उपकार-1

आज मंत्रिपदाची शपथ घेतांना राहून राहून तिला मोठ्या जावेची आठवण येत होती,

मोठ्या संघर्षानंतर रेवती मंत्रिमंडळात निवडून गेली होती,

हा संघर्ष लहान नव्हता, 7 वर्षांचा काळ होता,

या काळात कितीतरी गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या..

शपथविधी झाला, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून झाल्या,

सिक्युरिटी आणि तिथल्या ऑफिसर लोकांनी तिला तिची केबिन दाखवली,

ती शांतपणे बसली, मनातून आनंद झालेला,

फार मोठ्या काळानंतर स्वप्न पूर्ण झालेलं,

कर्मचारी तिथून निघून गेले,

केबिनमध्ये ती एकटीच होती,

तिला 7 वर्षांपूर्वीचा काळ आठवला,

तिला पाहायला सासरचे आले होते,

तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं की मला राजकारणात रस आहे,

सासरच्यांना सुद्धा अशीच सून हवी होती,

पण शेवटी राजकारणीच ते,

महिला राखीव जागा असेल तेव्हा तिला पुढे करणार होते,

आणि सगळा कारभार त्यांच्या हातात घेणार होते,

***

भाग 2

उपकार-2

Leave a Comment