यामुळे वाचत असे. 

“महागाई भत्यात 3.54 टक्क्यांनी वाढ..”

जवळपास सातव्यांदा तिने ही बातमी त्या वर्तमानपत्रात वाचली असेल, ते शीर्षक तिच्या अगदी तोंडीपाठ झालेलं..कारण दिवसातून कितीतरी वेळा फ्रीज उघडावे लागे आणि ती बातमी डोळ्यासमोर दिसे..

हे करता करता अचानक तिच्या डोक्यात ट्यूब पेटली..आपल्याला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या अश्याच घरातल्या वस्तूंवर लावल्या तर? जसे की मिठाचा डबा, मसाल्याचा डबा, कपाट, बाल्कनी..सगळीकडे महत्वाच्या घडामोडी लिहून ठेवल्या तर सतत नजरेस पडतील.. ते पाठ करण्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणारच नाही..

सगळ्यात आधी तिने वीर चा एक शर्ट घेतला, जो की वापरून महिन्याभरात टाकून द्यावा लागणार होता.. त्यावर सुरवात केली..भारताचा इतिहास या पुस्तकातील पहिल्या काही धड्यांच्या नोट्स त्या शर्ट वर बारीक अक्षरात लिहिल्या..वीर सोबत खेळताना, त्याला झोपवताना सतत ते नजरेस पडायचं आणि एका दिवसात तिच्या ते लक्षात राहायचं. शर्ट धुतला की पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच नोट्स लिहायच्या, म्हणजे रिविजन व्हायची आणि डोक्यात एकदम पक्के बसायचे..

क्रमशः

3 thoughts on “ऑफिसर (भाग 7)”

Leave a Comment