भाग 1
https://www.irablogging.in/2020/08/1_20.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/08/2.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/08/3.html
https://www.irablogging.in/2021/04/5_24.html
भाग 6
https://www.irablogging.in/2021/04/6_25.html
भाग 7
https://www.irablogging.in/2021/04/7_26.html
भाग 8
https://www.irablogging.in/2021/04/8_28.html
भाग 9
https://www.irablogging.in/2021/04/9_30.html
“अरे विजय, ये ये…खूप उशीर केलास यायला..मला वाटलेलं येऊन जाशील लगेच..”
“कसलं रे..ऑफिस सांभाळून उरलेल्या वेळात करतो अभ्यास, गेले काही दिवस ऑफिसमध्ये काम वाढलं होतं. त्यामुळे जमलं नाही, पण बरं झालं तू सांगितलं की तुझ्याकडे mpsc ची पुस्तकं आहेत म्हणून..बाजारात फार महाग मिळताय..”
आदित्यला वाटलेलं की वीरच्या हॉस्पिटलच्या प्रसंगावरून प्रेरणा अभ्यास सोडून देईल, पण मधल्या काळात प्रेरणाला वीर आजारी पडण्याचं खरं कारणही समजलं होतं आणि ती अभ्यासपासून दूर होणार नाही हेही तिने बजावून सांगितलेलं.. त्यामुळे आता या मित्राला नाही कसं म्हणायचं हा मोठा प्रश्न होता. प्रेरणाला तर कल्पनाही नव्हती की विजय कशासाठी आलाय ते. काही वेळाने ती बाहेर आली, आदित्यने तिची ओळख विजयशी करून दिली.
“हा माझ्या ऑफिसमधला मित्र..विजय. हा सुद्धा mpsc चा अभ्यास करतोय बरं का..”
हे ऐकल्यावर प्रेरणाला आनंद झाला. आता या माणसाशी परिक्षेबद्दल सविस्तर बोलता येईल, काही मार्गदर्शन घेता येईल..यांना सगळं विचारुन घेऊया म्हणून ती पटकन त्यांना पाणी आणून देते आणि तिथेच बसते..
“भाऊजी तुम्ही पहिल्यांदाच देताय का परीक्षा?”
“नाही, माझा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला पण मी जिद्द सोडली नाही..प्रयत्न करत राहणार, आणि आता तर बऱ्यापैकी अभ्यासही…”
“अगं प्रेरणा काहीतरी खायला बनव ना, तू भजी छान बनवतेस..”
आदित्य त्यांना मधेच तोडत म्हणाला..प्रेरणाने पटकन जाऊन भजी करून आणली आणि पुन्हा त्यांच्यात येऊन बसली..
“तर तुम्ही काय म्हणत होता?”
“अगं अजून तळ ना, एवढ्यावरच काय होणार?”
प्रेरणाला आदित्यची चाल समजली होती. काहीही करून दोघांत संवाद होऊ द्यायचा नव्हता, कारण त्याला माहित होतं की परिक्षेबद्दल जरा काही बातमी असली तरी प्रेरणा हात धुवून त्याच्या मागे लागते. एक तर त्याला प्रेरणाला परिक्षेपासून दूर सारायचं होतं. प्रेरणाने पण हार मानली नाही..ती आत गेली आणि 15 मिनिटांनी ट्रे घेऊन बाहेर आली..
“घ्या, मनसोक्त भजी घ्या..पाणीही आणलंय आणि हो गरम गरम चहाही आहे..आणि स्वयंपाक सुद्धा तयार आहे, आता जेवण करूनच जायचं हा..” असं म्हणत तिने आदित्यकडे एक तिरका कटाक्ष टाकला..आता काहीच बाकी नाही म्हणून आदित्यला गप बसावं लागलं..
“अहो वहिनी इतकं कशाला? जेवण वगैरे…”
“अहो त्या निमित्ताने तुम्ही जास्त वेळ थांबाल, आणि आपल्याला परिक्षेबद्दल सविस्तर चर्चा करता येईल..मलाही थोडं मार्गदर्शन हवंच आहे..”
अर्ध्या तासात उठणाऱ्या मित्राला आदित्यमुळे 2 तास थांबावं लागलं, आदित्यची चाल आदित्यवरच उलटली होती.या वेळात प्रेरणाने विजयला सर्व माहिती विचारून घेतली. अभ्यासाला कुठलं स्टडी मटेरियल वापरावं, कशावर जास्त फोकस करावा, परीक्षेच्या वेळेचं नियोजन कसं करायचं हे सगळं माहीत करून घेतलं.
“वहिनी सर्वात जास्त वेळ जातो तो इतिहासाचा अभ्यास करण्यात..एवढं लक्षात ठेवणं अवघड आहे हो..
“
“हो ते तर आहे..सत्तर हजार वर्षांपूर्वी भारतात मानवी वास्तव्य असलं तरी लिखित इतिहास मात्र केवळ अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे..सर्वात प्रभावी शासन मौर्यांचं..नऊ हजार वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या काठी मानवी सांस्कृतीने प्रगती केली, सिंधू संस्कृती अस्तित्वात आली पण परकीय आक्रमणं.. जसं की युरोप आणि मध्य आशियाच्या प्रदेशातून आलेल्या टोळ्यांनी ही संस्कृती नष्ट केली..त्यात वैदिक उत्तर कालखंडात रावी नदीच्या काठी जनसमूहांमध्ये झालेलं दशरज्ञ युद्ध, उत्तरेकडे श्रावस्ती, कुशावती आणि साकेत राज्य, तसच वत्स, अवंती, मगध ही राज्येही अभ्यास करण्यासारखी आहेत..नंतर सिकंदराच्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली, मात्र सातवाहन च्या काळात खरी भरभराट झाली..”
विजयने भाजीचा तोंडापाशी नेलेला घास तिथेच रोखून धरला..आदित्य प्रेरणाच्या बोलण्याकडे आ वासून बघत राहिला..इतका सखोल अभ्यास इतक्या कमी वेळात हिने कसा केला हाच प्रश्न दोघांना सतावत होता..
“वहिनी, सगळा सारांश तुम्ही काही मिनिटात सांगितला..खरं तर हे सगळं लक्षात ठेवायला मला 2 वर्षही पुरली नाहीत..”
विजयच्या हेही लक्षात आलं की प्रेरणाला परिक्षेबद्दल किती तळमळ आहे ते. तिचा अभ्यास बघून त्याला समजलं की ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार..
“वहिनी, मी येतो आता..तुमचा अभ्यास चालू द्या..थोडी बडीशेप असेल तर देता का प्लिज?”
“हो आत्ता आणते..”
हे निमित्त करून विजयने प्रेरणाला आत पाठवलं आणि तो हळूच आदित्यला म्हणाला..
“आदित्य..वहिनी खूप मनापासून प्रयत्न करताय, त्यांची गती रोखू नकोस..”
“हे घ्या भाऊजी…येत जा असेच..सहज तर येणार नाही तुम्ही, आजही काहीतरी काम काढलं असणार. “
“हो वहिनी…आदित्यकडे काम होतं जरा..त्याचा पेन ड्राईव्ह हवा होता, घेतला मी..”
एवढं म्हणत विजयने निरोप दिला. टेबलवर प्रेरणाची रचून ठेवलेली पुस्तकं तशीच राहिली..प्रेरणाच्या जिद्दीसमोर त्यांचं स्थलांतराचं स्वप्न भंगलं होतं..
आदित्यला एकीकडे वाटायचं की प्रेरणा यशस्वी व्हावी, पण कुठल्याही तडजोडी शिवाय..जे की शक्य नव्हतं..
प्रेरणाचा अभ्यास सुरूच होता, मध्ये कित्येक अडचणी आल्या पण त्यावर मात करून प्रेरणाने अभ्यास सुरू ठेवला. आता तिला अभ्यासाची गोडी लागली. सतत व्यस्त असल्याने बाकीच्या गोष्टीत आता तिचं मन रमत नसे.tv, मोबाईल, गाणी ऐकणं पूर्णपणे बंद झालं होतं. TV पहायची ती केवळ बातम्या ऐकण्यासाठी. एरवी प्रेरणाची सिरीयल आणि आदित्यच्या बातम्या यावरून होणारे वाद आता थांबले होते. दोघेही एकत्र बातम्या बघत.
गेल्या काही दिवसांपासून मात्र आदित्य कुठल्यातरी चिंतेत वाटत होता. ऑफिसमध्ये काहीतरी टेन्शन असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं पण हे नेहमीचं होऊ लागलं. अश्यावेळी एक बायको म्हणून आपल्या नवऱ्याची साथ देणं तिला महत्वाचं वाटलं. एक दिवस अभ्यास बाजूला ठेऊन ती आदित्यजवळ बसली आणि त्याला चिंतेचं कारण विचारलं..आदित्यने त्याच्या चिंतेचं कारण कुठलेही आढेवेढे न घेता बोलून टाकलं..
“तुला तर माहितीच आहे की मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतो, मंदीचं संकट सुरू आहे, कंपन्यांना नुकसान होतंय. लोकं कमी केली जाताय..मला वाटतंय की माझाही त्यात नंबर असेल..तसं झालं तर..”
“तुम्ही नकारात्मक विचार करू नका. बऱ्याचदा आपण अश्या गोष्टींचा विचार करतो जी कधी होणारही नसते. सगळं काही ठीक होईल, काळजी करू नको..
आणि तू इतकी वर्षे प्रामाणिकपणे काम केलंय, तुला त्याचा असा मोबदला थोडीच मिळेल?”
प्रेरणाच्या या शब्दांनी आदित्यला धीर आला, प्रेरणाने काळजी घेतली की आदित्यची मनस्थिती काही केल्या ढळू द्यायची नाही..
दिवस जात होते, एके दिवशी आदित्य घरी आला आणि प्रेरणाच्या हातात एक लेटर ठेवलं. प्रेरणाला धस्स झालं…हे, टर्मिनेशन चं लेटर तर नाही??
क्रमशः