“असं कसं बोलणार त्यांना की पैसे परत द्या म्हणून? शेवटी मुलाकडची बाजू आहे त्यांची…”
“अगं म्हणून काय इतकी मोठी रक्कम जाऊ देणार तू?”
रेवा चे आई वडील, सासू सासरे आणि तिचा नवरा सोनाराच्या दुकानात गेले होते..सासूने 1 तोळा सोनं खरेदी केलं, सासऱ्यांनी कार्ड ने पे करायला घेतलं पण नेमकं त्यावेळी मशीन ला काहीतरी अडचण आली..सासरे म्हणाले मी atm मधून कॅश आणतो पण atm बरंच दूर होतं.
रेवा च्या आई बाबांनी सासऱ्यांना बाजूला नेलं आणि सांगितलं की आमच्याकडे आहे जास्तीची कॅश, तुम्ही ती घ्या आणि आम्हाला नंतर द्या वाटल्यास…
सासऱ्यांना जरा संकोच वाटला पण रेवा च्या वडिलांनी आग्रह केला तसा त्यांनी ते पैसे घेतले.
रेवा च्या सासूला काहीही माहीत नव्हतं, त्यांना वाटलं की atm मधून आणले असतील.
या गोष्टीला बरेच दिवस झाले, पैसे काही परत मिळेना. रेवा च्या आई वडिलांना पैसे लागत होते पण मागणार कसे?
रेवा म्हणाली मीच विचारते,
“नको नको…आगाऊपणा करू नकोस..आपली मुलीची बाजू..जरा काही त्यांचा मनाला लागलं तर संबंध तुटतील…”
हे सगळं संभाषण फोनवर चाललेलं…
आणि नेमकं रेवा च्या सासूने ते ऐकलं..
त्यांना या प्रकाराची काहीही माहिती नव्हती..
शेवटी रेवा ला त्यांनी खोदून खोदून विचारलं तेव्हा रेवा ने सांगितलं..रेवा च्या सासूला चीड आली…
“कपडे बदल आणि चल माझ्यासोबत…”
“कुठे?”
“तुझ्या घरी..”
आईचा संशय खरा ठरला असं रेवा ला वाटायला लागलं..
रेवा आणि तिच्या सासूला दारात असं अचानक बघून रेवा च्या आईला जरा भीतीच वाटली…
रेवा च्या चेहऱ्यावर भीतीचे भाव बघून त्यांना अंदाज आला..
“तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती… अंधारात ठेवलं तुम्ही आम्हाला..”
“नाही हो ताई..माफ करा काही चुकलं असेल तर…”
हात जोडून रेवा ची आई माफी मागत होती.
“हेच…हेच चुकतं तुमचं…”
“म्हणजे? ताई सांगा आमचं काय चुकलं..तुम्हाला काय हवं ते देऊ आम्ही…”
“हेच चुकलं…आमची मुलीकडची बाजू…पडती बाजू…म्हणून स्वतःला कमी लेखायचं…मुलीकडची बाजू म्हणजे काय हो? मुलीला जन्म दिला म्हणजे तुम्ही खालचे आणि आम्ही मुलाला जन्म दिला म्हणून वरचे??? तुम्हीही 9 महिने पोटातच वाढवलं ना मुलीला? माझ्याप्रमाणेच पालनपोषण केलंत ना?
तरीही आमची बाजू मुलीकडची म्हणत तुम्ही मुलगी होण्याच्या पवित्र गोष्टीला अपमानित करत आहात…म्हणून मग मुलगी झाली म्हणून नाक मुरडणारे लोकं जन्माला येतात…का नाही येणार? मुळात आम्हाला मुलगी आहे म्हणून अपराधीपणाची भावना ते स्वतःच निर्माण करतात आणि हेच संस्कार पुढच्या पिढ्यांनाही देतात. आमच्या जागी दुसरं कोणी असतं तर असे उसने पैसे राहू दिले असते तुम्ही? आणि मला सांगा, कसले उसने पैसे आहेत?”
रेवा ने सगळी हकीकत सांगितली..
“अरे देवा, तुम्ही सासऱ्यांकडे पैसे दिलेत, आमचे हे एक नंबरचे विसरभोळे आणि त्यात गावाला गेलेत, म्हणजे अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत मागच्या सर्व घटना ते विसरले असणार…रेवा अगं मला तरी सांगायचस…” सासूने मुलाला फोन करून तातडीने पैसे घेऊन यायला सांगितले..
“आणि हे बघा…पुन्हा आमची मुलीची बाजू म्हणून स्वतःच्या पालकत्वाला कमी लेखू नका…मुलाला जन्म दिला म्हणून आम्ही काही तीर नाही मारले… उलट आमचा मुलगा आमचा सांभाळ करेल की नाही याची शाश्वती नाही पण रेवा आमचा हात कधीच सोडणार नाही याची खात्री आहे…”
परत जातांना रेवा ची आई भरल्या डोळ्यांनी सासूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती…घरी गेल्यावर रेवाने सासूला एक मिठी मारली…कारण पिढ्यांपिढ्यांच्या या घाणेरड्या मानसिकतेला सासूने आज एका क्षणात नेस्तनाबूत केले होते…