आशीर्वाद-1

आज निशाला स्वयंपाकाचा कंटाळाच आलेला,

रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळले होते सगळे,

सगळे म्हणजे ती, तिचा नवरा आणि तिचा लहान मुलगा..

तिघेच घरी,

आज बाहेरून काहीतरी मागवूयात म्हणत तिने स्वयंपाकघरातुन सुट्टी घेतली,

त्यानेही लगेच ऑर्डर करायला घेतली,

काय मागवूया सांग तूच..

तिने तिच्या आणि मुलाच्या आवडीचे 2-3 मेनू सांगितले,

त्याने ऑर्डर कन्फर्म केली,

अर्ध्या तासात येईलच पार्सल,

हुश्श…

स्वयंपाकातून आराम म्हणजे केवळ पोळी भाजीपासून आराम नाही, तर भाज्या चिरणं, कणिक मळणं, फोडणी देणं, पोळ्या लाटणं, जेवायला वाढणं, ऊष्ट काढणं, भांडी धुणं, ओटा आवरणं… घरातल्या बाईला चांगलंच माहीत आहे ते..

अर्ध्या तासाने डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला,

तिच्या नवऱ्याने ते घेतलं,

डिलिव्हरी बॉय पार्सल देऊन मोबाईल वर स्टेटस डिलिव्हर्ड सेट करत होता, खिशातून मोबाईल काढतांना सुद्धा त्याचा हात थरथरत होता,

तो घामेघुम झाला होता, चक्कर येत होती त्याला, पण ऑर्डर पूर्ण करणं भाग होतं म्हणून तग धरून होता..

भाग 2
भाग 3

Leave a Comment